एकदम साधे सरळ जीवन जगतात अजय देवगन, फोटो आहे पुरावा .

Entertenment

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन सध्या आपल्या आगामी ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 10 जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट झाला असून आठवडाभरात त्याने 100 कोटींचा गल्ला जमवला आहे.

या चित्रपटात अजय देवगनसोबत काजोल देखील मुख्य भूमिकेत आहे. तिने तानाजीच्या पत्नीचा रोल केला आहे. अजय देवगन कायमच चित्रपटांमध्ये अ‍ॅक्शन कॅरेक्टर करताना दिसला आहे. सोबतच त्याने विनोदी चित्रपटांमध्येही उत्तम अभिनय केला आहे.

अजय देवगणच्या वडिलांचे नाव वीरू देवगन होते, जे गेल्या वर्षी हे जग सोडून निघून गेले. अजय देवगणची पत्नी काजोल देखील बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. अजय देवगन आणि काजोल यांना दोन अपत्ये असून त्यांना मुलगा युग आणि न्यासा नावाची एक मुलगी आहे.

अजय देवगणने आपल्या करियरची सुरुवात फूल और कांटे या चित्रपटाने केली होती. त्याचा पहिला चित्रपट लोकांना प्रचंड आवडला होता.अजय देवगनने हम दिल दे चुके सनम, गंगाजल, गोलमाल मालिका, राजनीती, सिंघम, द्रशम, दे दे प्यार दे यासारख्या अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

त्याचे चित्रपट लोकांना खूप आवडतात.

आज अजय देवगण बॉलिवूड मधील एक सुपरस्टार बनला आहे. त्याच्याकडे संपत्ती आणि प्रसिद्धीची कमतरता नाही. पण त्याच्या प्रसिद्धीची थोडी देखील हवा त्याच्या डोक्यात गेलेली नाही. करोडोंच्या संपत्तीचा मालक असला तरीही तो सामान्य लोकांसारखा सामान्य जीवन जगतो.

तानाजी चित्रपटात अजय देवगन आणि काजोल बर्‍याच वर्षानंतर मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत. अजय देवगनच्या चित्रपटाला लोकांनी अफाट प्रेम दिलं आहे. थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांच्या कडकडाटासह लोकांनी अक्षरशः चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे