अक्षय-अजयला रणवीर सिंहने बघायला लावली वाट, येताच पाया पडून मागितली माफी…

Bollywood

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या सूर्यवंशी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरबाबतही सर्वांना उत्सुकताच होती. चित्रपटात अक्षय एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकण्यासाठी आला आहे.

येत्या २४ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा सोहळा दिमाखात पाडला. ट्रेलर लॉन्चसाठी चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली. या ट्रेलर सोहळ्याचा मुख्य आकर्षण होता अर्थातच अक्षय कुमार. अक्षयची धमाकेदार अशी एन्ट्री झाली. बाईक वरून एन्ट्री करत अक्षयनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

रोहित शेट्टी च्या कॉप युनिव्हर्समध्ये सूर्यवंशी या तिसर्‍या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या कॉप ड्रामामध्ये अक्षय कुमार सुपर कॉपच्या भूमिकेत दिसला आहे. 4  मिनिटांच्या या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

या फ्रेंचायझी च्या पहिल्या दोन चित्रपटांचे सुपरस्टार्सही म्हणजे रणवीर सिंग आणि अजय देवगण  चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग दरम्यान पोहोचले होते. पण रणवीर सिंगला सूर्यवंशी ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये येण्यास उशीर झाला होता. अक्षय अजय रोहित आणि करण जोहर त्याची वाट पाहत राहिले. अशा परिस्थितीत जेव्हा तो कार्यक्रमात पोहोचला तेव्हा त्याने सर्वांच्या पायाला स्पर्श केला आणि दिलगिरी व्यक्त केली.

ट्रेलर लॉन्चवेळी सिंघम साकारणारा अजय देवगण आणि सिम्बा साकारणारा रणवीर सिंहही उपस्थित होता. मात्र रणवीर या कार्यक्रमाला उशीरा पोहोचला त्यावर अक्षय कुमारने त्याला खूप खेचले.

या सर्व स्टार्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय म्हणतो की हा पहिला ज्युनिअर अभिनेता आहे जो चार ज्येष्ठ कलाकारांना 40 मिनिटे वाट बघयला लावतो. व्हिडिओमध्ये रणवीर कान पकडताना आणि भेटताना दिसत होता.

तर रणवीरने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की मी खूप दुरून आलो आहे सर मेट्रोचे काम चालू आहे तिथे फक्त एक लाईन चालू होती. व्हिडिओमध्ये रोहित शेट्टी कतरिना कैफ आणि करण जोहरही बरीच मस्ती करताना दिसत होते.

या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट आहे की या चित्रपटात जबरदस्त एक्शन देखील असेल. अक्षय आणि कतरिना या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दोघांनी बर्‍याच वर्षानंतर एकत्र काम केले आहे. अजय देवगन आणि रणवीर सिंग यांचीही या चित्रपटात विशेष भूमिका आहे. हा चित्रपट 24 मार्चला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल.

आज याचा ट्रेलर प्रदर्शित झाला तो प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत कतरिना कैफ, अजय देवगण, रणवीर सिंह यांचा महत्त्वाच्या भूमिका आहेत.

ट्रेलरची सुरुवात अजय देवगणच्या मुंबई हिंदुस्थान का दिल या वाक्याने होते. नंतर समोर येतो अक्षयकुमार. चित्रपटातील – मुंबई पोलीस पासपोर्ट पे रिलिजन देख के गोळी नाही चलाती  हा संवाद हिट ठरणार आहे. चित्रपटाचे कथानक मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवर आधारित आहे.

या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. मुंबईत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. आणि ही शक्यता रोखण्यासाठी अक्षय कुमारचे आगमन होते. 1993 साली झालेल्या बॉम्ब स्फोटात केवळ एक किलो विस्फोटकं वापरण्यात आली होती.

आजही मुंबईत 600 किलो विस्फोटकं कुठेतही लपवून ठेवण्यात आली आहेत. ही विस्फोटकं शोधण्याच काम अक्षय कुमार करताना या ट्रेलरमध्ये दिसत आहे. अक्षय, अजय आणि रणवीरसह अभिनेत्री कतरिना कैफ आणि जावेद जाफरी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. ट्रेलरवरुन चित्रपटाविषयीची उत्कंठा नक्कीच वाढत आहे.