प्रत्येकजण श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत असतो, परंतु थोडेच लोक आपले स्वप्न पूर्ण करण्याचा विचार करत असतात. जर आपणही श्रीमंत होणाचे स्वप्न पाहत असाल आणि ते खरोखरच पूर्ण करू इच्छित असाल तर खाली दिलेल्या ६ रहस्यांचे पालन करा. कारण हे चमत्कारी रहस्य जाणून घेतल्यावर तुम्हालाही श्रीमंत होणापासून कोणीही रोखू शकत नाही.
पहिले रहस्य : स्वतःला श्रीमंत समजा –
लॉ ऑफ़ अट्रैक्शन (law of attraction) च्या नुसार आपण जो विचार करता तेच बनता. जर आपली विचारसरणी काहीतरी मोठे करायची असेल तर आपल्याला जीवनामध्ये मोठी गोष्ट मिळू शकते.
म्हणून आपण नेहमी स्वतःला श्रीमंत व्यक्ती मानले पाहिजे आणि आपले आयुष्य एखाद्या श्रीमंत व्यक्तीप्रमाणे व्यतीत केले पाहिजे. कधीही स्वतःला श्रीमंत व्यक्तीपेक्षा कमी समजू नका. स्वतःला श्रीमंत मानल्याने श्रीमंतीची जाणीव होऊ लागते. त्याचप्रमाणे स्वतःला गरीब समजल्याने तुम्ही नेहमीच गरीब रहाल.
दुसरे रहस्य : देवाचे आभार मानावे –
जेंव्हा जेव्हा लोकांना काहीतरी हवे असते तेव्हा ते देवाकडे जाऊन आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात आणि देव लोकांच्या प्रार्थनाही पूर्ण करतो.
परंतु काही लोक असे सुद्धा आहेत कि ज्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्यावर देवाकडे जाऊन आभार व्यक्त करत नाहीत जे एकदम चुकीचे आहे. जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी मिळवतो त्यावेळी देवाचे आणि समाजाचे नेहमी आभार मानावे.
तिसरे रहस्य : रात्री पैसे मोजूनच झोपावे –
रोज रात्री पैसे मोजून झोपणे खूप शुभ मानले जाते आणि असे केल्याने संपत्तीमध्ये वाढ होते. म्हणूनच रात्री झोपायच्या आधी आपण पैशाचे एक बंडल मोजावे आणि तिजोरीत ठेवावे. दररोज झोपण्यापूर्वी हे काम करावे. सलग दोन महिने असे केल्याने तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल.
चौथे रहस्य : वास्तुशास्त्राकडे लक्ष द्या –
वास्तुशास्त्रात बरीच शक्ती असते घराचे वास्तुशास्त्र योग्य असल्याने आयुष्यामध्ये धन संपत्ती आणि आनंदाची कधी कमतरता होत नाही. श्रीमंत होण्यासाठी आपण तिजोरीसंबंधित वस्तूशास्त्राकडे लक्ष द्यावे. आणि आपल्या घराच्या तीजोरीने वास्तुशास्त्रातील नियमांचे पालन केले असल्याचे सुनिश्चित करावे.
वास्तुशास्त्रानुसार तुमची तिजोरी नेहमी उत्तर दिशेला असावी. कारण उत्तरेकडे कुबेर या श्रीमंतीच्या देवाचे अस्तित्व असते. याशिवाय तिजोरीमध्ये देवी लक्ष्मीचा फोटो पण जरूर ठेवावा. वास्तुशास्त्राच्या या नियमांचे पालन केल्यास कोणीही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाही.
पाचवे रहस्य : उघडपणे वस्तू मागाव्यात –
निसर्ग आणि देवाकडून तुम्हाला जे पाहिजे ते उघडपणे मागावे आणि ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा कि देव तुम्हाला नक्की या वस्तू देईल. मनामध्ये विश्वास असल्यास तुम्हाला जे हवे ते जरूर मिळेल. प्रत्येक गोष्ट मिळण्याची एक वेळ असते आणि ह्या वेळेची तुम्ही नेहमी वाट पहावी.
तुम्हाला जे हवे तेच देवाकडे आणि निसर्गाकडे मागावे आणि पुन्हा पुन्हा आपला विचार बदलू नये. कारण तुम्ही जेव्हा आपली इच्छा वारंवार बदलता तेव्हा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.
सहावे रहस्य : लक्ष्मीचा कधीही अनादर करू नका –
आपण कधीही पैशाचा अनादर करू नये आणि ते नेहमी सांभाळून ठेवावे. पैशे खाली पडल्यानंतर ते उचलून नेहमी स्वच्छ केले पाहिजेत. जेव्हा जेव्हा घरामध्ये कुठूनही पैसे येतील त्यावेळी ते सर्प्रथम देवघरामध्ये ठेवावे आणि त्यानंतर तिजोरीत ठेवावे. असे केल्याने पैशांमध्ये वृद्धी होईल.