हेमा मालिनीला बघताच तिच्यावर फिदा झाले होते ध-र्मेंद्र, कुणा दुसऱ्याला आसपास फिरकून पण नव्हते देत,अशी आहे त्यांची प्रेम कहाणी …

Bollywood Entertenment

चित्रपटसृष्टी एक असं क्षेत्रं आहे जिथे मनोरंजनासोबत कलाकारांचे असंख्य किस्सेसुद्धा प्रेक्षकांसाठी कुतूहलाचा विषय ठरतात. प्रत्येक कलाकाराच्या खासगी आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

2 मे रोजी ध-र्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्नाचा ४० व वाढदिवस साजरा केला. ध र्मेंद्रने 2 मे 1980 रोजी हेमा मालिनीशी लग्न केले. या खास प्रसंगी ईशा देओलने तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.

ईशाने इन्स्टाग्रामवर काही फोटोज शेअर केली आणि लिहिले शादी की सालगिरह की बधाई हो मेरे डार्लिंग पेरेंट्स. प्रिय माझी आई आणि वडील मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि देवाला प्रार्थना करते की तुम्ही दोघेही असंख्य वर्षे एकत्र रहा निरोगी रहा आणि आनंदी रहा.

आपणास माहिती आहे का ध-र्मेंद्र हेमा मालिनीला पहिल्यांदा बघताच तिच्यावर फिदा झाला होता. ध-र्मेंद्र हेमाबद्दल इतका वेडा झाला होता की तीच्याभोवती कोणालाही तो फिरकू देत नसे. तुम्हाला माहिती असेलच ध-र्मेंद्र आधीच विवाहित होता. पण शोले चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांमधील प्रेम आणखी वाढले.

आपणास माहिती आहे का ध-र्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्नापूर्वी 10-12 चित्रपटांमध्ये काम केले होते. ध-र्मेंद्र यांनीही हेमा मालिनीसाठी धर्म बदलला. कृपया सांगा की हेमा मालिनीच्या प्रेमींच्या यादीत संजीव कुमार जितेंद्र या कलाकारांची नावेसुद्धा समाविष्ट झाली होती. मात्र हेमा मालिनी फक्त ध-र्मेंद्रच्या प्रेमात पडली.

जितेंद्र यांच्या मनात हेमा मालिनी यांच्याविषयी आपुलकीची भावना होती. पण हेमा यांनी मात्र जितेंद्र यांना काहीच प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे शेवटी या दोघांनी हे नातं मैत्रीपुरतंच सिमीत ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या दिवसांमध्ये हेमा आणि जितेंद्र एकमेकांचे खूप चांगले मित्र ठरले. जितेंद्र यांची काही गुपितंसुद्धा हेमा यांना ठाऊक होती.

पण ध-र्मेंद्र यांना मात्र त्यावेळी ही मैत्री अजिबात रुचली नव्हती. पण नशिबात मात्र काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. हेमा जितेंद्र आणि त्यांचे कुटुंबीय त्यावेळी मद्रासला गेले. जिथे या दोघांचं लग्न होणार होतं.

पण, तिथल्या एका वृत्तपत्राला याबाबतची माहिती मिळाली आणि त्यांनी हे वृत्त प्रसिद्ध केलं. या एका वृत्ताने अनेकांनाच धक्का बसला होता. ध-र्मेंद्रसाठी तर हे सर्व अनपेक्षित होतं.

ही बातमी ध-र्मेंद्र यांच्यापर्यंत पोहोचताच त्यावेळी त्यांनी जितेंद्र यांची तत्कालीन प्रेयसी शोभा सिप्पी यांच्या घरी धाव घेतली आणि त्यानंतर ते दोघंही मद्रासला रवाना झाले. हेमा मालिनी यांच्या मद्रास येथील घरी पोहोचताच ते सर्व वातावरण कोणा एका चित्रपटाच्या कथेहून वेगळं नव्हतं. कारण त्यावेळी हेमा यांच्या वडिलांनी ध-र्मेंद्र यांना अक्षरश: धक्के मारून घराबाहेर काढलं होतं.

तुम्ही माझ्या मुलीच्या आयुष्यातून का निघून जात नाही. तुम्ही विवाहित आहात, त्यामुळे तुम्ही माझ्या मुलीसोबत लग्न करु शकत नाही असंच ते वारंवार म्हणत होते. शेवटी त्यांच्याकडे गयावया करुन ध-र्मेंद्र यांनी हेमा यांच्याशी एकांतात बोलण्याची परवानगी मिळवली. ध-र्मेंद्र आणि शोभा दोघंही त्यांचं प्रेम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते.

हेमा यांनी ही चूक करु नये अशी विनंती ध-र्मेंद्र त्यांना करत होते. उपस्थित सर्वजण एकाच उत्तराची वाट पाहात होते. शेवटी हेमामालिनी यांनी नकारार्थी मान हलवली आणि जितेंद्रसोबतचं त्यांचं लग्न तुटलं. जितेंद्र यांना तो अपमान सहन झाला नाही. ते तडक त्या ठिकाणाहून निघून गेले होते.