हि सुंदर आणि हॉ-ट अभिनेत्री आहे क्रिकेटर मनीष पांडेची बायको, फोटो पाहून चकित व्हाल..

Sports

क्रिकेटर मनीष पांडेचे मागच्याच वर्षी लग्न झाले होते. मनीष पांडे हा 30 वर्षीय भारतीय क्रिकेटर आहे. तो एक उत्तम कीपर देखील आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की ज्या मुलीशी त्याने लग्न केले आहे ती म्हणजे आश्रिता शेट्टी जी एक प्रसिद्ध साउथ अभिनेत्री आहे.

मनीष आणि आश्रिता एकमेकांसोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते हे बर्‍याच काळापासून एकत्र पहिले जात होते. पण आता मनिष पांडे या आश्रिता शेट्टी हे दोघे पती पत्नी झाले आहेत. मनिष पांडेने लग्नानंतर आपल्या पत्नीला मिडिया समोर कधी आणले नाही.

यावेळी झाले होते लग्न:-  खरे तर मिड डे या वेबसाईटच्या बातमीनुसार मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांचे लग्न झाले होते. हे दोघे बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डे-ट करत होते. परंतु ते आपले नाते सार्वजनिक करू इच्छित नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार दोघांचे लग्न मुंबईत 2 डिसेंबरला कुमाऊनी आणि दक्षिण भारतीय चालीरितीने झाले होते.

या लग्नाच्या विधी दोन दिवस चालल्या होत्या. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांचे लग्न ठरवण्यामागील एक कारण म्हणजे भारतीय संघातील खेळाडूही त्यावेळी मुंबईत हजर असणार होते कारण त्यावेळी टी -२० मालिका डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजबरोबर होणार होती. अशा परिस्थितीत भारतीय संघातील खेळाडू सहज लग्नात उपस्थित राहू शकतील म्हणून ती तारीख ठरवण्यात आली होती. त्यांच्या लग्नात बरेच मोठे खेळाडूंनी हजेरी लावली होती.

आश्रिता शेट्टी साउथच्या चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे:- तुम्हाला आश्रिता शेट्टीबद्दल आधीपासूनच माहिती नसेल तर आम्ही सांगतो की 26 वर्षीय आश्रिता ही साउथ चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि तिने इंद्रजित ओरू कन्नियम मुनु कलावनिकल्लूम आणि उधयम एनएच 4 सारख्या बर्‍याच मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

याशिवाय तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केले आहे. आश्रिताने साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार अभिनेता सिद्धार्थसोबत एक चित्रपट केला होता. या दोघांनी तामिळ रो-मँटिक थ्रि-लर चित्रपट उदयम एनएच 4 मध्ये एकत्र काम केले होते. लोकांनी देखील या चित्रपटाचे खूप कौतुक केले होते.

मनीष पांडे आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला फलंदाज आहे:- जर आपण मनीष पांडेबद्दल बोललो तर तो क-र्नाटक क्रिकेट संघाचा क-र्णधार असून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहे. यापूर्वी वेस्ट इंडीज दौर्‍यादरम्यान तो भारतीय संघाचा सदस्य होता.

मनीष पांडेचा जन्म 10 सप्टेंबर 1989 रोजी नैनीताल उत्तराखंड येथे झाला. मनीषचे वडील कृष्णानंद पांडे सै-न्यात कर्नल म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे घरात सै-न्याचे वातावरण होते. मनीष पांडे यालाही सै-न्या-त जायचे होते. सेवानिवृत्त क र्नलचा मुलगा मनीष पांडे याने सैन्या त भरती होण्याचे स्वप्न पहायला सुरुवात केली होती.

पण त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेटपटू बनवण्याचा विचार केला होता. त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट खेळण्यास प्रेरित केले जे नंतर मनीष पांडेचे देखील स्वप्न बनले आणि त्याने स्वताचे व आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करून दाखवले. त्याच्या कारकीर्दीकडे पाहता त्याने 14 जुलै 2015 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली.

मनीष पांडे आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज आहे. मनीष पांडेने 21 मे 2009 रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना डेक्कन चार्जर्सविरूद्ध शतक केले. या शतकानंतर तो प्रथम चर्चेत आला. मनीष पांडे आतापर्यंत 23 एकदिवसीय सामने आणि 31 टी -20 सामने खेळला आहे.

याआधी विराट कोहली-अनुष्का शर्मा युवराज सिंग-हेजल कीच झहीर खान-सागरिका घाटगे हरभजन सिंग-गीता बसरा मोहम्मद अजहरुद्दीन-संगीता बिजलानी या क्रिकेटपटू-अभिनेत्रीच्या जोड्यांनी लग्न केले आहे.