ऐश्वर्याच्या लग्न झाल्याच्या 13 वर्षांपासून फक्त एकच इच्छा आहे ,जी अभिषेकने अजूनही पूर्ण करू शकला नाही …

Bollywood

बॉलिवूडची ब्युटी क्वीन मानली जाणारी ऐश्वर्या राय बच्चन हिला कोण ओळखत नाही ती बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे लाखो मध्ये चाहते आहेत. आता ऐश्वर्या जवळपास ४५ वर्षांची झाली आहे परंतु ती आज सुद्धा कोणत्याही इतर अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. ती अभिनय असो वा सौंदर्य तिच्यासमोर कोणीही उभे राहू शकत नाही.

गुरुच्या सेटवर ऐश्वर्या आणि अभिषेकची लव्हस्टोरी सुरु झाली. गुरू सिनेमाच्या प्रीमियरनंतर टोरंटोमध्ये अभिषेकने लग्नासाठी ऐश्वर्याला प्रपोज केले होते. ऐश्वर्याने ही अभिषेकने केलेले प्रपोजल लगेच स्वीकारले आणि 2007 मध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.

ऐश्वर्या व अभिषेक बच्चन या दोघांनी ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटात पहिल्यांदा काम केले. यानंतर बंटी और बबली या चित्रपटातील कजरा रे या गाण्याचे शू*टींग सुरु असतानाच दोघांच्याही मनात प्रेमाचा अंकुर फुलला. लगेच दोघे उमराव जान मध्ये देखील दिसले. या चित्रपटाच्या सेटवरच ऐश्वर्या व अभिषेक एकमेकांच्या जवळ आले होते.

आपल्याला माहितच आहे की ऐश्वर्या रायने अभिनेता अभिषेक बच्चनशी लग्न करून बच्चन कुटुंबाची सून झाली. त्यांच्या या लग्नाला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर जोडप्यांपैकी एक मानली जाते.

अभिषेक आणि ऐशचे २० एप्रिल २००७ रोजी बच्चन फॅमिलीचा बंगला प्रतिष्ठान मध्ये लग्न झाले होते आणि त्यांना एक सुंदर मुलगी आहे जी आता आठ वर्षांची आहे आणि तिचे नाव आराध्या आहे. आपण अनेक पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये या जोडीबरोबर आराध्याला पाहिलेच असेल.

आमच्या माहितीनुसार या जोडप्याने २०१५ मध्ये एक आलिशान अपार्टमेंट विकत घेतले होते परंतु ते अजून तेथे राहयला गेले नाही. खरे तर ऐश्वर्याला तिथे जाण्याची खूप इच्छा होती पण अभिषेक तयार होत नव्हता आणि आता ते आपल्या कुटुंबाबरोबर जुहूमधील जलसा नावाच्या बंगल्यातच राहत आहेत.

ऐश्वर्याच्या बाबतीत अशी बातमी आहे की तिने घेतलेल्या नवीन घरातच तिला राहायचे आहे आणि ती अभिषेकला यासाठी आग्रह करत आहे. पण अभिषेकला सध्यातरी त्याच्या आईवडिलांसोबत राहायचे आहे. या जोडप्याने अलीकडेच मुंबईच्या वांद्रे-कुर्ला घर संकुलात ५५०० चौरस फूट ची लक्झरी अपार्टमेंट खरेदी केले आहे. या नव्या फ्लॅटची किंमत २१ कोटींपेक्षा जास्त आहे.

ऐश्वर्याच्या लग्नाला १३ वर्षे झाली आहेत आता इतक्या वर्षानंतर तिला आता वेगळे राहयाचे होते. तिने दुसर्‍या घरात जाण्याचा आग्रह धरला पण अभिषेक हे स्वीकारण्यास तयार नव्हता आणि आई-वडिलांना सोडू इच्छित नव्हता.

त्याला त्याचा आई-वडीलाबरोबरच राहायचे आहे. पण जेव्हा ते या नवीन घरात येतील तेव्हा त्यांच्या शेजारी सोनम कपूर देखील असेल. त्याच इमारतीत सोनमनेही घर विकत घेतले असून ही इमारत ७००० चौरस फूट आहे. याची किंमत ३५ कोटींपेक्षा जास्त आहे.

अभिषेकने ऐश्वर्याला अगदी फिल्मी स्टाईलने प्रपोज केले होते. ऐश्वर्याने याबद्दल सांगितले होते. अभिषेक खरा आहे. आमचे नाते जितके खरे आहे तितकेच अभिषेकही सच्चा आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो. परस्परांची काळजी घेतो असे तीने सांगितले आहे.