विशेष म्हणजे दीपिकाला पाहून तिचे चाहतेसुद्धा चक्रावून जात आहे, कारण हे ओळखणे कठीण आहे कि ती खरच दीपिका आहे का आणखी कोण आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडीयावर धुमाकूळ माजवतो आहे.
अलीकडेच दीपिकाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता, त्यात दीपिका एका शाळेच्या बाहेर स्ट्रीट फूड खाताना दिसत आहे. आता तिचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात ती लिपलॉक करताना म्हणजेच कोणालातरी किस करताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.
दीपिकाच्या एका चित्रपटाचे शु टींग दिल्लीमध्ये सुरु होते. या चित्रपटाचे नाव आहे “छपाक”. दीपिका पदुकोन आणि विक्रांत मैसी त्या वेळेला ह्या चित्रपटाच्या शु टींगमध्ये व्यस्त होते. या चित्रपटाची पठकथा हि अॅ सिड अ टॅक झालेल्या लक्ष्मी अग्रवाल या युवतीच्या जीवनावर आधारित आहे.
ह्या चित्रपटाच्या सेटवरुन एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यामध्ये दीपिका पदुकोन आणि विक्रांत मैसी हे एकमेकांना किस करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या ह्या व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोन आणि विक्रांत मैसी टेरेसवर उभे असताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ उभे आहेत आणि त्यानंतर थोड्याच वेळात ते एकमेकांना किस करायला सुरुवात करतात.
ह्या व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोनने गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केलेला दिसत आहे तर, विक्रांत मैसी हलक्या करड्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहेत. गुलाबी कुर्त्यामध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे.
हा सीन शूट करताना इतर घरांच्या टेरेसवर उभे असलेले बरेच लोक त्यांना किस करताना पाहताना दिसत आहेत. याअगोदर दीपिकाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.
त्यापैकी एक म्हणजे दीपिकाचा ऑटोमधून उतरतानाचा व्हिडिओ. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर इतका व्हायरल झाला होता कि त्याला काही तासामध्ये लाखो हिट्स मिळाले होते. सध्या दीपिका “छ्पाक” चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.
या चित्रपटाचे शुटींग दिल्लीमध्ये सुरु आहे. छ्पाक चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करीत आहेत. मेघना गुलजार दिग्दर्शित छ्पाक चित्रपटामुळे अॅ सिड अ टॅक झालेली लक्ष्मी अग्रवाल सध्या खूप चर्चेमध्ये आली आहे.
लक्ष्मी अग्रवालवर २२ एप्रिल २००५ रोजी एका युवकाने आपल्या लग्नाचा प्रस्ताव अमान्य केल्यामुळे अॅ सिड अ टॅक केला होता. त्यात तिचा चेहरा पूर्णपणे जळाला होता. परंतु सुदैवाने ती वाचली होती.
“छपाक” हा चित्रपट अश्या अॅसिड अ टॅक झालेल्या युवतींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बनवला आहे. डेक्कन क्रॉनिकलच्या एका वृत्तानुसार, “छपाक” चित्रपटाचे व्हिडिओ सारखे लीक होत होते त्यामुळे मेघना गुलजार खूप नाराज झाल्या होत्या.
मेघना गुलजारना असे वाटत होते कि चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी चित्रपटाचे कोणतेही व्हिडिओ लीक होऊ नयेत. सध्या सर्वच चित्रपट सृष्टीला अश्या समस्येने ग्रासले आहे.तरीसुद्धा या चित्रपटाने चांगल्याप्रकारे लक्ष्मीच्या आयुष्यातील दुःख जनतेसमोर मांडले आहेत.