6 वर्षांपर्यन्त रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर अंकिताने तोडलं सुशांत सोबतच पवित्र बंधन,हे होते कारण …

Bollywood

रिलेशनशिप रोमान्स आणि ब्रेकअप यांमुळे बॉलिवूड अनेकदा चर्चेत असतं. अनेक वर्ष डेट करुन हे कलाकार लग्नबंधनात अडकतात. पण अनेक वर्षे डेट करुनही अनेकांचे ब्रेकअप होतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांची लव्हस्टोरी अधूरी राहिली.

त्यामधलं फेमस कपल म्हणजे सुशांत सिंग राजपुत आणि अंकिता लोखंडे. या दोघांची ल्व्हस्टोरी नेहमीच चर्चेत राहिली. चाहत्यामध्ये त्यांच्या ब्रेकअपमुळे नाराजी होतीच आणि त्याचं कारण जाणून घेण्याची उत्सुकतादेखील कायम आहे. जाणून घ्या नक्की कोणत्या कारणामुळे सुशांत आणि अंकिता यांच्या लव्हस्टोरीचा दि एण्ड झाला.

टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने आपल्या करिअरची सुरूवात पवित्र रिश्ता सीरियलपासून केली होती. यानंतर तिने मणिकर्णिका चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अंकिता आणि सुशांतसिंग राजपूत यांनी पवित्र रिश्ता या मालिकेत एकत्र काम केले होते.

यावेळी दोघे एकमेकांच्या अगदी जवळ आले आणि एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. या दोघांची जोडी लोकांना देखील खूप आवडत होती. परंतु काही वर्षानंतर त्यांचे नाते तुटले.

सुशांत आणि अंकिताच्या नात्यात बरेच चढ-उतार झाले आणि त्यामुळेच त्यांचा ब्रेकअप झाला. त्यावेळी कायम दोघांना एकत्र पाहिले जायचे. या दोघांनी सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या झलक दिखला जा या रियलिटी शोमध्ये भाग घेतला. सुशांतने अंकिताला नेशनल टेलीविजनवर प्रपोज देखील केले. पण त्यांच्या जोडीला कोणाचीतर नजर लागली.

पवित्र रिश्ता संपल्यानंतर सुशांतसिंग राजपूत याला चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. अंकिताकडे कोणताही मोठा प्रोजेक्ट नव्हता. असे म्हणतात की हे त्यांचे संबंध तुटण्याचे कारण होते. असंही बोललं जात होतं की अंकिता सुशांतसाठी खूप जास्त पझेसिव्ह होती. त्यामुळे नात्यामध्ये दरी निर्माण झाली. याविषयी दोघांनी कधीच मोकळेपणाने खुलासा केला नाही.

असं म्हणतात की अंकिता सुशांतसिंग राजपूत बद्दल खूप सकारात्मक होती. सुशांत आणि अंकिता 2011 मध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. हे दोघं 2016 मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चाही होत्या. पण त्याच वर्षी दोघांचा ब्रेकअप झाला.

दोघांच्या आयुष्यात अनेक उतार-चढाव आले. करीअर घडवत असताना अनेक बदल झाले. कदाचित हेच उतार-चढाव या कपलला सांभाळणे कठीण होऊन बसलं. सुशांत त्यानंतर बॉलिवूडकडे वळला. अंकिता सध्या बिजनेसमैन विक्की जैनला डेट करीत आहे तर सुशांतसिंग राजपूतही त्याच्या करिअरला मोठे करण्यात गुंतला आहे.

सुशांतचं नाव अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिती सॅननशई जोडलं गेलं होतं. पण सध्या तो अभिनेत्री रिया चक्रवर्तीला डेट करत आहे. त्या दोघांनी अधिकृतपणे ही माहिती दिली नसली तरी त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

सुशांत पिके शुद्ध देसी रोमान्स काय पो चे राबता केदारनाथ एम.एस्.धोनी आणि छिछोरे अशा सुपरहिट सिनेमांमधून झळकला आहे. तर अंकिताने एक थी डायन मनीकर्णीका मधून झळकली. लवकरच ती टायगर श्रॉफच्या बागी 3 मध्ये दिसणार आहे.

२१ जानेवारी २०१९ रोजी बॉलीवूडलाइफ डॉट कॉमने सुशांत सिंह राजपूतच्या वाढदिवसानिमित्त एक सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात अंकिता लोखंडे आलिया भट कॅटरिना कैफ व दिपिका पादुकोण या चार अभिनेत्री होत्या.

या चौघींपैकी कोणत्या अभिनेत्रीला सुशांत सिंह राजपूतबरोबर अभिनय करताना चाहत्यांना पहायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रीया देताना ४५ टक्के चाहत्यांनी अंकीता लोखंडेला आपले मत दिले. तसेच २३ टक्के आलिया भट १७ टक्के कॅटरिना कैफ आणि १५ टक्के दिपिका पादुकोन या टक्केवारीत चाहत्यांनी आपली पसंती दर्शवली.

तुला पुन्हा एकदा सुशांतबरोबर काम करायला आवडेल का असा प्रश्न नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अंकिता लोखंडेला विचारण्यात आला होता. यावर जर पटकथा चांगली असेल तर मी नक्की त्याच्याबरोबर काम करेन अशी प्रतिक्रीया अंकिताने दिली होती.

सुशांत व अंकिता यांचे दोन वर्षापुर्वी ब्रेकअप झाले असले तरी आजही चाहत्यांना या दोघांना पुन्हा एकदा एकत्र काम करताना पाहण्याची इच्छा आहे.