प्रत्येकाच्या जीवनात विवाह हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जातो. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी लग्न करतो तेव्हा आयुष्याला एक महत्त्वपूर्ण वळण येते.
आज आम्ही तुम्हाला अशा काही टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्रीबद्दल सांगणार होत की ज्यांनी अद्याप लग्न केलेले नाही. त्यांचे लग्नाचे वय गाठून खूप वेळ निघून गेला आहे परंतु आजही त्या अविवाहित आहेत. या अभिनेत्रींनी अद्याप लग्न केलेले नाही आणि त्यांचा लग्न करण्याचा हेतू सुद्धा नाही.
१.साक्षी तंवर:- साक्षी तंवर तिच्या सरळ आणि सुशील अभिनय कौशल्यांसाठी प्रसिध्द आहे. तुम्हाला माहित आहे काय साक्षी तंवरचे संगीतकार आणि गायक असलेला विशाल दादलानीसोबत लग्न निश्चित झाले होते आणि दोघांचा साखरपुडा सुद्धा झाला होता. पण काही अज्ञात कारणावरून
काही दिवसांनंतर हा साखरपुडा मोडला. नंतर विशाल दादलानी प्रियलीशी लग्न केले. तर साक्षी तंवर अद्याप वयाच्या ४६ व्या वर्षी अविवाहित आहे आणि तिच्यासाठी मिस्टर परफेक्ट असलेल्या व्यक्तीची वाट पाहात आहे.
२.नेहा मेहता:- नेहा मेहता टीव्ही इंडस्ट्रीची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. अंजली मेहता म्हणून तिला तुम्ही चांगलेच ओळखत असणार. ती तारक मेहता का उलटा चश्मा मध्ये तारक मेहताच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. नेहाने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात डॉलर बहु पासून केली होती. त्यानंतर ती स्टार प्लस सीरियल भाभी मध्ये दिसली होती. आम्ही तुम्हाला सांगतो की नेहा मेहता आता ४१ वर्षांची आहे तरी अद्याप ती अविवाहित आहे.
३.शिल्पा शिंदे:- शिल्पा शिंदे ही एक लोकप्रिय टीव्ही कलाकार आहे. एंड टीव्हीच्या लोकप्रिय शो भाभीजी घर पर है मधील अंगुरी भाभीच्या पात्रामूळे शिल्पा ही एक घरचे नाव बनली आहे.
अंगुरी भाभीच्या भूमिकेत शिल्पाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. या शोमध्ये तिची वाढती लोकप्रियता पाहून शिल्पाने तिची फी वाढवण्याची मागणी केली यासाठी शोचे निर्माते सहमत नव्हते. म्हणून काही दिवसांनंतर शिल्पाला शोमधून काढून टाकल्याची बातमी आली.
यामुळे शिल्पा शिंदे आणि शोचे चॅनल हेड विकास गुप्ता यांच्यात चांगलेच मोठे भांडण झाले होते. शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता या दोघांनीही बिग बॉस या रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता तेव्हा ही संपूर्ण चर्चा समोर आली. शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता दोघेही या कार्यक्रमात स्टारकास्ट होते. विकास पहिल्या ३ फायनलिस्टमध्ये होता तर शिल्पा शिंदेने बिग बॉस ट्रॉफी जिंकली होती. शिल्पा ४२ वर्षांची असून अद्याप ती अविवाहित आहे.
४.जिया मानेक:- जिया मानेक ही स्टार टीव्ही शो साथ निभाना साथिया या कार्यक्रमात गोपी बहूचे प्रसिद्ध पात्र साकारून प्रसिद्धी मिळविणारी टीव्ही अभिनेत्री आहे. लोक तिला गोपी बहु म्हणून ओळखतात. पण काही काळानंतर तिने शो सोडला. अशी अफवा पसरली होती की शोचे निर्माते मुख्य पात्रांमध्ये काही अंतरंग दृश्य दाखवण्याच्या निर्णय घेत होते मात्र जिया यासाठी तयार नव्हती.
न घर का ना घाट का या बॉलिवूड कॉमेडी चित्रपटामध्ये जीया मानेकने छोटीशी भूमिका साकारली होती. साथ निभाना साथिया आणि एसएबी टीव्हीच्या जेनी और जुजू या शो नंतर ती लोकप्रिय झाली.
एका मुलाखतीत जीयाने हे स्पष्ट केले आहे की खूप वर्षानंतर टेलीव्हिजनवर परत आली आहे आणि गोपी बहूची अल्ट्रा -पॉ झिटिव्ह प्रतिमा भारतीय टीव्ही प्रेक्षकांमधून तोडणे तिला अवघड आहे. ती या क्षणी ३३ वर्षाची आहे आणि तिचा लग्न करण्याचा कोणताही हेतू नाही.