चित्रपट ‘हम साथ साथ है’ मध्ये सालमान सोबत दिसलेली छोटी मुलगी आत्ता दिसत आहे खूप हॉ-ट …

Bollywood

१९९९ मध्ये हम साथ साथ हैं या चित्रपटात अनेक प्रसिद्ध अभिनेता आणि अभिनेत्रयी एकत्र दिसून आले होते. यामध्ये सलमान खान सैफ अली खान तब्बू करिश्मा कपूर आणि सोनाली बेंद्रे या मोठ्या कलाकारांचा समावेश होता.

तुम्ही हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल तर तुम्हाला या चित्रपटात दिसणारे लहान बालकलाकर नक्कीच आठवत असतील. त्यामध्ये दोन मुले आणि एक मुलगी होती. तर आज आपण त्या क्युट लहान मुलगी जी सलमानला मामा म्हणायची तिच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

तुम्हाला माहित आहे का या क्युट बाल कलाकाराचे नाव झोया अफरोज आहे आणि आज ती २६ वर्षांची झाली आहे. आज सुद्धा ती तशीच क्युट व सुंदर दिसते व झोयाचे सुंदर फोटो पाहून कदाचित तुम्ही आश्चर्यचकित वाटेल.

१० जानेवारी १९९४ रोजी झोया अफरोज हिचा जन्म झाला होता. तिचा जन्म हा उत्तर प्रदेशमधील लखनऊमध्ये झाला आहे. अनेक मालिकांमध्ये चित्रपटांमध्ये आणि जाहिरातींमध्ये दिसून आलेली मॉ डेल आणि अभिनेत्री असलेल्या झोयाने बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली.

ज्यामुळे आज ती खूप पुढे निघून आली आहे. तसेच तिच्या फिल्मी कारकिर्दीत तिला तिच्या आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा देखील मिळाला.ल लहानपणीझोया आरशासमोर एकटीच अभिनय करायची.

इतकेच नव्हे तर बर्‍याच वेळा तिचे वडील तिची लबाडी म्हणून तिची चेष्टा करायचे ज्यावर ती कधीही लाजली नाही. उलट त्याऐवजी त्यांच्यासमोर ती अभिनय करून दाखवत होती. त्यानंतर झोयाला तिची आवड समजण्यास सुरुवात झाली आणि तिने तिच्या फिल्मी करिअरची निवड केली.

या अभिनेत्रीच्या चित्रपट करीयरबद्दल बोलताना तिने सैफ अली खान करिश्मा कपूर सलमान खान आणि अभिषेक बच्चन सारख्या मोठ्या कलाकारांबरोबर तिने चित्रपट केले आहेत.

तिच्या आदर्श व्यक्तीबद्दल बोलायचे झाले तर तिने प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोण यांच्या नावांचा यामध्ये उल्लेख केला आहे. अवघ्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून चित्रपटाच्या कारकिर्दीला सुरुवात करणारी अभिनेत्री झोया हिने नुकतेच हिमेश रेशमियाच्या एक्सपोज या चित्रपटातही काम केले आहे.

झोयाने सुरुवातीच्या वेळेत एका मुलाखतीत सांगितले की ती आपल्या आईबरोबर ऑडिशनला कशी जात होती. तिच्या आईने तिला कशी मदत केली हे तिने सांगितले आहे. आणि त्या वेळी झोया आपल्या आईबरोबर हम साथ साथ है या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेली होती. आणि तिची चित्रपटात बाल कलाकार म्हणून निवड झाली. बाल कलाकार म्हणून तिने हम साथ साथ है या चित्रपटात तसेच जय माता दी, सोनपरी या मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

झोयाने बालपणातील एक कहाणी सांगितली आहे की त्यावेळी तिला तिच्या अभ्यासाची खूपच चिंता होती. पण त्यानंतर तिने आपल्या अभ्यासामध्ये आणि करिअरमध्ये संतुलन कसे राखायचे हे तिने सांगितले. ती सकाळी शाळेत जात असत आणि मग घरी यायची आणि जरा थोडा वेळ आराम करायची आणि मग शूटसाठी बाहेर जायची.

आज झोया ही अभिनयाच्या जगात एक प्रसिद्ध नाव बनले आहे. आज लाखो मध्ये तिचे चाहते आहेत. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरील चाहत्यांकडे पाहून आपण तिच्या लोकप्रियतेचा अंदाज घेऊ शकता.