हॉटेलमध्ये लोकांचे खरकटे काढणारा हा मुलगा आहे बॉलीवूडचा स्टार, एक मिनिटाची कमाई आहे जवळपास २ हजार ….

Bollywood

हिरो-हिरोईन बनण्यासाठी मायानगरी मुंबई मध्ये हजारो लोक येत असतात. इथे आलेल्या अनेक तरुणांचे बॉलीवूड अभिनेता बनण्याचे स्वप्न असते. टीव्ही इंडस्ट्री आणि मॉडेलिंगमध्ये सुद्धा असे अनेक लोक आहेत जे बॉलीवूड अभिनेता बनू इच्छितात.

पण खूपच कमी लोक नशीबवान असतात ज्यांना बॉलीवूडमध्ये अभिनय करण्याची संधी मिळते. प्रत्येकाचे नशीब स्टार किड्स सारखे चांगले नसते कि त्यांना बॉलीवूडमध्ये हिरो किंवा होरोईन बनण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागत नाही.

परंतु एक सामान्य माणूस संघर्ष केल्यानंतर या ठिकाणी पोहोचतो. एका सामान्य माणसाला चित्रपटामध्ये साईड रोल मिळाला तर त्याच्यासाठी तो खूप खुश असतो. बॉलीवूडमध्ये सुद्धा असे अनके स्टार्स आहेत जे कोणत्याही मोठ्या सेलिब्रिटीची मुले नाहीत पण आपल्या मेहनतीच्या जोरावर आज ते बॉलीवूडचे टॉप अॅोक्टर बनले आहेत.

या पोस्टमध्ये आम्ही बॉलीवूडच्या एका अशा कलाकाराबद्दल सांगणार आहोत जो आज आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचला आहे आणि त्याचे वर्षाला एक नाही तर ३-४ चित्रपट रिलीज होतात.

आम्ही बोलत आहोत बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार बद्दल. अक्षय कुमार बॉलीवूडचा एक असा अभिनेता आहे ज्याला सर्व वयोगटातील दर्शक पसंत करतात.

तो प्रत्येक वेळी आपल्या चित्रपटाने लोकांना चकित करतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची संकल्पना खूपच वेगळी असते आणि तो नेहमी हा प्रयत्न करतो कि दर्शकांना काहीतरी नवीन मिळावे.

अक्षय सध्या सामाजिक मुद्द्यांवर चित्रपट बनवत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का कि एका सामान्य व्यक्तीपासून ते सुपरस्टार बनण्याचा हा प्रवास अक्षयसाठी सोपा नव्हता.

वेटरचे काम करत होता अक्षय

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी अक्षय कुमार एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. बँकॉकहून मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतल्यानंतरही जेव्हा त्याला भारतामध्ये काही खास काम मिळाले नाही तेव्हा त्याने आपला खर्च काढण्यासाठी वेटरचे काम केले.

इतकेच नाही तर अक्षयने ढाकामध्ये ६ महिने सेल्समनची नोकरी देखील केली. ढाकामधून तो परत दिल्लीला आला आणि शेवटी त्याला मुंबईमधील एका स्कूलमध्ये मुलांना मार्शल आर्ट शिकवण्याची संधी मिळाली.

मुलांना शिकवले मार्शल आर्ट

स्कूलमध्ये मार्शल आर्ट शिकवण्याच्या दरम्यान एका मुलाच्या वडिलाने अक्षयला एक सल्ला दिला कि त्याला मॉडेलिंग केले पाहिजे. मग काय तेव्हा अक्षयने एक फोटोशूट केले आणि छोटी-मोठी असाइनमेंट्स करू लागला.

हळू हळू तो मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय होऊ लागला आणि १९९१ मध्ये त्याचा पहिला डेब्यू चित्रपट सौगंध प्रदर्शित झाला. या चित्रपटानंतर अक्षयच्या फिल्मी करियरची सुरवात झाली आणि त्याने पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही.

एका मिनिटामध्ये कमवतो इतके रुपये

आज अक्षय कुमार बॉलीवूडमधील सर्वात आवडता सुपरस्टार आहे. अक्षयचे एका वर्षामध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होतात आणि त्याचे बहुतेक चित्रपट हिट होतात.

चित्रपटांमधून तो चांगलीच कमाई करतो. अक्षयला बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक मानले जाते. तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि त्याची एका मिनिटाची कमाई १८६९ रुपये इतकी आहे.

जगतो डिसिप्लिन्ड लाइफ

अक्षय एक खूपच डिसिप्लिन्ड लाइफस्टाइल फॉलो करतो. तो रोज सकाळी ४ वाजता उठतो आणि दिवसभर काम केल्यानंतर ६-७ वाजण्याच्या दरम्यान जेवण करू झोपी जातो.

अक्षयला कोणतीही वाईट सवय नाही. तो दारू आणि सिगरेट पासून नेहमी दूर राहतो. त्याला पार्टीमध्ये सुद्धा जाने पसंत नाही. तो सिंपल लिविंग, हाई थिंकिंग वर जास्त विश्वास ठेवतो.