डेविड वॉर्नर आणि कोहलीच्या ह्या फोटोमध्ये असे काय आहे कि ज्यामुळे बघणाऱ्यांना लाज वाटली ..?

Daily News

डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे. नुकतेच त्याला एक पुरस्कार मिळाला. त्याला एलन बॉर्डर मेडल हा पुरस्कार मिळाला हा पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू म्हणून त्यास देण्यात आला आहे.

वार्षिक या पुरस्कार कार्यक्रमात एलीज पेरी सुद्धा दिसली. ती एक क्रिकेटरही आहे तिलाही पुरस्कार मिळाला. तिला बेलिंडा क्लार्क मेडल हा पुरस्कार मिळाला हा वर्षाच्या सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा वार्षिक पुरस्कार असतो. या दोघांनीही तिसऱ्यांदा हे पदक जिंकले.

त्यांनी एकत्र फोटो काढले हा त्यांचा फोटो आहे.

आता दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात काय छापले गेले ते पहा.

दोघांची जागा बदलण्यात आली असून डेव्हिडला उंच दाखविण्यात आले आहे. खर तर एलीज ही डेव्हिड पेक्षा खूप उंच असल्याने तिला एडिट करून छोटे केले गेले होते ज्यामुळे डेव्हिड फोटोत उंच दिसू शकेल.

एखाद्या कमी उंचीच्या माणसाला उंच करण्यासाठी हा जुगाड करण्याची ही पहिली वेळ नाही. क्रिकेटर विराट कोहली एका घड्याळाची जाहिरात करायला आला. करमण कौर ही देखील त्याच्यासमवेत उपस्थित होती.

ती एक टेनिस स्टार आहे. आता विराट उंचीने करमनसमोर छोटा दिसत होता. म्हणून तो एका व्यासपीठावर उभा राहिला जेणेकरून फोटो मध्ये करमण पेक्षा तो उंच दिसेल.

या फोटोसाठी विराटला ट्रोल केले होते. याचा त्याला खूप राग आला.

अजून एक खेळाडू आहे. किक अरंडीझ. त्याचेही फोटोज व्हायरल झाले. यात तो रिपोर्टर केली टेनंटशी बोलत आहेत. फोटो मध्ये तो बादलीवर उभा आहे. कारण केली त्याच्यापेक्षा खूप उंच आहे.

फोटोवर जोरदार टीका झाली होती पण केली नंतर म्हणाली की हा त्यांच्यातला एक विनोदच होता.

लोकांनी सांगितले की हे टॉक्सिक पुरुषत्व विषारी मर्दानीपणाचे एक उदाहरण आहे की एखाद्या खेळाडूला  एखाद्या रिपोर्टरसमोर समान दिसण्याचा मोह सोडता येत नाही.

पण जेव्हा त्यांचे फोटोज व्हायरल झाले तेव्हा केली नंतर म्हणाली की ही त्यांच्यात एक विनोद होता. ज्यामध्ये मनाने काहीच केले गेले नव्हते.

फक्त खेळातच नाही. ही गोष्ट बॉलिवूडमध्येही पाहायला मिळते. असे वाचले आहे की सुष्मिताला बीवी नंबर 1 च्या शूटिंगदरम्यान फ्लॅट चप्पल घालायला सांगितले होते जेणेकरुन ती सलमान खान पेक्षा उंच दिसू नसे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार ज्या कलाकारांची उंची सरासरी मानली जाते ते उंच दिसण्यासाठी बर्‍याच युक्त्या करतात. ते विशेष लिफ्ट शूज बनवून घेतात ज्यामुळे उंची दोन ते तीन इंच वाढते. अशा शूज मुळे सुमारे दोन ते अडीच इंच उंची वाढवता येते. अशा प्रकारे त्यांची उंची पाच इंचांपर्यंत वाढते.

आम्हाला प्रेमी जोडप्यांना एखाद्या रोमान्स कादंबरीप्रमाणे नेहमीच अशा जोडप्यासारखे पाहायचे असते एखाद्या चित्रपटाप्रमाणे मुलगा उंच आणि मुलगी दुबळी आणि गोरी असणे अनिवार्य आहे. मुलाची उंची जर मुलीपेक्षा कमी असेल तर ती मुलांच्या पुरुषत्वावर वार झाल्यासारखे दिसते.

राजपाल यादव बर्‍याचदा कॉमिक रोलमध्ये दिसतात. त्याची उंची येथे वापरुन एक महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. २००५ मध्ये आमच्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा चित्रपट आला मैं मेरी पत्नी और वो हा चित्रपट तुम्ही एकदा बघवा.