बिग बॉस मधून बदलले नोरा फतेहीचे आयुष्य, कधी वेटर बनून तर कधी लॉटरी विकून चालवले होते घर आज करतेय बॉलिवूड वर राज्य…

Entertenment

नोरा फतेही आज बॉलीवूडमधील एक प्रसिद्द नाव आहे. हि एक कॅनेडियन मूळची अभिनेत्री आहे. बिग बॉसमध्ये एन्ट्री केल्यानंतर ती जास्त चर्चेमध्ये आली होती. नोरा फतेहीने नुकताच आपला २८ वा वाढदिवस साजरा केला आहे. तिला दिलबर दिलबर या गाण्यासोबत साकी गाण्यामध्ये सुद्धा पाहिले गेले आहे. बॉलीवूडमध्ये आज नोरा फतेहीला एका वेगळ्याच अंदाजामुळे ओळखले जाते. तिने बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आज लागली आहे आइटम नंबर्सच लाईन

विशेषतः तिला हार्डी संधूचा म्युजिक अल्बम क्या बात है मधून जास्त ओळख मिळाली. ज्यानंतर तिच्याजवळ आइटम नंबर्सची लाईनच लागली. तिने यानंतर एकापेक्षा एक उत्कृष्ठ सुपरहिट डांस नंबर्स दिले आहेत. यामुळे आज नोरा फतेही लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. तरीही या अभिनेत्रीबद्दल अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लोकांना अजूनही माहिती नाहीत.

आयुष्यातील खास गोष्टी

नोरा फतेहीला कधी काळी वेटर म्हणून काम करावे लागले होते तर कधी आयुष्यामध्ये असे क्षणदेखील आले जेव्हा तिला लॉटरी देखील विकावी लागली होती. आज नोरा फतेहीच्या संघर्षाने भरलेल्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी आम्ही येथे सांगणार आहोत.

८ मुलींच्यासोबत शेयर केली रूम

बॉलीवूडमध्ये आज नोरा फतेहीची एक विशेष ओळख जरूर बनली आहे आणि तिचे लाखो चाहतेही झाले आहेत पण तिच्यासाठी बॉलीवूडचा हा प्रवास काही सोपा नव्हता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला आयुष्यामातील सर्वात जास्त काळ संघर्षामधून जावे लागले होते. जेव्हा ती आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष करत होती तेव्हा तिला पीजीमध्ये राहावे लागले होते. तिथे तिला आपली रूम आठ मुलींच्यासोबत शेयर करावी लागली होती. तिला हिंदी व्यवस्थित बोलता येत नव्हते. यामुळे देखील तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. या कारणामुळे तिच्यावर अश्लिल कमेंट्सही केल्या जात होत्या, जे ऐकून ती विचलित व्हायची.

याने केले होते अत्याचार

एक मुलाखतीदरम्यान नोराने सांगितले होते कि, तिच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये एक कास्टिंग एजंटसोबत तिची भेट झाली होती, जो तिच्यावर खूप अत्याचार करत होता. नोरा फतेहीने हे देखील सांगितले कि तिच्या चेहऱ्यावरुन आणि तिच्या शरीरावरून तो खूप वाईट कमेंट देखील करत होता. त्याचबरोबर तिची खिल्लीही उडवायचा.

कठोर ऑडिशन

नोराने सांगितले कि, याबद्दल तिला खूप वाईट वाटायचे परंतु तिला सर्व सहन करावे लागायचे कारण ती संघर्षाच्या काळामध्ये होती. तिने सांगितले कि तिला हिंदी येत नसल्यामुळे खूप समस्यांचा सामना करावा लागायचा. तिला वाटायचे कि हा तिच्यासाठी सर्वात कठीण काळ आहे. तो यासाठी कि लोक तिची कधी चेष्टा करायचे हे देखील तिला समजत नव्हते. ती हे देखील सांगते कि त्यावेळी ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार झाली नव्हती. यामुळे लोक तिला सहजपणे मूर्ख बनवत असत.

घरी येऊन खूप रडायची

फतेही वर लोक खूप वाईट कमेंट करायचे जे ऐकून ती खूप दुखी व्हायची. अनेक वेळा तर ती ऑडिशन देऊन घरी आली कि याच कारणामुळे रडत बसायची. तरीही तिने आपली हिम्मत नाही हरली आणि आपल्या करियरचा रस्ता बनवण्यासाठी कधीही मागे हटली नाही.

रूढीवादी आहे परिवार

नोरा फतेही अरबच्या ज्या कुटुंबाशी नाते ठेवते ते परिवार तिच्या मते खूपच रूढीवादी आहे. यामुळे तिला केवळ प्रोफेशनल लाईफमध्ये नाही तर घरामध्ये देखील खूप समस्यांचा सामना करावा लागला आहे. नोरा फतेही सांगते कि, आज ज्या डांसमुळे तिचे नाव आहे त्याचा सराव देखील तिला आपल्या रुममध्येचा करावा लागत असे. जेणेकरून कोणालाही हे कळू नये कि ती डांससुद्धा करते. याप्रकारे तिने रूम बंद करून इतके उत्कृष्ठ डांस स्टेप शिकले आहेत.

डांसमुळे चर्चेमध्ये

नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिला नुकतेच स्ट्रीट डांसर ३D मध्ये पाहिले गेले आहे. श्रद्धा कपूर आणि वरुण धवनसोबत ती या चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. सोशल मिडियावर देखील खूप अ‍ॅक्टिव असणारी नोरा फतेहीच्या डांसला स्ट्रीट डांसर ३D मध्ये खूपच प्रशंसा मिळाली होती. यामुळे ती सध्या खूपच चर्चेमध्ये आहे.