अभिषेक पासून वेगळी होत आहे ऐश्वर्या राय..? जूनिअर बच्चनने सांगितली संपूर्ण कहाणी..

Bollywood

बॉलीवूड च्या या रंगीत विश्वात विविध गुणांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत येणारे एक नाव म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन होय. ऐश्वर्या ही आपल्या अभिनयासोबतच काही सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थेबरोबर देखील जोडलेली आहे. आपल्या कामाचे इतरांनी देखील अनुकरण करावे अश्या उद्देशाने आणि तितक्याच प्रभावीपणे ती या विविध भागांमध्ये काम करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

माजी विश्व सुंदरी असलेल्या ऐश्वर्या रायचे अनेक कोट्यावधी चाहते आहेत तिने बिग बी अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनबरोबर लग्न केले आहे सोशल मीडियावर या दोघांचे फोटो प्रत्येक वेळी व्हायरल होत असतात पण लॉकडाऊन दरम्यान एक बातमी अशी आली आहे जी ऐकून प्रेक्षकांना धक्का बसेल.

ऐश्वर्या आणि अभिषेक मध्ये सर्व काही ठीक नाही:- सध्या व्हायरल होत असलेल्या या बातमीतअसा दावा केला गेला आहे की अभिषेक बच्चन आणि पत्नी ऐश्वर्या राय यांच्यात सर्व काही सुरळीत चालू नाहीये म्हणूनच लवकरच दोघेही घटस्फो*ट घेण्याचा विचार करीत आहेत विशेष म्हणजे या बातमीवर अभिषेक बच्चनचे मत ही समोर आले आहे अभिषेकने या संपूर्ण प्रकरणावरचे आपले मौन तोडले आहे.

हा त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे:- ऐश्वर्या आणि अभिषेकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला असून या व्हिडिओवरून दोघांच्या वेगळे होण्याच्या बातम्या सुरु झाल्या आहेत. अभिषेक बच्चन म्हणाला की काय खरे आहे हे मला चांगलेच माहित आहे त्यासोबतच मीडियाला किती गंभीरपणे घ्याचे आहे हेही मला चांगले माहित आहे असे तो यावेळी म्हणाला आहे.

कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीच्या मताची मला आवश्यकता नाही:- अभिषेक बच्चन पुढे म्हणाला की तो कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीस त्यांचे नाते कसे आहे हे सांगण्याचा अधिकार देत नाही. आयुष्य कसे जगावे हे मला योग्यरित्या माहित आहे माझी पत्नी देखील हे सर्व चांगल्या प्रकारे जाणते. तीचे माझ्यावर किती प्रेम आहे याबदल मला पूर्ण कल्पना आहे. माझी पत्नी माझ्यावर प्रेम करते की नाही हे मला  जगाला सांगण्याची गरज वाटत नाही.

ही पूर्णपणे खोटी बातमी आहे:- मिडियाकडे लक्ष देत अभिषेक बच्चन म्हणाला की मीडिया त्यांच्या सोयीसाठी अशी खोटी बातमी देत ​​आहे आणि मिडिया बातमी बनवू देखील शकते ते एक सार्वजनिक मंच आहेत आणि आम्ही देखील मीडियाला प्रत्येकवेळी आनंदी ठेवू शकत नाही असे तो म्हणाला.

पण तुम्हाला अभिषेकने त्यावेळी ऐश्वर्याला लग्नासाठी कसे विचारले असेल असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच. अभिषेकने एका पोस्ट च्या माध्यमातून त्यांच्या रिलेशनला कशी सुरुवात झाली हे सांगितले आहे.

ऐश्वर्याने ज्या दिवशी अभिषेकला लग्नासाठी होकार दिला होता त्या दिवसाची आठवण काढून अभिषेकने काही वर्षांपूर्वी ही पोस्ट केली होती. अमेरीकेच्या गोठवण्याऱ्या थंडीत आमच्या रूम च्या बाल्कनीमध्ये तीने मला होकार दिला होता असे अभिषेकने सांगितले.

अभिषेकच्या या पोस्ट नंतर त्याच्या आणि ऐश्वर्याच्या नात्याविषयीच्या अनेक चर्चा रंगू लागल्या. काही चित्रपटांमध्ये या प्रेमी जोडीने एकत्र काम केले असून त्यांच्या ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन कामाचे नेहमीच लोकांनी कौतुक केले आहे.

वैवाहिक जीवन जगत असताना काही वर्ष ऐश्वर्या चित्रपटांपासून दूर राहिली. पण तिने पुन्हा एकदा या चित्रपटसृष्टीत पदार्पण करत चित्रपटसृष्टीमध्ये अनेकांचे लक्ष आपल्याकडे वळवले आहे. आता ऐश्वर्या आणि अभिषेकचे चाहते या स्टार कपलला पुन्हा एकदा चित्रपटाच्या मध्ये मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. त्यामुळे लवकरच चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार असल्याचे देखील अभिषेकने सांगितले आहे.