प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अर्चना जोगळेकर सध्या करते हे काम, तिचे पती कोण आहेत, जाणून घ्या…

Marathi Cinema

मराठी अभिनेत्री अर्चना जोगळेकर हि ९० च्या दशकातील मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री राहिली आहे. 

एका पेक्षा एक, रंगत संगत, अनपेक्षित, निवडुंग , संसार यासारख्या हिट चित्रपटांमध्ये तिने महत्वाची भूमिका साकारली आहे. अर्चना जोगळेकर हि एक उत्कृष्ठ नर्तिका देखील आहे.

प्रसिद्ध नृत्य शिक्षिका आणि तिची आई आशा जोगळेकरच्या मार्गदर्शनाखाली तिने नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. अनेक इव्हेंट आणि चित्रपटांमध्ये काम करताना अर्चना आणि निर्मल यांची भेट झाली होती. निर्मल हे कोण आहेत आणि काय करतात चला तर जाणून घेऊया.

निर्मल मुळ्ये हे अमेरिकेमधील नॉस्ट्रम फार्मासिटीकल्स कंपनीचे संस्थापक आहेत. महाराष्ट्रातील संगमेश्वर ह्या छोट्याशा गावातून आलेले निर्मल मुळ्ये यांनी मुंबई युनिव्हर्सिटी मधून बीएसची पदवी संपादन केली आहे.

तर पुढील शिक्षण त्यांनी टेम्पल युनिव्हर्सिटी मधून घेतले आहे. फार्मासिस्ट मधील एक नामी संशोधक म्हणून त्यांची जगभरामध्ये ओळख आहे.

सायनोव्हिक्स फार्मासिस्ट मध्ये त्यांनी चीफ सायंटिस्ट म्हणून देखील काम केले आहे. डॉ निर्मल मुळ्ये हे अभिनेत्री अर्चना जोगळेकरचे पती आहेत.

ज्यावेळी निर्मल हे आपल्या भावाच्या लग्नासाठी मुंबईला आले होते त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना लग्नासाठी विचारून अर्चना जोगळेकरचे नाव सुचवले होते.

अर्चना त्यावेळी आपल्या करियरच्या उच्च शिखरावर होती आणि ती माझ्यासोबत लग्न करणार नाही म्हणून त्यांनी हा विषय टाळून नेला.

त्यावेळी एका इव्हेंटमध्ये अर्चना आणि शोभा मुद्गल यांना परफार्म करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यादरम्यान कार्यक्रमाचे आयोजक निर्मलला घेऊन तिथे पोहोचले.

पण परफॉर्मन्स असल्याकारणामुळे अर्चनाने त्यांना तिथेच थांबायला सांगितले. कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आयोजकांनी अर्चना आणि निर्मल यांची भेट घडवून आणली. त्यावेळी निर्मल यांनी आपले व्हिजिटिंग कार्ड अर्चनाला दिले.

त्यावर पीएचडी आणि नॉस्ट्रम फार्मासिटीकल्स चे प्रेसिडेंट असे पाहिल्यानंतर अर्चनाने पुढे भेटण्यासाठी उत्सुकता दाखवली. याआधी अर्चनाने अनेक जणांना नकार दिला होता.

पण निर्मल यांची कामगिरी समजल्यानंतर त्यांनी पुढील भेटीसाठी संमती दाखवली. त्यानंतर अवघ्या पाच-सहा दिवसांतच अर्चनाने आपल्या वडिलाना फोन करून लग्नाची संमती दिली.

आपली मुलगी कोणासोबत लग्न करणार आहे याची उत्सुकता तिच्या वडिलांनादेखील लागली होती. पण जेव्हा नृत्य म्हणजे सर्वस्व मानणारी आपली मुलगी एका परदेशी मुलाशी लग्न करणार आहे

हे तिच्या वडिलांना समजले त्यावेळी ते खूपच चकित झाले. २५ जानेवारी १९९९ रोजी अर्चना आणि निर्मल यांची पहिली भेट झाली त्यानंतर १३ फेब्रुवारीला एका इवेंटसाठी अर्चनाला अमेरिकेला जावे लागले होते.

तिथेही तिने निर्मल यांची भेट घेतली आणि त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी निर्मल यांनी अर्चनाला लग्नाची मागणी घातली. काही महिन्यांमध्येच अर्चना आणि निर्मल यांनी लग्न केले.

अर्चना सध्या अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये स्थायिक झाली आहे आणि ती तिथे नृत्याचे क्लासेस चालवते. अनेकवेळा ती भारतामध्ये येऊन आपली कला सादर करत असते. अर्चना आणि निर्मल यांना एक मुलगा आहे आणि त्याचे नाव ध्रुव आहे.

ध्रुव एक उत्कृष्ट तबला वादक आहे. श्रीपाद जेल, पं मुकुंदराज देव, पं किशनमोहन महाराज यांच्याकडून त्याने तबल्याचे प्रशिक्षण घेतले आहे. आपली आई अर्चनासोबत तो भारतामध्ये येऊन आपली कला सादर करत असतो.