गोविंदाने नीलमसाठी आपल्या पत्नीसोबत तोडली होती एंगेजमेंट, अशी होती या दोघांची लव्ह स्टोरी

Bollywood

गोविंदा बॉलीवूड इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. ते त्यांच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

गोविंदा कॉमेडी चित्रपटांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या चित्रपटांमध्ये कॉमेडीमधून दर्शकांची मने जिंकली आहेत पण असे नाही कि ते फक्त कॉमेडी चित्रपटच करतात त्यांनी अॅरक्शन चित्रपट सुद्धा केले आहेत

आणि त्यांना आपली प्रत्येक भूमिका योग्यरीत्या साकारणे चांगलेच माहिती आहे. गोविंदा आपल्या काळापासून एक यशस्वी अभिनेता मानले जातात.

मग त्यांचा कॉमेडी चित्रपट असो किंवा अॅ क्शन चित्रपट असो सर्व चित्रपट दर्शकांना खूपच आवडतात. जर आपण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर वैयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा ते कोणत्याना कोणत्या करणामध्ये नेहमी चर्चेमध्ये राहिले आहेत.

गोविंदाचे नाव एके काळी बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राहिलेली नीलम कोठारीसोबत सुद्धा जोडले गेले होते आणि असे म्हंटले जाते कि अभिनेता गोंविदा अभिनेत्री नीलमवर प्रेम करत होते आणि त्यांनी आपली एंगेजमेंट देखील तोडली होती.

नीलमला तिच्या काळातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध आभिनेत्र मानले जात होते तिने बॉलीवूड इंडस्ट्रीमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

नीलम एकदा मुंबईला फिरायला आली होती तेव्हा तिला डायरेक्टर रमेश बहलने पाहिले होते आणि तिला चित्रपटाची ऑफर दिली होती. बॉलीवूड अभिनेत्री नीलमने जवानी चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता.

तिने बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेता जसे सलमान खान, आमिर खान सोबत सुद्धा चित्रपट केले आहेत आणि तिने गोविंदासोबत सुद्धा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

पण नीलमचा जवानी चित्रपट काही खास कमाल दाखवू शकला नाही आणि हा चित्रपट फ्लॉप झाला होता. पण अभिनेत्री नीलम दिसायला खूपच सुंदर होती आणि तिच्या अदाकारीचे चर्चे सगळीकडे होत होते.

तिच्या उत्कृष्ट अभिनयाचे कौतुक करताना लोक थकत नव्हते. तिला आणखीन बऱ्याच चित्रपटांचे ऑफर मिळाले होते आणि त्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

भलेही सध्या नीलम चित्रपटांपासून दूर आहे आणि आपल्या बिजनेसमध्ये व्यस्त आहे. ८० आणि ९० च्या दशकामध्ये नीलम आणि गोविंदाची जोडी खूपच प्रसिद्ध होती.

या दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. गोविंदा आणि नीलमचा पहिला चित्रपट १९८६ मध्ये प्रदर्शित झाला होता ज्याचे नाव होते इल्जाम आणि याच चित्रपटामुळे नीलमला चांगली ओळख मिळाली होती.

यानंतर ती प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये सामील झाली. या चित्रपटामधील दोघांच्या भूमिकेला दर्शकांकडून खूपच पसंती मिळाली होती. असे सांगितले जाते कि गोविंदा अभिनेत्री नीलमवर खूप प्रेम करू लागले होते आणि ते तिच्या प्रेमामध्ये खूपच सिरीयस झाले होते.

एका मुलाखतीदरम्यान गोविंदाने आपल्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित अनेक किस्से सांगितले होते, ते म्हणाले कि जेव्हा मी नीलमला पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा मी तिच्यावर प्रेम करू लागलो होती.

पण तेव्हा गोविंदा त्यांच्या पत्नी सुनिताला डेट करत होते. असे म्हंटले जाते कि नीलममुळे सुनिता आणि अभिनेता गोविंदा यांच्यामध्ये वाद निर्माण होऊल लागले होते.

गोविंदाने नीलमसाठी आपले एंगेजमेंटदेखील तोडून टाकली होती. गोविंदा अभिनेत्री नीलमसोबत लग्न करू इच्छित होते पण त्यांच्या आईने सुनीताला वचन दिले होते ज्यामुळे तिच्यासोबत गोविंदा लग्न करू शकले नाहीत.

अभिनेता गोविंदाने सांगितले कि मी नीलमवर प्रेम करत होते पण माझे नाते सुनितासोबत जोडले गेले होते तेव्हा मी माझी पत्नी सुनिताला इतकेच सांगत होतो कि तू नीलमकडून शिकून घे.

पण या गोष्टीमुळे सुनिता खूपच नाराज होत होती आणि एक दिवस सुनिता नीलमला काहीतरी बोलली ज्यामुळे मला खूपच राग आला आणि मी सुनितासोबत एंगेजमेंट तोडून टाकली होती. मी माझ्या आईमुळे सुनितासोबत लग्न केले.