चित्रपट धड़कनच्या इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा बाहेर पडलं शिल्पा शेट्टीच दुःख ,म्हणाली- त्या रात्री..

Bollywood

बॉलिवूडमध्ये स्वताचे नाव आणि जागा निर्माण करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही तिने 90 च्या दशकापासून अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटात काम केले आहे. तिच्या अभिनय आणि सौंदर्याबद्दल लाखो लोकांना अजूनही कौतुक आहे.

जरी आता शिल्पा शेट्टीने स्वत: ला चित्रपटांपासून दूर केले आहे परंतु तरीही काही रियालिटी शोमध्ये ती जज म्हणून दिसत असते. शिल्पा ही स्वत:मध्ये एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिच्या योगामुळे आणि फिटनेसमुळेती चाहत्यांमध्येही खूप लोकप्रिय आहे. अनेक लोकांची पसंत असणारी शिल्पा शेट्टी हिच्याबद्दल अलीकडेच एक खुलासा झाला आहे ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

शिल्पाला सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला:- धडकन हा रोमँटिक चित्रपट तुम्हा सर्वांना माहीतच असेल. हा चित्रपट एका काळातील सुपरहि*ट चित्रपट ठरला होता. त्याची सर्व गाणीही चांगलीच गाजली होती. आजही लोक हा चित्रपट पाहण्यास उत्सुक असतात.

यामध्ये सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्यासह शिल्पा शेट्टी प्रमुख भूमिकेत होती. शिल्पाने अलीकडेच एका मुलाखतीत खु-लासा केला होता की करियरच्या सुरुवातीच्या काळात तिला खूप संघर्ष करावा लागला होता. तिला लोकांकडून आणि चित्रपट निर्मात्यांकडून एका प्रकारची प्रतिक्रिया सहन करून घ्यावी लागली होती.

परंतु असे असूनही तिने कधीही हार मानली नाही आणि नेहमीच स्वत: ला पुढे जाण्यासाठी तिने प्रेरित केले. शाहरुखच्या बाजीगर चित्रपटात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे त्यानंतर ती एका रात्रीतच सर्व चाहत्यांची पहिली पसंत बनली होती. पण असेही एक प्रकरण आहे ज्याबद्दल अभिनेत्री इतक्या वर्षानंतरही खूप अस्वस्थ राहत असते.

कोणताही पुरस्कार मिळाला नाही:- शिल्पाने मुलाखतीच्या वेळी सांगितले की धडकन हा चित्रपट तिच्या करिअरमधला सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता. पण यासाठी तिला नेहमीच एक गोष्ट मनात राहील की या चित्रपटासाठी तिला कोणताही पुरस्कार देण्यात आला नाही.

ती म्हणाली त्या पुरुस्कर सोहळ्यासाठी मी माझ्या केसांना कलर केला होता आणि निळ्या कलरचे लेन्स डोळ्यात घातले होते आणि मी लाल लिपस्टिक लावली होती जी माझ्यावर खूप उठून व सुंदर दिसायची. पण हे सर्व असूनही मला कोणताही पुरस्कार देण्यात आला नाही. मला धडकन आणि फिर मिलेंगे या चित्रपटासाठी पुरस्कार मिळावेत अशी अपेक्षा होती.

लोकांनी मला अभिनेत्री म्हणून पाहिले नाही:- शिल्पा शेट्टी पुढे म्हणाली की मला वाईट वाटते की त्या वेळी मला अभिनेत्री म्हणून कोणी पाहिले नव्हते. मी बर्‍याच हि-ट चित्रपटांमध्ये काम केले पण माझी कारकीर्दी फारशी टिकली नाही.

मला नेहमी माहित होते की मी योग्य मार्गावर चालत आहे आणि मी पुढे जात आहे. जरी मला खूप नकार मिळाला परंतु मी कधीही घाबरली नाही परंतु या गोष्टींमुळे मला आणखी चांगले होण्याचे धैर्य आणि विश्वास मिळाला.

तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने उद्योगपती राज कुंद्राशी लग्न केले. 15 फेब्रुवारी 2020 रोजी सेरोगेसीच्या माध्यमातून ती एका मुलीची आई देखील बनली. तिने त्या मुलीचे नाव समीक्षा ठेवले आहे. यापूर्वी तिने 21 मे 2012 रोजी मुलगा वियानला जन्म दिला. शिल्पाने एका मुलाखती दरम्यान दुसर्‍या मुलासाठी केलेल्या सरोगेसीबद्दल सांगितले होते.