आकाश अंबानी यांनी आई समोर श्लोका बद्दलचे प्रेम व्यक्त केले होते..

Daily News

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​मालक आणि अध्यक्ष मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांना पत्नी नीता अंबानी सोबत त्यांना मुलगी ईशा अंबानी आणि दोन मुले आहेत. मुकेश आणि नीता अंबानी यांच्या लहान मुलाचे नाव अनंत अंबानी आणि मोठ्या मुलाचे नाव आकाश अंबानी आहे.

मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याने उद्योगपती रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहताशी लग्न केले आहे. श्लोका आणि आकाशचे लव्ह मॅरेज आहे. ९ मार्च २०१९ रोजी श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांचे शाही पद्धतीने ते लग्नाच्या अतूट बंधनात बांधले गेले होते.

आकाश आणि श्लोकाच्या लग्नाबद्दल आकाश अंबानीची आई नीता अंबानी यांनी या दोघांच्या लग्नाबद्दल दिलखुलासपणे सर्व काही शेअर केले आहे. आकाशने आईकडे म्हणजेच नीता अंबानीकडे त्याचे श्र्लोकवर असलेले प्रेम सांगितले होते असे नीता अंबानीने सांगितले आहे. तर आम्ही तुम्हाला याबद्दल आणखी काही माहिती सांगणार आहोत.

१.आकाश आणि श्लोका लहानपणापासूनच चांगले मित्र होते:- उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी इंग्रजी मासिक फेमिनाला दिलेल्या मुलाखतीत आपला मुलगा आकाशच्या लग्नाबद्दल सांगितले आहे. ते म्हणजे, आकाश आणि श्लोका दोघेही लहानपणापासूनच खूप चांगले मित्र आहेत.

त्यानंतर त्यांना विचारले गेले जेव्हा तुम्हाला हे आधीच माहित होते की श्लोका आणि आकाश वर्षानुवर्षे चांगले मित्र आहेत तेव्हा आपणास कधीच वाटले नव्हते की या दोघांचे लग्न देखील होऊ शकते?

यावर नीता अंबानीने उत्तर दिले की श्लोका नेहमीच मला काकू म्हणत असत आणि लग्नानंतरही ती मला काकू म्हणते कारण श्लोका माझी मुलगी ईशाच्या बालवाडीपासूनची चांगली मैत्रीण आहे.

याबद्दल अधिक बोलताना नीता अंबानी म्हणाली की मला या दोघांच्या मैत्रीबद्दल आधीच माहित होते. याशिवाय जेव्हा दोघे शाळेत एकत्र होते तेव्हा मला आकाश आणि श्लोकाच्या ना त्याबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर श्लोका आणि आकाश परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेले होते. आकाश अंबानी ब्राऊन विद्यापीठात गेला होता तर श्लोका प्रिसटन विद्यापीठात गेली होती.

२.आकाशने स्व:ताहून त्यांच्या आणि श्लोकाबद्दल सांगावे अशी नीता अंबानींची इच्छा होती:- या दोघांच्या नात्याबद्दल नीता अंबानीला आधीच माहिती होती. मात्र नीता अंबानी याची वाट पाहत होते जेव्हा आकाश स्वत: येऊन या सर्व गोष्टी त्यांना सांगेल.

आकाश स्व:ता समोर येवून मला श्लोका आवडते आणि मला तिच्याबरोबर लग्न करायचे आहे असे सांगावे अशी नीता अंबानी यांची इच्छा होती. नीताने सांगितले की जेव्हा दोघे परदेशातून परत आले तेव्हा आकाश अचानक माझ्याकडे आला. तो माझ्याकडे आला आणि स्वतःबद्दल आणि श्लोकाबद्दल बोलू लागला.

आकाश अंबानीने आपल्या आईला सांगितले की त्याला श्लोका मेहता आवडते आणि त्याला पूर्ण आयुष्य तिच्याबरोबर घालवायचे आहे. आकाशने सर्व काही आपल्या मनातलं सांगल्यानंतर नीता अंबानीने या ना त्यास होकार दिला. त्यानंतर आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचे २०१९ मध्ये लग्न झाले.