प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा ‘दोबारा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे अनुराग कश्यप सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नूची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट ‘मिराज’ या स्पॅनिश चित्रपटचा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याचं प्रचंड कौतुक होताना दिसत आहे.
या चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत. मात्र अनुराग कश्यप यावर नाराज असल्याचे दिसून येतंय. मागच्या काही दिवसांपासून आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारच्या ‘रक्षाबं’धन’वर ज्याप्रमाणे नेटकर्यानी ब’हिष्का’र टाकला आहे. सोशल मीडियाबद्दल बोलायचे झाले, तर आजकाल बॉलीवूड चित्रपट आणि स्टार्सवर ब’हिष्का’र टाकण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.
अनुराग कश्यपने पुन्हा नव्या युगाचा ट्रेलर चित्रपट आणला असून हा चित्रपट टाइम ट्रॅव्हलवर आधारित असल्याने प्रेक्षकही या चित्रपटाकडे आकर्षित होत आहेत. 19 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वी नेटिझन्सनीही या चित्रपटाचा समाचार घेतला होता. तसेच, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेत्री आणि दिग्दर्शकाची ही विनंती नेटकऱ्यांनी चांगलीच स्वीकारली असून ब’हिष्का’र टाकण्याचे आवाहनही केले आहे.
त्याचप्रमाणे अनुराग कश्यप यांच्या चित्रपटावरही ब’हिष्का’र टाकावा, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे. चित्रपटांच्या ब’हिष्का’राच्या ट्रेंडवर प्रतिक्रिया देताना अनुराग कश्यप म्हणाला, ‘मला यामुळे बाहेर टाकल्यासारखं वाटतंय. कोणाचंही माझ्याकडे किंवा माझ्या चित्रपटाकडे लक्ष नाही. मलाही वाटतंय की माझ्या चित्रपटावर ब’हिष्का’र घालायला हवा.
तसेच, कृपया ट्विटरवर माझ्या चित्रपटावर ब’हिष्का’र टाकण्याचा हॅशटॅग ट्रेंड करा. यावर तापसी पन्नूही अनुराग कश्यपचा पाठिंबा देत म्हणाली, ‘हो, कृपया ‘बॉयकॉट दोबारा’ सोशल मीडियावर ट्रेंड करा. आम्हाला ट्विटरवर ट्रेंड व्हायचं आहे.
तसेच, ५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळेल अशी अपेक्षा होती. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगले कलेक्शन केले. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या अहवालानुसार, ‘दोबारा’ची ओपनिंग अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे. तापसी पन्नूचा मागील चित्रपट ‘शाबाश मिठू’ने चांगली ओपनिंग केली होती. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 72 लाखांची कमाई केली आहे.
दरम्यान, दोबारा’ या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. हा चित्रपट मेलबर्नचा इंडियन फिल्म फेस्टिव्हल, फॅन्टासिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि लंडन फिल्म फेस्टिव्हल यांसारख्या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला. येथे त्याला स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळाले.
चित्रपट ‘दो बारा’ मध्ये अभिनेत्री तापसी पावेल एकत्र झळकणार आहेत. २०२०मध्ये देखील तापसी आणि पावेल एकत्र दिसले होते. त्यांच्या ‘थप्पड’ या चित्रपट प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. तर अभिनेत्री तापसी पन्नूसोबत दोबारा या चित्रपटात पावेल गुलाटी आणि राहुल भट यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, तापसी आणि अनुरागच्या ‘दोबारा’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी थिएटरमध्ये फक्त २-३ टक्के प्रेक्षक संख्या अनुभवली.