अर्जुन कपूर आणि मलाईका करणार ह्या दिवशी लग्न, इथे होणार रिसेप्शन, तयारी झाली सुरु

Bollywood

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलाईका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचे नाते कोणापासूनहि लपून राहिलेले नाही. जसेजसे दिवस जात आहेत तसेतसे या दोघांमधील प्रेम आणखीनच वाढत चालले आहे. इतकेच नव्हे तर संपूर्ण बॉलीवूडमध्ये ह्या जोडीच्या प्रेमाच्याच चर्चा होत आहेत.

सूत्रांच्या बातमीनुसार लवकरच हे जोडपे विवाह बंधनामध्ये अडकणार आहे. होय आश्चर्यचकित होऊ नका. मलाईकाने स्वतः याचा खुलासा केला आहे ती लवकरच अर्जुनसोबत ह्या वर्षी येणाऱ्या काही महिन्यामध्ये लग्न करणार आहे. मलाईकाने ह्या गोष्टीची माहिती टीमला दिली आहे.

प्राईवेट ठेवणार आहे लग्न

तथापि असेही ऐकण्यात आले आहे कि बॉलीवूडच्या या अभिनेत्रीला आपले लग्न प्राईवेट ठेवायचे आहे. याचबरोबर आपल्या लग्नाचे रिसेप्शन ती मुंबईमधील एका हॉटेलमध्ये देणार आहे.

या दोघांच्या फॅमिलीचे सुद्धा खूपच चांगले रिलेशन निर्माण झाले आहे आणि मलाईकासुद्धा जास्तकरून अर्जुनसोबत अनेक पार्टीमध्ये आपल्या पाहायला मिळाली आहे.

दोन्ही कुटुंबांकडून मिळाली संमती

बॉलीवूडच्या या लव बर्ड्सला त्यांच्या कुटुंबियांकडून या लग्नासाठी संमती मिळालेली आहे. तथापि, असे ऐकण्यात आले होते अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर यांची मुळीच इच्छा नव्हती कि मलाईका त्यांच्या कुटुंबाची सून व्हावी.

परंतु मुलाच्या हट्टापुढे बोनी कपूरला सुद्धा मान्य करावे लागले आहे. ज्यामुळे मलाईका आपला जास्त वेळ अर्जुनच्या फॅमिलीसोबत घालवत आहे.

२०१७ मध्ये अरबाजसोबत घेतला होता घटस्फोट

मलाईकाने आपल्या पहिल्या लग्नापासून घटस्फोट घेतला आहे. परंतु अरबाजपासून वेगळे झाल्यानंतरहि तिचे त्याच्यासोबत चांगले संबंध आहेत. तथापि वेगळे झाल्यावर देखील या दोघांना आपल्या मुलासाठी एकत्र येताना अनेक वेळा पाहिले गेले आहे.

या सर्वांमध्ये हे पाहणे खूप उत्सुकतेचे असेल कि मलाईला अर्जुनच्या नावाची मेहेंदी कधी लागते. अशा पण बातम्या समोर आल्या आहेत कि हे कपल येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये विवाह बंधनामध्ये अडकणार आहे.