ह्या 8 गोष्टी तरुणांनी शक्य तितक्या लवकर टाळाव्यात, नाहीतर प-श्चाताप..

Daily News

आचार्य चाणक्य ह्यांनी  स्वत:च्या जीवनात आलेल्या अनुभवांमधून जे ज्ञान त्यांना प्राप्त झाले, ते त्यांनी समाजातील सर्व थरातील लोकांना सांगितले. पण काही अशा खास ८ गोष्टी आचार्य चाणक्य यांनी फक्त तरुणांसाठी सांगितल्या आहेत, ज्या तरुणांनी त्यांच्या आयुष्यात करू नयेत. आचार्य चाणक्यांच्या मते, कोणत्याही प्रकारचे अति प्रमाणात मनोरंजन हे विद्यार्थ्यांसाठी हा निकारक ठरू शकते. म्हणून मनोरंजन हे सुद्धा योग्य प्रमाणात असावे.

तरुण पिढी ही कोणत्याही देशासाठी त्या देशाची खरी शक्ती आहे. तरुणाई ही समाज आणि त्याचबरोबर देश यांचा कणा आहे. तरुण पिढी ही नवीन  विचारांनी, तंत्रज्ञानाने प्रगल्भ असल्यामुळे ती देशाला नवीन शिखरावर नक्कीच नेऊ शकते.

ह्याच गोष्टी चाणक्यांनी हेरल्या, व त्यांनी तरुणांसाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजच्या तरुण पिढीने टाळल्या पाहिजेत. आजचे युवक हे देशातील संस्कृती आणि वारसा यांचे रक्षणकर्ते असतात. तर आपण जाणून घेऊया, की चाणक्य यांनी कोणत्या गोष्टींपासून तरुणांना दूर राहायला सांगितले आहे.

१. कामवा सना:- चाणक्यांचे म्हणणे आहे, की देशातील तरुण पिढीने का मवासनेपासून दूर राहावे. त्याचे कारण जेव्हा म्हणजे तरुण जेव्हा या गोष्टींमध्ये अडकतो, तेव्हा तो आपल्या कोणत्याच कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही जसे की अभ्यास, आरोग्य, नौकरी. याच कारणामुळे तो वि ना शाकडे जाऊ शकतो. हे उमेदीचे व  क्रियाशील राहण्याचे वय आहे. त्यामुळे, या वयामध्ये कामवासनेसारख्या गोष्टींपासून दूर रहाणेच योग्य आहे.

२. राग:- राग हा आपला सगळ्यात घातक शत्रू असतो. आचार्य चाणक्याच्या मते, एखाद्या व्यक्तीची विचार करण्याची व समजून घेण्याची शक्ति ही रागामुळे नष्ट होते. म्हणून, तरुणांनी शांत राहावे, शक्यतो राग टाळावा. जर जीवनात काहीतरी उद्देश असेल व त्यासाठी यशस्वी व्हायचे असेल तर रागावर नियंत्रण मिळवणे हे सगळ्यात अत्यावश्यक आहे.

आपल्या प्रगतीमधील सर्वांत मोठा अडथळा जर काही असेल तर तो राग आहे. कोणताही मनुष्य त्याची एकाग्रता रागामुळे गमावून बसतो. त्यामुळे त्याला यशाची चव चाखता येत नाही. रागामुळे आपल्या शरिरातील हा र्मो न्सवरील नियंत्रण जाते तसेच शरीराची लवचिकता कमी होते.

३. लोभ :- व्यक्तीच्या विनाशाचे कारण त्याचा स्वा र्थ किंवा लोभी स्वभाव असतो. तरुणांनी लोभाला ब ळी  पडू नये, कारण तो त्यांच्या कामातील, अभ्यासातील मोठा अ डथळा मानला जातो, म्हणून आचार्य चाणक्य म्हणतात, माणसाने अति लोभ करू नये. आपली वाणी गोड ठेवावी आणि प्रेम द्यावे व घ्यावे. दुसर्‍यांचा द्वे ष कराल, तर जरी तुमच्या हातात माणिक- मोती असतील तरी त्याचा साप व्हायला वेळ लागणार नाही.

४. स्वाद:- चाणक्यांच्या मते, तरुण विद्यार्थ्यानी स्वादिष्ट, तेलकट व चवदार अन्नाची तल्लफ सोडून दिली व त्याऐवजी पौष्टिक, निरोगी व संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण त्यामुळेच तरुणांचे आरोग्य चांगले राहाण्यास मदत होईल. तो महत्वाचा आहे, कारण तो अभ्यासाच्या मार्गात अडथळा आणणार नाही.

आजच्या धकाधकीच्या जिवनशैलीत मानवी जिवन हे एक यंत्र बनले आहे. घरी किंवा ऑफिस मध्ये बैठे काम, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित निकृष्ट आहार, यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तिंपर्यंत सर्वांना कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासले आहे. काळाची गरज ओळखा व संतुलित आहार घ्या.

५. साजश्रृंगार:– तरुण विद्यार्थ्यांनी साधी जीवनशैली जगली पाहिजे, प्रमाणात फॅशन करणे योग्य आहे. स्वच्छ रहा, साधी राहाणी ठेवा कारण अतिरिक्त साजश्रुंगार तरुणांना अभ्यासापासून विचलित करू शकतो. म्हणूनच चाणक्य सांगतात, अशा आभासी आणि निरोपयोगी गोष्टींपासून आपण स्वत:ला दूर ठेवले पाहिजे.

६. मनोरंजन :- आचार्य चाणक्य म्हणतात की मनोरंजन आवश्यक तेवढेच असले पाहिजे. हल्लीच्या चित्रपट आणि वेबसिरीज मध्ये मनोरंजनाच्या नावाखाली भलतेच हिंसक असे काही तरी दाखवले जात असते त्यामुळे विद्यार्थी चुकीच्या मार्गाने जाऊ शकतात. असे मनोरंजन टाळावे.

७. झोप :-आवश्यक झोप ही उत्तम आरोग्यासाठी चांगली आहे, परंतु जास्त झोप घेणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे शरीरात आळसाचे प्रमाण वाढते.

८. सेवा:- सेवा करणे हे एक चांगले काम आहे,  परंतु चाणक्य म्हणतात, सेवा करावी पण त्याचबरोबर

स्वत:ची काळजी घ्यावी. स्वत:ला विसरून सेवा करून आपल्या मौल्यवान वेळ वाया घालवू नये. स्वत:कडे लक्ष देणे पण तितकेच जरूरी आहे. मित्रांनो जर तुम्हाला आमचे आर्टिकल आवडले  असेल तर तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता त्यासाठी खाली दिलेल्या शेअर बटनाचा वापर करा .धन्यवाद .