अमृता सिंग मुळे समोर आले सनी देओलच्या लग्नाचे रहस्य, जवळपास 35 वर्षानंतर समोर आली अभिनेत्याची पत्नी..

Bollywood

बॉलिवूडच्या दमदार अ‍ॅक्शन हिरोंच्या यादीत अव्वल क्रमांकावर असलेला सनी देओल चा 19 ओक्टोम्बर या दिवशी वाढदिवस असतो, सनी चे इतक्या मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत कि त्यांच्या चाहत्यांना त्याच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायला फार आवडते.

अलीकडेच सनी देओल यांनी प्रथमच लोकसभा निवडणुका लढवल्या, त्यामध्ये तो जिंकला, त्यानंतर तो खासदार बनला, परंतु आजही लोकांना त्याच्या अफेअर आणि फॅमिलीसारख्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्याची आवड आहे. या लेखामध्ये आज आम्ही तुम्हाला त्यांची पत्नी पूजा बद्दल माहिती सांगनार आहोत, जी 35 वर्षानंतर माध्यमांसमोर आली.

बॉलिवूड अभिनेता सनी देओल दिसायला खूप रोमँटिक आणि सुंदर होता, ज्यामुळे त्याचे अनेक अभिनेत्रींशी अफेयर होते. डिंपल आणि अमृता सिंग यांचे नावही या लिस्ट मध्ये समाविष्ट आहे.

सनी देओलची अमृता सिंगसोबत लग्न झाल्याचीही चर्चा होती, परंतु त्यांच प्रेमप्रकरण उघडकीस आल्यामुळे आणि त्यानंतर अमृता सिंगच्या आईने लग्न करण्यास नकार दिल्याने हे लग्न झाले नाही. खरं तर, सनी देओलची चौकशी दरम्यान अमृता सिंगच्या आईला अशी काही बातमी मिळाली कि त्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिने लग्नाला त्वरित नकार दिला.

यामुळे अमृता सिंगसोबतचे नाते तुटले

अमृता सिंगच्या आईला सनी देओल आवडत नव्हता पण मुलीच्या आनंदासाठी तिने या नात्याला होकार दिला. अशा परिस्थितीत तिने सनी देओलसोबत लग्न निश्चित होण्यापूर्वीच तपास केला, आणि त्यात सनी देओल हा आधीच विवाहित असल्याचे उघड झाले.

आणि त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. अमृता सिंगच्या आईने म्हटले होते की सनी देओलची पत्नी लंडनमध्ये राहते, जिचे नाव पूजा आहे. त्यानंतर अमृता सिंगनेही सनी बरोबर सं बंध ठेवण्यास नकार दिला.

या कारणामुळे लग्नाची बातमी ठेवली होती लपवून.

सनी देओलने पूजाबरोबरचे लग्न अनेक वर्ष लपवून ठेवले होते, त्यामागचे कारण असे होते की तिला लाइमलाईट जीवनापासून दूर रहायचे होते आणि सनीच्या कारकीर्दीचा प्रश्न होता. अशा परिस्थितीत 1984 मध्ये त्यांच्या लग्नाची बातमी समोर आली आणि त्यानंतर प्रत्येकाच्या पायाखालची जमीन घसरली.

कृपया तुम्हाला सांगू इच्छितो की सनी देओल आणि पूजा यांना दोन मुले आहेत, ज्यांची नावे करण आणि राजवीर असे आहेत. नुकताच सनी देओलचा मुलगा करण देओलने पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

मुलासाठी जगासमोर आली पूजा

लग्नानंतर बर्‍याच वर्षांपासून माध्यमांपासून लपून राहिलेल्या पूजाला अखेर आपल्या मुलाच्या प्रेमामुळे बाहेर यावे लागले. अशा परिस्थितीत ती पहिल्यांदा आपल्या मुलाच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती,

त्यानंतर ती सोशल मीडियावर लोकप्रिय झाली. असे म्हटले जाते की 35 वर्षांनंतर पूजा कॅमेर्‍यामध्ये दिसली. वास्तविक, पूजाला लाइमलाइटचे जग अजिबात आवडत नाही, यामुळे ती दूर राहते.