या जगामध्ये आई-वडील प्रत्येक मुलासाठी परमेश्वराचे दुसरे स्वरूप असते. असे म्हटले जाते की, परमेश्वराला प्रत्येक ठिकाणी जाता येणे शक्य नाही म्हणूनच त्याने पृथ्वीतलावावर आई-वडिलांचे अस्तित्व निर्माण केले. प्रत्येक आई वडील आपल्या मुलांच्या संगोपनासाठी आपले आयुष्य वेचून टाकतात.
मुलांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करता करता त्यांचे आयुष्य कधी निघून जाते, ते देखील कळत नाही. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना जगातील सर्वात जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करत असतात आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपली मुले कसे सुखी राहतील याचा विचार देखील करतात.
मुले कितीही मोठी झाली तरी आई-वडिलांसाठी ती लहानच असतात, जेव्हा मुलांच्या डोक्यावरून आई वडिलांचा आधार निघून जातो तेव्हा त्यांच्या डोक्यावर खूप सारे संकटे येऊ लागतात. आई-वडिलांचे कृपा छत्र हे जगातील सर्वात सुरक्षित छत्र मानले जाते.
जेव्हा आपण एखाद्या संकटामध्ये असतो, तेव्हा सर्वप्रथम आपल्याला आई-वडीलच आठवतात कारण की आई-वडिलांशिवाय आपल्या इच्छा संकट दूर करणारे कोणीच नसते. अशाच एका संकटाचा सामना भारतीय क्रिकेट टीमचे दिग्गज क्रिकेटर आणि तेच बॉलर उमेश यादव करत आहे.
नुकतेच उमेश यादव यांच्या वडिलांचे नि’धन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी उमेश यादव यांच्या वडिलांनी शेवटचा श्वास घेतला. उमेश यादव यांच्या वडिलांचे नाव तिलक यादव होते. गेल्या अनेक दिवसांपासून उमेश यांचे वडील आजारी होते.
एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उ’पचा’र देखील चालू होते परंतु त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा झाली होती. काही वेळ घरी देखील आणले गेले होते, पण अ’चान’क तब्येत बि’घडल्याने त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये ऍ’डमिट करावे लागले.
उमेश यादव यांच्या कुटुंबीयांमध्ये दोन भावंड एक बहीण आणि आई असा एकंदरीत परिवार आहे. वडिलांचा आधार जीवनातून गेल्यावर खूप दुःख होते याची प्रचिती उमेश यादव ला आता होत आहे. उमेश यादव यांच्या वडिलांच्या नि’धनानंतर क्रिकेट जगतात देखील श्र;द्धांजलीच्या अनेक भावनापर संदेश देखील देण्यात आलेले आहेत.
तसेच अनेक सेलिब्रिटी क्रिकेटर यांनी देखील उमेशला धीर दिलेला आहे. उमेश यादव यांच्या भावंडांचे नाव कमलेश आणि रमेश यादव आहे. वडिलांचे नि’धन झाल्यानंतर तिघी भावंडांनी आपल्या वडिलांचे अंतिम संस्कार नागपूर येथील एका नदीच्या घा’टावर केले.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, उमेश यादव यांचे वडील तिलक यादव सुप्रसिद्ध पैलवान होते आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये पैलवान क्षेत्रामध्ये खूप सारे नाव देखील कमावले होते. उमेश यादव चे वडील उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्हा येथे राहायचे.
उदरनिर्वाह करण्यासाठी व संसाराचा गाडा चालवण्यासाठी उमेश यादव यांचे वडील कोळशाच्या खाणीमध्ये काम करायचे.वडिलांना उमेश ला पोलीस सैन्यामध्ये भरती करायचे होते परंतु नशिबाने काहीतरी वेगळेच वळण दाखवले आणि आज उमेश यादव एक प्रसिद्ध क्रिकेटर आहे.
आज क्रिकेट क्षेत्रामध्ये उमेशचे नाव अगदी मानाने आणि सन्मानाने घेतले जाते. आज उमेश सीनियर बॉलर म्हणून देखील ओळखला जातो. क्रिकेट मैदानावर त्याची कामगिरी अतुलनीय आहे.