बायकोला कधीच नका सांगू ह्या ह्या 5 गोष्टी अन्यथा पश्चाताप..

Entertenment

आजपर्यंत एकमेकांशी मनमोकळेपणाने बोला संवाद साधा असा संदेश देणारे आज सांगत आहेत की चक्क या गोष्टी लपवा. हो आम्ही आज त्याच गोष्टी सांगणार आहोत कारण विषयच तसा आहे. लग्न करणे जितके सोपे आहे तितकेच आनंदी वैवाहिक आयुष्य जगणे तितकेच कठिण आहे. लग्नानंतर जेव्हा आपण एकाचे दोन व्हाल तेव्हा आपल्याला आपल्या जोडीदाराच्या आवडी-निवडीची काळजी घ्यावी लागते. बर्‍याच वेळा नात्यात लहान लहान गोष्टी मुळे मोठे भांडण होतात. अशा काही गोष्टी आहेत  ज्या नवऱ्याने कधीच आपल्या बायकोला सांगू नयेत.

जसं म्हणतात न की काही गोष्टी सांगितल्याने नातं टिकतं तसं काही गोष्टींबाबत मौन पाळल्याने सुद्धा नातं टिकतं कारण जर तुम्ही त्या सांगितल्या तर तुमच्या जोडीदाराला त्या गोष्टी पटतीलच असं नाही ना. त्यामुळे काही बाबतीत लपवा लपवी करणे फायद्याचे ठरते. स्वत: श्री कृष्ण म्हणून गेले आहेत की प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं. त्यामुळे आपल्या नात्यासाठी जोडीदाराच्या भल्यासाठी थोडं वेगळं वागलं तर त्यात गैर नाही.

चला तर जाणून घ्या कोणत्या या खास गोष्टी आहेत ज्या तुम्ही बायकोपासून लपवलेलेच चांगले राहील.

१. जर तुमचा कोठेतरी अपमान झाला असेल तर पत्नीला आपण आपल्या झालेल्या अपमानबद्दल सांगू नका. बहुतेक स्त्रिया भावनिक असतात आणि आपल्या पतीचा अपमान जाणून त्यांना धक्का बसेल. शक्य असल्यास स्वत: हून अशा समस्यांचा सामना करा. आपल्या अपमानाबाबत आपल्याला झालेले दुःख किंवा आलेला राग गिळून त्यावर प्रतिक्रिया देणे टाळा.

२. पतीने आपल्या पत्नीसमोर त्याच्या घरातील कुटूंबातील लोकांना वाईट बोलू नये. हे लक्षात ठेवा की पत्नीला फक्त आपल्याकडूनच आपल्या कुटुंबाबद्दलची माहिती मिळावी. तुमची तुमच्या कुटूंबाबद्दल धारणा चांगली असणे गरजेचे आहे. जर तुम्ही स्वताच तुमच्या कुटुंबाबद्दल पत्नी समोर वाईट बोलत असाल तर तुमची तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा कधीच आदर करणार नाही.

३. पतींनी आपल्या पत्नीसह कोणाच्या चारित्र्यावर बोट ​​ठेवू नये. गप्पा मारणे स्त्रियांच्या स्वभावात असते. जर त्यांच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडले तर कोणत्याही अर्थविना मतभेदाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

४. पतीने या गोष्टीची नेहमी काळजी घेतली पाहिजे की पत्नीची इतर स्त्रियांशी तुलना केलेली पत्नींना कधीच सहन होत नसते. त्यामुळे कधीच आपल्या पत्नीची इतर कोणाबरोबर तुलना करू नये. पण आपल्या पत्नीचे कौतुक करयला विसरू नका यामुळे आपले प्रेम वाढेल.

५. प्रत्येक व्यक्तीचे त्याच्या पालकांवर खूप प्रेम असते. पत्नीच्या पालकांकडे कधीही दुर्लक्ष होऊ नये. कधीही पत्नीच्या माहेरच्या माणसांना वाईट बोलू नये यामुळे आपल्या पत्नीच्या कोमल हृदयास दुख पोहचू शकते. त्यामुळे शांत राहून त्या व्यक्तींबद्दल खोटं खोटं का होईना चांगलं बोललेलंच बरं असतं अशामुळे न तुमच्यात भांडण होईल आणि नातं सुद्धा हसतं खेळतं राहील.

आनंद असो वा दुःख माणूस भावनेच्या भरात आपल्या मनातील भावना चटकन व्यक्त करतो. भावनाप्रधान असणं हे माणसाला मिळालेलं वरदान असलं तरी कधीतरी हेच आपल्यासाठी धोक्याचं ठरु शकतं. तर मित्रानो या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही केल्या नाहीत तर तुमचं नातं अजून चांगलं राहू शकतं.