बॉलिवूड कलाकारांच्या लहान सहान गोष्टींना देखील मीडिया मोठं महत्व देत. स्टार किड्सच्या जन्मापासून तो मोठा होऊन त्याच लग्न, मुलबाळ होईपर्यंत एकूनएक गोष्टींची बातमी आधी कोण देत यासाठी जणू चढाओढ लागलेली असते.
त्यांची जीवनशैली, त्यांचे लग्न बरीच चर्चेत असतात आणि त्यांच्या बातम्या दररोज झळकतात. पण आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड स्टार्सच्या लग्नाच्या खर्चाबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.
1. करीना कपूर आणि सैफ अली खान
मीडिया रिपोर्टनुसार पतौडी कुटुंबातील नवाब आणि बॉलिवूड सुपरस्टार्स सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या लग्नात सुमारे 8 ते 10 कोटी रुपये खर्च आला होता.
२. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन
बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नात सुमारे 6 कोटी रुपये खर्च आलेला. या दोघांचे 2007 साली लग्न झाले होते.
3. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा
रितेश देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव यांचे पुत्र. रितेश देशमुखने 2012 मध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जेनेलियाशी लग्न केले होते. त्यांच्या लग्नात 6 ते 7 कोटी रुपये खर्च झालेले.
4. इम्रान खान आणि अवंतिका मलिक
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता इम्रान खानने बालपणीचे प्रेम असलेल्या अवंतिका मलिकशी लग्न केले. इम्रान खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा पुतण्या आहे. इम्रान आणि अवंतिकाच्या लग्नाची किंमत सुमारे 5.2 कोटी रुपये होती.
5. सलमान खानची बहीण अर्पिता
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची बहीण अर्पिताने 2014 मध्ये लग्न केले. सलमान खानच्या बहिणीच्या लग्नात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी देखील हजर होते. सलमानच्या बहिणीच्या लग्नाची किंमत सुमारे 5 कोटी रुपये होती.
6. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे लग्न 2000 मध्ये झाले होते. शिल्पाने राज कुंद्रा या व्यावसायिकाशी लग्न केले. ग्रँड हयात हॉटेलमध्ये त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या लग्नासाठी सुमारे 4 कोटी रुपये खर्च आला.
7. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना
बॉलिवूडचा खिलाडी कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचे 2001 मध्ये लग्न झाले होते. मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्या लग्नात साडेतीन लाख रुपये खर्च झाले.
8. हृतिक रोशन आणि सुझान खान
हृतिक रोशनने 2000 मध्ये आपली मैत्रीण सुजैन खानसोबत लग्न केले होते. हृतिक आणि सुझानच्या लग्नासाठी 3 कोटी रुपये खर्च आला. नुकताच हृतिक आणि सुझानचा घ टस्फोट झाला आहे आणि ते दोघेही एकमेकांपासून वेगळे राहतात.
9. आमिर खान आणि किरण राव
बॉलिवूड सुपरस्टार मिस्टर पेरफेक्टनिस्ट आमिर खानने किरण रावशी लग्न केले. आमिर खान आणि किरण लगान या चित्रपटात एकत्र दिसले आहेत. या दोघांच्या लग्नासाठी जवळपास 2 कोटी रुपये खर्च आला.
10. शाहरुख खान आणि गौरी खान
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने गौरीशी लग्न केले. लग्न अगदी साध्यापणे केलेले तरी गौरी आणि शाहरुखच्या लग्नासाठी 1 कोटी रुपये खर्च आला होता.