Breaking News

‘ह्या’ एक चुकीमुळे संपुष्ठात आले गोविंदाचे करिअर, कधी करायचा एकसोबत 70 चित्रपटांमध्ये काम …

बॉलीवूडचा ‘हिरो नंबर वन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोविंदानेही आपल्या डान्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. आपल्या हावभावांशी आणि अभिनयाशी वेगळ्या शैलीत बरोबरी साधणारा क्यवचितच दुसरा कलाकार झाला असेल. 80 आणि 90 च्या दशकात गोविंदाने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे.

एकसोबत 70 चित्रपट साइन केले:- तीन दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या गोविंदाने जवळपास 165 चित्रपटांमध्ये काम केले आहे. गोविंदा असे म्हणाला आहे की, “एकेकाळी मी ७० चित्रपट एकत्र साइन केले होते. 8-10 चित्रपट स्वतःच बंद झाले आणि तारखांअभावी मला स्वतःहून चार-पाच चित्रपट सोडावे लागले.

अभिनय आणि गायन:- गोविंदा केवळ एक चांगला अभिनेता आणि नर्तकच नाही तर तो एक उत्तम गायक देखील आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. बॉलिवूडच्या राजा बाबूंनी अनेकवेळा या कौशल्याची ओळख करून दिली आहे. ‘आँखे’, ‘हसीना मान जाएंगे’ आणि ‘शोला और शबनम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची जादू निर्माण केली. गोविंदाचा ‘गोरी तेरे नैना’ हा म्युझिक अल्बम 2013 मध्ये रिलीज झाला होता. त्याच्या अल्बममधील चारही गाणी रसिकांना खूप आवडली होती.

कामाचे उदाहरण:- ‘खुद्दार’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गोविंदाच्या कारचा अपघात झाला ज्यामध्ये त्याला गं-भीर दुखापत झाली. चित्रपटाच्या क्रूला जेव्हा या प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी शूटिंग रद्द करण्यास सांगितले होते. मात्र डॉक्टरांना दाखवल्यानंतर गोविंदा मध्यरात्री सेटवर पोहोचला आणि त्याने सीन पूर्ण केला. याचे उदाहरण आजही समोर आहे. ‘खुद्दार’ हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात गोविंदासोबत करिश्मा कपूर दिसली होती.

लग्नाचे रहस्य का लपवले होते?:- गोविंदाने 1987 मध्ये सुनीतासोबत गुपचूप लग्न केले होते. त्यावेळी त्यांच्या करिअरचा आलेख खूप उंचावत होता. ही गोष्ट बाहेर आली तर चित्रपट मिळणे बं-द होईल, अशी भीतीही त्यांना होती. त्यामुळे त्यांनी ही गोष्ट अनेक वर्षे लपवून ठेवली. नंतर आईच्या सांगण्यावरून गोविंदाने सुनीतासोबत विधींनुसार लग्न केले.

राजकारणात गाडला झेंडा :- चित्रपटांसोबतच ते राजकारणातही सक्रिय झाला आहे. 2004 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. ज्यात त्यांनी भाजपच्या मोठ्या नेत्याचा पराभव केला.पण जिंकल्यानंतर ते राजकारणात कधीच सक्रिय राहिले नाहीत. अखेर त्यांनी राजकारण सोडले.गोविंदा आजही या गोष्टीचे दु:खी आहे कारण तो राजकारणात गेला नसता तर कदाचित आजही तो पडद्यावर राहिला असता.

तुम्ही गोविंदाचे कोणकोणते चित्रपट आणि गाणे ऐकले आणि बघितले आहे. हे आम्हाला कंमेन्ट करून नक्की कळवा.

About Sagar Avhad

Sagar Avhad Writer and Editor at live36daily.com and he have more than 2 year experience in Writing and as Editor. Email : sagaravhad@live36daily.com

Check Also

Entry of someone special in Rani Chatterjee’s life! Bhojpuri queen Rani Chatterjee dance video on kesariya song for his kesariya

Queen Rani Chatterjee of the Bhojpuri cinema industry wins the hearts of fans with her …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *