चुकूनही या 8 गोष्टी आपल्या पर्समध्ये ठेवू नका, नाहीतर एक-एक रुपयांसाठी तरसाल

Astrology

पर्स हि एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्ती आपल्या सोबत नेहमी ठेवत असते. या पर्समध्ये आपण आपल्या नेहमीच्या आवश्यक वस्तू कायम ठेवत असतो. मग ते एटीएम कार्ड असो किंवा ड्राइविंग लायसन्स.

परंतु असे पण काही लोक आहेत जे आपल्या पर्समध्ये पैसे बिलकुल नाही ठेवत. पर्समध्ये पैसे न ठेवण्यामागील ते एक मुख्य कारण सांगतात ते म्हणजे जास्त काळ त्यांच्या पर्समध्ये पैसे टिकत नाहीत. जर आपण अश्यांपैकी एक आहात ज्यांच्या पर्समध्ये बिलकुल पैसे टिकत नाहीत तर हा लेख आपल्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो.

आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून काही अश्या गोष्टी सांगणार आहोत ज्या तुमच्या पर्समध्ये ठेवल्या तर तुम्ही कष्टाने मिळवलेले पैसे तुमच्याजवळ जास्त काळ टिकू शकणार नाहीत. चला तर मग पाहूयात त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत.

देवाचे फोटो ठेवू नका : बरेच लोक असे आहेत जे आपल्या पर्समध्ये देवाचे फोटो आवर्जून ठेवतात.

आपण पर्स नेहमी हाताळत असल्यामुळे देवांच्या फोटोचा अपमान होण्याची शक्यता जास्त असते. आणि असे झाल्यास देव आपल्यावर नाराज होऊ शकतात आणि याचा परिणाम आपल्या जवळील असलेले पैसे जास्त काळ आपल्याजवळ टिकू शकणार नाहीत.

पैसे व्यवस्थित क्रमाने न ठेवणे : बरेच लोक आपल्या पर्समध्ये पैसे कसेही अस्ताव्यस्त ठेवतात. असे करणाऱ्या व्यक्तीला हे माहित नसते कि असे केल्याने माता लक्ष्मी त्याच्यावर रागावू शकते.

आणि माता लक्ष्मी जर नाराज झाली तर आपल्या जवळील पैसे जास्त काळ टिकणार नाहीत. म्हणून पर्समध्ये पैसे नेहमी क्रमाने ठेवावेत.

बिल ठेवणे पडू शकते महागात : काही लोक आपल्या पर्समध्ये विजेचे बिल, टेलिफोन बिल ठेवतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार जर एखादी व्यक्ती असे करत असेल तर त्या व्यक्तीवरील कर्जाचे ओझे अधिकच वाढते.

मे लेल्या व्यक्तींच्या आठवणी साठवून ठेवणे :

काही लोक आठवण म्हणून त्यांच्या पूर्वजांचे फोटो आपल्या पर्समध्ये ठेवतात, जी फारच अशुभ गोष्ट मानली जाते. असे केल्याने आपल्या जीवनावर त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो.

पर्समध्ये धा रदार वस्तू ठेवणे :

आपल्याला एक खूप वाईट सवय असते ती म्हणजे आपल्या पर्समध्ये एखादा छोटा चा कू, नेलक टर ठेवणे. जे लोक असल्या तीक्ष्ण वस्तू आपल्या पर्समध्ये ठेवतात अश्या लोकांना माहित नसते कि यामुळे नकारात्मकता वाढू शकते.

नकारात्मकतेमध्ये वाढ झाल्यास सकारात्मक उर्जा कमी होते आणि आपले कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. परिणाम आपले उत्पन्न कमी होते आणि खर्च जास्त वाढतो.

अनावश्यक वस्तू ठेवणे :

काही लोक पर्समध्ये कधीकधी अनावश्यक वस्तू, कागदपत्रे ठेवतात. पर्समध्ये अनावश्यक कागदपत्रे ठेवल्याने अश्या लोकांवर माता लक्ष्मी रागावू शकते. आणि माता लक्ष्मीच्या नाराजीमुळे त्या लोकांना आयुष्यात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो.

घराची चावी :

बरेच लोक घराची चावी सुरक्षित ठेवण्यासाठी ती आपल्या पर्समध्ये जपून ठेवतात. परंतु असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनात नकारात्मक उर्जा वाढू लागते ज्यामुळे त्या व्यक्तीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो.

फाटलेल्या जुन्या नोटा ठेवणे :

काही लोक आपल्या पर्समध्ये फाटलेल्या जुन्या नोटा ठेवतात. पण असे केल्याने माता लक्ष्मी त्यांच्यावर रागावू शकते. देवी लक्ष्मीच्या नाराजीमुळे त्या व्यक्तीला तिच्या आयुष्यामध्ये नेहमीच आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.