बाॅलिवूडचा सर्वात उत्तम अभिनेत्यांपैकी एक मानला जाणारा अभिनेता म्हणजे अर्जून कपूर होय. अभिनेता अर्जून कपूरने 2012 मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रासोबता ‘इश्कजादे’ या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अर्जुन कपूर सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. तसेच, सोशल मीडियावर त्याने पोस्ट करताच चाहते लाईक आणि कमेंटचा पाऊसच पाडत असतात.
सोशल मीडियावर अर्जूनचा प्रचंड मोठी चाहता वर्ग आहे. अर्जुन कधी त्याच्या दमदार कामगिरीमुळे तर कधी त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत येतो. यावेळी देखील बॉलिवूड चित्रपटांच्या विरो’धात सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘बॉयकॉट’ ट्रेंडवर अभिनेता अर्जुन कपूरने सं’ताप व्यक्त केला आहे. सध्या बॉलिवूड चित्रपटांवर ब’हिष्का’र टाकण्याचा ट्रेंड सुरू आहे.
बड्या कलाकारांचे सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर प्रेक्षक ब’हिष्का’राचा ट्रेंड चालवत आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूड कलाकार आणि चित्रपटाशी संबं’धित लोकांच्या अडचणी प्रचंड वाढत आहेत. आता अभिनेता अर्जुन कपूरने बॉयकॉटच्या ट्रेंडवर मौन सोडले, पण तो स्वत: ट्रोल झाला.
अर्जुन कपूरने बॉलीवूडच्या बॉयकॉटबाबत सध्या सुरू असलेल्या ट्रेंडवर नाराजी व्यक्त केली आहे. बॉलीवूड हंगामाशी नुकत्याच झालेल्या संभाषणात अर्जुनने बॉयकॉट बॉलीवूड ट्रेंडचा जोरदार निषे’ध केला. ‘मला वाटतं आपण त्याबद्दल गप्प राहून चूक केली आणि लोकांनी त्याचाच गै’रफायदा घ्यायला सुरुवात केली आहे.’ असे यावेळी बोलताना अर्जून कपूर म्हणाला.
तसेच, पुढे बोलताना अर्जून कपूर म्हणाला की, इंडस्ट्रीतील लोकांनी एकत्र येऊन याबद्दल काहीतरी करण्याची गरज आहे. कारण लोक त्यांच्याबद्दल काय लिहितात किंवा ते ज्या हॅशटॅगचा ट्रेंड करतात ते वास्तवापासून दूर असतात आणि जेव्हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतात तेव्हा लोक त्यांना आवडत नाहीत.
अभिनेत्यांच्या आडनावांमुळे चित्रपटांवर ब’हिष्का’र टाकणे चुकीचे आहे. लोक चिखल फेकत राहिले, तर नवीन गाडीचीही थोडी चमक कमी होईल, नाही का? आम्ही खूप चिखलाचा सामना केला. दरम्यान, अर्जुनच्या या वक्तव्यावर लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर लोक अर्जुनला सत्य सांगत आहेत.
अर्जुनला ट्रोल करताना एका यूजरने त्याचे आतापर्यंतचे सर्व फ्लॉप चित्रपट मोजले आहेत. वापरकर्त्याने लिहिले – अर्जुन कपूरने बाॅलिवूड इंडस्ट्रीला करिअरमध्ये हिटपेक्षा जास्त फ्लॉ’प चित्रपट दिले आहेत. तर दुसरीकडे दुसऱ्या युजरने लिहिले की, तुझ्या चित्रपटांपेक्षा तुला फक्त मलायका अरोराच्या बॉयफ्रेंडच्या नावाने ओळखले जाते.
तसेच ‘एक व्हिलन 2’ या चित्रपटात काम केल्यानंतर अर्जून कपूरची चाहत्यांनी खूप प्रशंसा केली. हा चित्रपट 2014 मध्ये रिलीज झालेल्या ‘एक व्हिलन’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. तर अर्जून कपूर आगामी चित्रपट ‘अनटोल्ड’ आणि अजय बहलच्या ‘द लेडी किलर’मध्ये झळकणार आहे.