भगत सिंगचा भाऊ कुलतार सिंगचे बोलणे ऐकून अजय देवगण ‘ढसाढसा’ रडू लागला कारण…

Bollywood

शहीद-ए-आझम भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम हरी राजगुरू यांनी 23 मार्च 1931 रोजी देशासाठी हसत हसत फाशी घेतली होती. या तिघांच्या चेहऱ्यावर ना कसलाही ताण होता ना कपाळावर सुरकुत्या होत्या असं म्हणतात. या तिघांना फाशी देण्याच्या विरोधात देशभरात आंदोलने झाली. इंग्रज सरकारने एक दिवस अगोदरच त्यांना फाशी दिली आणि त्याचा मृतदेह जाळून सतलजमध्ये फेकून दिला. भारतमातेचे तीन सुपुत्र गीत गातगात शहीद झाले.

भगतसिंग यांच्या जीवनावर बनवलेले अनेक चित्रपट :- भगतसिंग यांचे जीवन नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रेम अदीब यांनी 1954 मध्ये आलेल्या भगतसिंग यांच्या जीवनावरील पहिल्या चित्रपट ‘शहीद-ए-आझम भगतसिंग’मध्ये भगत सिंग यांची भूमिका साकारली होती. शम्मी कपूर यांनी 1963 मध्ये आलेल्या ‘शहीद भगतसिंग’मध्ये भगत सिंग यांची भूमिका साकारली होती. 1965 मध्ये आलेल्या ‘शहीद’मध्ये मनोज कुमार भगतसिंगच्या भूमिकेत दिसला होता.

2002 मध्ये भगतसिंग यांच्यावर दोन चित्रपट:- 2002 मध्ये शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या जीवनावर दोन चित्रपट आले. ‘शहीद-ए-आझम’मध्ये सोनू सूदने भगतसिंगची भूमिका साकारली होती. अजय देवगणने ‘द लीजेंड ऑफ भगतसिंग’मध्ये भगतसिंगची भूमिका साकारली होती.

भगतसिंग यांच्यावरचे सर्व चित्रपट तुम्ही पाहिले असतील, पण फिल्मी दुनियेतील भगतसिंग आठवले तर अजय देवगणचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. चित्रपटातील प्रत्येक पात्राने जीव ओतला होता. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, भगतसिंग यांच्या आईची भूमिका करणाऱ्या फरीदा जलालचे अश्रू खरे होते, तिने ग्लिसरीन वापरले नव्हते.

अजय देवगणने भगतसिंगच्या भावाला भेटले:- 2002 मध्ये रेडिफला दिलेल्या मुलाखतीत, अजय देवगणने भगतसिंगचा धाकटा भाऊ कुलतार सिंग यांना भेटल्याच्या घटनेचा उल्लेख केला आहे. अजय देवगणने असे सांगितले आहे की, कुलतार सिंग चित्रपट युनिटसोबत पुण्यात राहिला होता. सिंह यांनी शहीद-ए-आझम यांच्याशी सं-बंधित अनेक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे, ज्यामुळे चित्रपट तयार करण्यात मदत झाली आहे.

अजय देवगण ढसाढसा रडू लागला:- अजय देवगणने जुना किस्सा शेअर करताना असे सांगितले आहे की, कोणीतरी कुलतार सिंगला मला आशीर्वाद देण्यास सांगितले. यावर कुलतार सिंगने उत्तर दिले, ‘मी माझ्या मोठ्या भावाला कसे आशीर्वाद देऊ? मला माझे अश्रू आवरता आले नाहीत. अजयने असेही सांगितले आहे की कुलतार यांनी अशी काही माहिती दिली जी इतिहासात नाही. कुलतार सिंग यांचे 2004 मध्ये वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले आहे.

भगत सिंगचे नाव घेतले तर संपूर्ण इतिहास डोळ्यापुढे उभा राहतो. त्यांचे पराक्रम आणि देशभक्ती डोळ्यांपुढे येते. असेच चित्रपटसृष्टिमध्ये काही निर्मात्यांनी त्यांनाचा इतिहास संपूर्ण जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही कोण कोणते चित्रपट बघितले आहे? हे आम्हाला कंमेंट करून सांगा.