बॉलीवूडमध्ये एंट्री करणे सोपे काम नाही परंतु सामान्य लोकांना असे वाटते कि हे खूप सोपे काम आहे. चित्रपटामध्ये काम करणारे कलाकार कठोर परिश्रम घेत असतात.
तेव्हा कुठे त्यांना यश मिळते जे प्रत्येकाचे स्वप्न असते. बॉलीवूडमध्ये अशा अनेक अॅक्ट्रेसेस आहे ज्यांनी अॅक्टिंगच्या करियर अगोदर एक वेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळवले होते. आजच्या या खास पोस्टमध्ये तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी अॅक्टिंगच्या अगोदर हे किताब जिंकले होते.
या अभिनेत्रींनी बनवली होती अॅक्टिंगच्या अगोदर एक वेगळी ओळख
बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून अशा अनेक हिरोईन झाल्या आहेत ज्या मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर चित्रपटामध्ये पॉपुलर झाल्या आहेत. या लिस्टमध्ये आम्ही तुम्हाला ७० च्या दशकापासून ते आतापर्यंत सर्व हिरोईनची नावे सांगणार आहोत.
जीनत अमान
१९७० मध्ये जीनत अमानने मिस इंडियाचा किताब जिंकला होता आणि याशिवाय तिला मिस एशिया पॅसिफिकचे जेतेपदही मिळाले आहे. खूपच कमी लोकांना माहिती आहे कि बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री जीनत अमान ही मिस इंडिया, एशिया पैसिफिकची विजेती राहिली आहे.
तिने आपल्या करियरची सुरवात हरे रामा हरे कृष्णा मधून केली होती, यामधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. यानंतर तिने डॉन, सत्यम शिवम सुंदरम, यादों की बारात, कुर्बानी सारख्या सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले. तिला बॉलीवूडमधील सर्वात हॉट अॅक्ट्रेस मानले जाते.
मीनाक्षी शेषाद्री
८० आणि ९० च्या दशकामध्ये मीनाक्षी शेषाद्रीचा एक वेगळाच रुबाब होता. १९८१ मध्ये मीनाक्षीने १७ व्या वर्षी मिस इंडियाचा किताब जिंकला होता. मीनाक्षीने आपल्या करियरची सुरवात १९८३ मध्ये आलेल्या पेंटर बाबू या चित्रपटामधून केली होती परंतु तिला खरी ओळख हिरो चित्रपटामधून मिळाली.
या चित्रपटामधूनच जॅकी श्रॉफलाहि खूप प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटाशिवाय तिने बेवफाई, दामिनी, घातक, घायल, मेरी जंग, डकैत, शहंशाह आणि आदमी खिलौना सारख्या चित्रपटामध्ये सुद्धा काम केले आहे.
जुही चावला
१९८४ मध्ये जुही चावलानेसुद्धा मिस इंडियाचा किताब आपल्या नावावर केला होता आणि यानंतर तिने सल्तनत या चित्रपटामधून आपला बॉलीवूडमधील प्रवास सुरु केला.
पण जुहीला कयामत से कयामत मधून प्रसिद्धी मिळाली यामध्ये तिच्या सोबत आमिर खानने सुद्धा काम केले होते हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. याशिवाय जुहीने बोल राधा बोल, डर, यस बॉस, दीवाना मस्ताना, हम हैं राही प्यार के आणि आईना सारख्या सफल चित्रपटामध्ये काम केले आहे.
ऐश्वर्या राय बच्चन
१९९४ मध्ये ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता आणि यानंतर १९९६ मध्ये तिने और प्यार हो गया चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
ऐश्वर्या रायसारखा चार्म अनेक अभिनेत्रींमध्ये पाहायला मिळाला आणि तिने बॉलीवूडमध्ये हम दिल दे चुके सनम, आ अब लौट चलें, देवदास, जोश, राजनीति, ए दिल है मुश्किल सारख्या प्रसिद्ध चित्रपटामध्ये काम केले आहे.
सुष्मिता सेन
१९९४ मध्ये सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचे जेतेपद पटकावले आणि यानंतर तिने बॉलीवूडआमध्ये पदार्पण केले. सुष्मिता सेन मिस युनिव्हर्सचा किताब मिळवणारी पहिली भारतीय मुलगी होती. यानंतर तिने बीवी नंबर-१, सिर्फ तुम, मैं हूं ना, मैंने प्यार क्यों किया सारख्या हिट चित्रपटामध्ये काम केले.