अमरीश पुरी म्हणजे सगळ्या बॉलिवूड जगतातले एक महान अभिनेते होते. त्याच्या उत्कृष्ट अभिनयासमोर कोणीही टिकू शकत नव्हते. ते जरी आता आपल्यात नसले, तरी त्याचा शक्तिशाली आवाज आणि अभिनय अजूनही लोकांच्या मनात त्यांनी जिवंत ठेवला आहे. अमरीश पुरी हे संपूर्ण चित्रपटसृष्टीतले एक अतिशय हुशार आणि अनुभवी अभिनेता होते.
त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करून आपल्या सुंदर व लोकांना आवडणार्या कामगिरीने लोकांची मने जिंकली. त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही प्रकारची पात्रे निभावली. त्यांची भूमिका असलेली सगळीच पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असे नाही पण खलनायकाच्या भूमिकेत मात्र त्यांचा अभिनय, जोरदार आवाज प्रेक्षकांना नक्कीच आवडला होता.
त्यांनी अनेक खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत, ज्या भूमिका लोकांच्या अजूनही लक्षात आहेत. उदाहरणार्थ, ‘मिस्टर इंडिया’ मधील ‘मोगैम्बो’ चे पात्र, या भूमिकेतील नकारात्मक पात्र लोकांच्या मनातून गेले नाही, आजही कोणी गमतीत म्हटले, की “मोगम्बो खुश हुवा” तर अमरीश पुरींची आठवण आल्यावाचून राहात नाही. आज आपण या महान अभिनेत्याबद्दल थोडे जाणून घेऊया.
अमरीश पुरी यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी पंजाबमधील जालंधर शहरात झाला होता. त्यांच्या पूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक हिट चित्रपट सिनेजगताला दिले. ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्वपूर्ण आणि अनुभवी असे अभिनेते होते. त्यांनी फक्त बॉलिवूड नाही तर काही हॉलिवूड चित्रपटातही काम केले होते. कोणताही चित्रपट असुदे, बॉलीवूड किंवा हॉलीवूड, अमरीश पुरींच्या नकारात्मक पात्राची मात्र सर्वत्र चर्चा होती.
अमरीश पुरी यांनी सन १९६७ मध्ये या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर २००५ पर्यन्त त्यांनी ४०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले होते. त्या काळातील अमरीश पुरी हे बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी खलनायकांपैकी एक होते. त्यांनी अनेक दिग्गज अशा अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. पण आपल्याला असे म्हणता येईल, की लोक त्यांच्याबरोबर काम करणे हे स्वत:चे नशीब समजत असत.
अमरीश पुरी हे खर्या अर्थाने स्वत:च्या मातीशी, भूमीशी जोडले गेलेले एक महान कलाकार होते. त्यांनी आपल्या साधेपणाने लोकांची मने जिंकली होती. जरी त्याच्याकडे अनेक उत्तम चित्रपट होते, तरी बाकी अनेक चित्रपटांनी त्यांना सर्वाधिक यश मिळवून दिले आहे.
त्यांनी केलेले व गाजलेले चित्रपट म्हणजे, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, विश्वात्मा, घातक, कोयला, जान, गदर- एक प्रेम कथा, करण अर्जुन, त्रिदेव, दामिनी, मिस्टर इंडिया, नायक: द रियल हिरो होते. अमरीश पुरी यांनी १२ जानेवारी २००५ मध्ये या जगाचा निरोप घेतला. त्यांना मैलोडीसप्लास्टिक सिंड्रोमया हा आजार झाला होता.
खूप कमी लोकांना माहीत आहे, की अमरीश पुरी यांना एक सुंदर मुलगी आहे जिचे नाव नम्रता आहे. पण नम्रता प्रथमपासूनच या बॉलिवूडच्या चंदेरी व चकाकीपासून दूर आहे. नम्रताने ग्रेजूएशन पदवी संपादन केल्यावर सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.