बालिका वधूच्या आनंदीने निवडला आपला जीवनसाथी, स्वतःपेक्षा १८ वर्षाने मोठ्या या मुलासोबत करणार आहे लग्न…..

Bollywood

बालिका वधू छोट्या पडद्यावरील अशी सिरीयल आहे जी अनेक वर्षे सुरु राहिली. हा शो २१ जुलै २००८ ला प्रसारित झाला होता आणि ३१ जुलै २०१६ ला याचा फाईनल एपिसोड प्रसारित करण्यात आला होता.

त्यावेळी टीआरपी मध्ये या सिरीयलने इतर सिरियल्सला खूप मागे टाकले होते. या सिरीयलमध्ये दाखवले गेले होते कि कसे एक छोटी मुलगी आनंदीचे लग्न मोठ्या परिवारामध्ये जगदीशसोबत केले जाते.

हा शो बाल विवाहच्या कांसेप्टवर आधारित होता. शोमध्ये दाखवले गेले होते कि बाल विवाहनंतर आनंदीला कशाप्रकारे अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. हा शो दर्शकांना खूपच पसंत आला आणि सर्वात जास्त जिला पसंत केले गेले होते ती होती लहान मुलगी आनंदी.

आनंदीने आपल्या निरागसतेने दर्शकांचे मन जिंकले होते. आनंदीची भूमिका अविका गोरने उत्कृष्ठरित्या साकारली होती. तिने आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने या भूमिकेला योग्य न्याय दिला होता. लहानपणीचा सीक्वेंस पूर्ण झाल्यानंतर आनंदीने शो सोडला होता.

यानंतर ती जेव्हा पडद्यावर आली तेव्हा दर्शक तिला बघून हैराण झाले. काही वर्षातच ती लहानगी मुलगी एक मोठी आणि मॅच्योर मुलीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली. अविका गोरने ससुराल सिमर का मध्ये रोलीची प्रसिद्ध भूमिका साकारली. आता अशा बातम्या समोर येत आहेत कि काही दिवसांमध्ये अविका लग्न करणार आहे.

याच्यासोबत झाले आहे प्रेम

मीडिया रिपोर्टनुसार अविका लवकरच मनिष रायसिंघानी सोबत लग्न करणार आहे. मनिष रायसिंघानी ससुराल सिमर का मध्ये तिच्या पतीची भूमिका साकारत आहे.

शोच्या शुटींग दरम्यान दोघांचे एकमेकांवर प्रेम जुळले आणि आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अविका आणि मनीष नेहमी अनेक इवेंट्समध्ये एकत्र पाहायला मिळतात आणि त्यांनी आपले हे प्रेम मिडियापासून कधीच लपवले नाही.

मनीष रायसिंघानी टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेता आहे आणि छोट्या पडद्यावर तो अनेक वर्षे काम करत आहे. मनीष अविकापेक्षा १८ वर्षाने मोठा आहे. जिथे अविकाचे वय २१ वर्षे आहे तर मनीष ३९ वर्षांचा आहे. असा अंदाज वर्तवला जात होता कि २०१९ मध्ये ते लग्न करणार होते परंतु तसे झाले नाही.

अविका आणि मनीष एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत आहेत आणि अशामध्ये दोघांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची खूप उत्सुकता आहे. सिरीयलमध्ये तर ते पति-पत्नीची भूमिका साकारत आहेत पण आमची इच्छा आहे कि रियल लाईफमध्ये सुद्धा त्यांची जोडी सिरीयल सारखी हिट व्हावी.

सध्या अविका कोणत्याही शोमध्ये काम करत नाही आणि २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या उय्याला जम्पाला चित्रपटामध्ये ती पाहायला मिळाली होती. चित्रपटामध्ये दर्शकांनी तिला खूपच पसंती दिली होती. आजच्या या पोस्टमध्ये आम्ही अविका आणि मनिषचे काही सुंदर फोटो घेऊन आलो आहोत जे पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा हेच म्हणाल कि खरेच यांची जोडी रब ने बनायी है.