काळ्या साडीमध्ये टीनाला बघून वेडे झाले होते अनिल अंबानी, धीरुभाईने विरोध करूनही केले लग्न..

Entertenment

रिलायन्स समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचा छोटा मुलगा अनिल अंबानी आज ६१ वर्षांचे  झाले आहेत. अनिल अंबानीने अभिनेत्री टीना मुनिमशी लग्न केले आहे. या दोघांची प्रेमकथा एका चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. चला तर मग आम्ही तुम्हाला या खास प्रसंगी अनिल अंबानी आणि टीना यांच्या मनोरंजक लव्ह स्टोरीबद्दल सांगू.

पहिल्यांदा एका लग्नात पाहिले:- अनिल अंबानी यांनी 1986 साली एका लग्नाच्या वेळी टीनाला पहिल्यांदा पाहिले होते. खरं तर अनिलची नजर तिच्यावरच थांबली होती कारण टीना संपूर्ण पार्टीत एकमेव अशी महिला होती जी काळ्या रंगाच्या साडीमध्ये आली होती आणि ती खूपच सुंदर दिसत होती.

या दोघांची पहिली भेट टीना यांचे पुतणे करण यांनी केली होती त्यावेळी टीना मुनीम चित्रपटसृष्टीतली एक मोठी स्टार होती आणि त्याचवेळी रिलायन्स कंपनी उदयास येत होती जरी टीना सांगते की पहिल्या भेटीत अनिल त्यांना आवडला होता.

अमेरिकेत झाली होती दुसरी भेट:- अनिल आणि टीनाची अमेरिकेत दुसरी भेट झाली होती. ती अगदी सामान्य गोष्ट होती कारण टीनाला भेटायला नको होते कारण अनिल हा त्यांच्यासाठी अनोळखी होता परंतु अनिलच्या हट्टीपणामुळे ती भेटायला गेली त्या भेटीत टीनाने अनिल अंबानी यांना अगदी जवळ केले.

अनिल त्यांना आधीपासूनच आवडला होता त्यानंतर या दोघांनी काही महिन्यांपर्यंत एकमेकांना डेट करयाचे चालू ठेवले यावेळी टीना मुनिमने बॉलिवूडपासून अंतर बनवायला सुरूवात केली.

घरचे विरोधात होते:- जेव्हा अनिल अंबानी यांनी टीना मुनिमबद्दल आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगितले की तेव्हा त्यांना कोणतीही अभिनेत्री अंबानी कुटुंबाची सून व्हायला नको होती आणि कुटुंबातील सदस्यांनी त्यांना विरोध दर्शवला.

अनिलने स्वत: ला कुटुंबापासून दूर करण्याचा निर्णय घेतला. मीडिया रिपोर्टनुसार नंतर अनिलने टीनाला आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या निर्णयाबद्दल सांगितले तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही जरी त्यांना धक्का बसला होता तरी टीना बॉलिवूड सोडून अमेरिकेत इंटिरियर डिझायनिंगच्या कोर्ससाठी गेली.

क्लाइमेक्स मध्ये वेगळेच काही घडले:- या प्रेमकथेच्या सुरवाती मध्ये दुसरे काहीतरी लिहिले असले तरी १९८९ मध्ये अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथे मोठा भूकंप झाला होता त्यावेळी टीना तेथे होती अनिलने कुठून तरी नंबर तिचा नंबर शोधला आणि टीनाला फोन केला आणि फक्त ती ठीक आहे का असे विचारले असता त्याला उत्तरे मिळाले.

बाकी काहीच न बोलता त्याने फोन डिस्कनेक्ट केला. अनिलच्या या वागण्याने अभिनेत्री आश्चर्यचकित झाली तीसुद्धा त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती आणि तिने त्याला फोन केला त्यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरू झाले बर्‍याच विचार विनिमयानंतर अनिल अंबानी यांनी आपल्या वडिलांना सांगितले की मी या मुलीशी लग्न करणार आहे.

अखेरीस, अनिल घरातील सदस्यांना पटवून देण्यात यशस्वी झाला दोघांनी १९९१ मध्ये लग्न केले दोघांनाही जय अनमोल आणि जय अंशुल अशी दोन मुले आहेत.रियालन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे एकेकाळी धनाढय़ उद्योगपती होते मात्र भारतातील दूरसंचार बाजारपेठेत अनर्थपूर्ण घडामोडी घडल्याने अंबानी आता धनाढय़ नाहीत असे त्यांच्या वकिलांनी शुक्रवारी ब्रिटनमधील न्यायालयात स्पष्ट केले.

चीनमधील अग्रगण्य बँकांनी अनिल अंबानी यांच्याकडून ६८० दशलक्ष डॉलर रक्कम वसूल करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली असून त्याबाबतच्या सुनावणीच्या वेळी वकिलांनी वरील बाब न्यायालयात स्पष्ट केली.