Breaking News

ऍक्टिंग सोडून अजय देवगनला करायचंय हे काम, म्हणाले कोणी मला बाहेर काढेल त्याअगोदर मीच…

अजय देवगन जवळपास 3 दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. यामध्ये त्यांनी अ‍ॅक्शनपासून तर कॉमेडीपर्यंतचा प्रवास केला आहे.

अजय 90 च्या दशकातील काही कलाकारांपैकी एक आहे जे अद्याप सुपरहिट चित्रपट देत आहेत आणि तानाजी द अनसंग वॉरियर या ऐतिहासिक चित्रपटातुन त्यांनी हे स्पष्ट केलं आहे कि ते एक मोठे आणि सुपरहिट कलाकार आहेत.

तानाजी हा अजय देवगणच्या कारकिर्दीचा 100 वा चित्रपट आहे. अजय देवगण खूप दिवसांपासून तान्हाजी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते.

या चित्रपटात अजय पुन्हा 10 वर्षांनंतर काजोलबरोबर प्रेक्षकांसमोर आलेले आहेत. नुकत्याच एका मुलाखती दरम्यान अजय देवगनने आपल्या करिअरविषयी एक मोठे विधान केले आहे. जे अत्यंत धक्कादायक होते असं म्हणायला काही हरकत नाही.

अजय म्हणाला की आता करिअरमध्ये तो निर्माता आणि अभिनेता म्हणून सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे. पण आता अशी वेळ येत आहे की जेव्हा तो पूर्णपणे निर्माता म्हणूनच काम करणार आहे.

अजय म्हणाला, मला माहित आहे की अभिनेता म्हणून माझी एक मर्यादा आहे.

काही वर्षांनंतर मी यापुढे मुख्य भूमिकेत अभिनेता म्हणून दिसणार नाही आणि मलाही वेगवेगळ्या पात्रांच्या भूमिका मिळायला सुरुवात होईल. अशा परिस्थितीत हळूहळू माझे सर्व लक्ष प्रोडक्शन कडे जाईल.

जेव्हा अजय यांना विचारले जाते की आपल्याला लाईमलाइट च व्यसन नाही? तर ते म्हणाले, ‘एकदम बरोबर आहे. पण मी ते धरु शकत नाही.

मला यातून कोणी काढून टाकायच्या आधी मला यातून बाहेर पडायचे आहे. असे अजय देवगण यांनी स्पष्ट केले.

अजय देवगणच्या तानाजीबद्दल बोलतांना हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी रिलीज झाला आहे.

या चित्रपटात अजय देवगण तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत असून काजोल त्यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारलेली आहे.

तान्हाजी या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग केलेली आहे. या चित्रपटाने रिलीज होण्याच्या अगोदरच जवळपास चित्रपटाच्या बजेट पेक्षा जास्त इनकम केला होता. आणि आता सिनेमा घरांमध्ये हा चित्रपट हाऊसफुल चालू आहे.

About admin

Check Also

ए’म’ए’मए’स कांडवर रडणारी अंजलीने एका रशियन पुरुषासोबत वेळ घालवण्यासाठी मागितले होते पाच हजार रुपये, जाणून व्हाल थक्क!

सोशल मीडिया हे असे एक प्लॅटफॉर्म आहे,जिथे क्षणाक्षणाला नवीन गोष्टी अपलोड होत असतात. अनेक फोटो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *