तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल कि, १९८७ साली गंमत जंमत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात सचिन पिळगावकर, वर्षा उसगावकर, अशोक सराफ, चारुशीला साबळे हे सर्व कलाकार प्रमुख भूमिकेत आपणास दिसले होते.
चित्रपटातील अश्विनी ये ना… हे गाणे खूप फेमस झाले आणि हे गाणे आजही रसिकांच्या स्मरणात आहेच. अश्विनी ये ना.. हे गाणं अशोक सराफ आणि चारुशीला साबळे या दोघांमध्ये चित्रित झाले होते.
लपून छपून, कयामत से कयामत तक यासारख्या अनेक मराठी हिंदी चित्रपटात चारुशीला साबळे झळकल्या होत्या.
चारुशीला साबळे हि शाहीर कृष्णराव साबळे यांची मुलगी होती. आणि नंतर चारुशीला चे लग्न बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अजित वाच्छानी सोबत झाले.
अजित वाच्छानीहे एक मोठे कलाकार आहेत यांनी बॉलिवूडचे हम आपके है कौन, मैने प्यार किया सारख्या मोठ्या आणि गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे.
परंतु २५ ऑगस्ट २००३ साली त्यांचे दुर्दैवी निधन झाले आणि ते आपण सर्वांना सोडून गेले. चारुशीला आणि अजित वाच्छानी यांना “योहाना आणि त्रिशाला” या दोन मुली आहेत.
त्यापैकी थोरली मुलगी योहाना ही अभिनेत्री, डबिंग आर्टिस्ट, डान्सर यासोबत टॅरट कार्ड रीडर म्हणूनही ओळखली जाते. मराठीतील महेश कोठारे दिग्दर्शित “जबरदस्त” या चित्रपटात तिने पुष्कर जोगसोबत काम केले होते.
आणि महत्वाचं म्हंटल तर हिंदी आणि गुजराथी भाषिक मालिकेत देखील ती झळकली आहे. मुक्ती बंधन ही कलर्स टीव्ही वरील तिची मालिका चांगलीच गाजली होती.
“फर्क” या बॉलिवूडच्या चित्रपटात देखील तिने काम केले आहे. चारुशीला ची धाकटी मुलगी त्रिशाला ही देखील कुठल्याही अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.
ती दिसायला खूप सुंदर आहे परंतु अभिनयात रुची नसल्याने तिने नोकरी करण्याचे ठरवले, त्यामुळे साहजिकच ती कला क्षेत्रापासून दूर जात तिने एअरहोस्टेस बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे आणि आता ती ऐरहोस्टेस आहे.