80 च्या दशकात जेव्हा श्रीदेवी आणि रेखा यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दबदबा निर्माण केला होता आणि माधुरी दीक्षितही हळूहळू इंडस्ट्रीमध्ये नुकतीच स्थापित होत असताना त्याच वेळी अभिनेत्री अमृता सिंग तिच्या सौंदर्य आणि अभिनयासाठी एक वेगळी ओळख निर्माण करत होती.
अमृताने चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आजही ती चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. व्यावसायिक अभिनेत्री बनून कारकिर्दीत यशस्वी होत असताना दुसरीकडे तिला वैयक्तिक जीवनात खूप संघर्ष करावा लागला.
गेल्या महिन्यात अमृताने आपल्या वाढदिवशी आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या.अमृताचा जन्म 9 फेब्रुवारी 1958 रोजी दिल्ली येथे झाला होता.
‘बेताब’ या चित्रपटात तिने सनी देओलच्या विरोधात आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पहिल्याच चित्रपटात तिच्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ घातली होती. चित्रपटाच्या गाण्यातील जब हम जवान होंगे त्या काळात चांगली हवा निर्माण केली होती.
व्यावसायिक आघाडीवर त्यांची जोडी सनी देओल, अनिल कपूर यांच्यासोबत सुपरहिट होती. पण वैयक्तिक आयुष्यात तिने तिच्यापेक्षा 12 वर्षांने कमी वयाचा जोडीदार निवडला. ती व्यक्ती दुसरे कोणी नसून नवाब घराण्याचा राजपुत्र सैफ अली खान होता.
1991 मध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचे लग्न झाले. या दोघांनी जवळजवळ 13 वर्षे एकत्रित घालवली आणि नंतर ते विभक्त झाले. या दोघांच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलताना दोघांची भेट झाली जेव्हा अमृता सिंग बॉलिवूडची एक नावाजलेली नाव होती आणि तिच्या करियरच्या उंचीवर होती.
तर सैफ नवीन आला आणि त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण करण्याची धडपड होता.एका चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि सैफ अमृताला आवडू लागला.
यावेळी सैफ 21 वर्षांचा होता तर अमृता सिंग 33 वर्षांची होती. अमृताला पहिल्यांदा भेटल्यानंतर सैफला देखील आवडायला लागली आणि म्हणूनच त्याने अमृताला भेटल्यानंतर काही दिवसांनी तिला बोलावले आणि विचारले की ती त्याच्याबरोबर जेवायला येणार का?
अमृता त्याला नम्रपणे नकार देत म्हणाली की ती रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जात नाही, परंतु तो अमृताच्या घरी जेवणासाठी येऊ शकतो. असं म्हणतात की या रात्री सैफने अमृताला लग्नासाठी प्रपोज केले आणि अमृतानेही आनंदाने त्याला हो म्हटल्याच सांगितलं जातं.
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी जाऊन कुटुंबातील सदस्यांविरूद्ध लग्न केले. वास्तविक, सैफ त्याच्या कुटुंबाला नको होता की त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा असलेल्या अमृताशी सैफने लग्न करावे याच्या ते वि रोधात होते. यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न केले.
या दोघांनी 1991 साली लग्न केले. अमृताने आपले करिअर सोडले आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. दोघांना मुलगी सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम अली खान अशी दोन मुले होती. पण सैफ आणि अमृताचे लग्न फार काळ टिकले नाही.
त्यांच्या प्रेमात गैरसमज निर्माण झाले आणि दोघांनाही एकमेकांशी तग धरुन राहणे कठीण झाले. अमृताचा असा विश्वास होता की सैफ नेहमी समोरच इतर स्त्रियांचे कौतुक करत असतो आणि अमृताला ही गोष्ट आवडली नाही.
तसंच या नात्याबद्दल तो स्वत: खूप बेजबाबदार झाल्याची कबुलीही स्वत: सैफने दिली होती. ज्यामुळे त्याचे अमृताशी असलेले नाते फार काळ टिकू शकले नाही. 2004 साली सैफ आणि अमृताचे वेगळे झाले.
घ टस्फोटासाठी सैफ अली खानची इटालियन मैत्रीण रोझा याला जबाबदार धरण्यात आले होते. पण रोजाशी सैफचे नाते फार काळ टिकले नाही आणि ते दोघे वेगळे झाले. नंतर सैफने 2007 साली करीना कपूरसोबत लग्न केले.