९० च्या दशकामध्ये बॉलिवूडवर गोविंदाचेच राज्य होते. गोविंदाचे स्टारडम त्यावेळी सलमान खान, अक्षय कुमार यांसारख्या स्टार्सपेक्षा जास्त होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहे, जे आजही प्रेक्षकांना खूप आवडतात.
गोविंदाने ‘आ गया हीरो’ या चित्रपटातून बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तो यामध्ये यशस्वी होऊ शकला नाही. गोविंदा त्याच्या कारकिर्दीत जितका त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत राहिला आहे.
तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही वा’दात अनेक वेळा सापडला आहे. गोविंदाने सुनीताशी लग्न केले होते. मात्र जेव्हा त्याला चित्रपटसृष्टीत यश मिळू लागले तेव्हा त्याच्या अफेअरच्या चर्चाही खूप चालू राहिल्या होत्या.
एकेकाळी गोविंदा आणि राणी मुखर्जी यांच्या अफेअरची बॉलिवूडमध्ये खूप चर्चा झाली होती. दोघांनी ‘हद कर दी आपने’ या चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते. अनेकदा दोघेही एकत्र फिरताना दिसले होते. पण त्यावेळी गोविंदा राणी मुखर्जीच्या घरी राहायला गेल्याच्या बातम्याही खूप आल्या होत्या.
यामुळे गोविंदाची पत्नी सुनीता खूप नाराज झाली होती आणि तिने गोविंदाला रंगेहाथ पकडल्यानंतर तिने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. अशा प्रकारे पत्नी सुनीताने गोविंदाला चांगलाच धडा शिकवला होता.
या घटनेनंतर गोविंदाने आपले वैवाहिक आयुष्य वाचवण्यासाठी राणी मुखर्जीसोबतचे नाते तोडणे चांगले मानले होते. नंतर काही दिवसांनी राणी मुखर्जी आणि गोविंदाच्या अफेअरची चर्चाही थांबली होती.