5 वर्षांपूर्वी शेवटच्या वेळी भेटले होते सैफ आणि अमृता, सारा म्हणाली- आई बिस्तर ठीक करत होती आणि पापा..

Bollywood

सलग दोन हि*ट चित्रपट दिल्यानंतर सारा अली खान बॉलिवूडची पुढील आघाडीची अभिनेत्री बनली आहे. मागे काही महिन्यात प्रदर्शित झालेला  केदारनाथ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहि*ट ठरला.

त्यानंतर साराचा दुसरा सिनेमा सिंबा डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि काही दिवसांतच चित्रपटाने 300 कोटी पार केले. चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी आणि निर्माता करण जोहर यांनी केले आहे. या चित्रपटात सारा अली खानबरोबर रणवीर सिंग दिसला होता. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की साराने आपली आई अमृता सिंग यांचे घर सोडले आणि एका वेगळ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली आहे.

यापूर्वी सारा अली खानने तिची आई अमृता सिंग यांचे वडील सैफशी असलेले सं*बंध याबद्दल बरेच खुलासे केले होते. नुकत्याच एका मुलाखती दरम्यान साराने पुन्हा एकदा तिच्या पालकांना आठवत सांगितले की पाच वर्षांपूर्वी दोघांना एकत्र पाहिलेली ती शेवटची वेळ होती. हे सांगून ती खूप भावूक झाली. त्यावेळी साराने काय सांगितले ते जाणून घेवूया.

सैफ आणि अमृताची 5 वर्षांपूर्वी अखेरची भेट झाली होती:- सारा म्हणाली की पाच वर्षांपूर्वी सैफ आणि अमृताची अखेरची भेट झाली होती. आम्ही सांगतो की घटस्फो*ट मिळाल्यानंतर सैफ आणि अमृता गेल्या 15 वर्षांपासून वेगळे राहत आहेत. वेगळे झाल्यानंतर अमृताने दोन्ही मुलांना तिने स्वताने वाढविले आहे.

एका मुलाखती दरम्यान जेव्हा साराला तिच्या पालकांच्या नात्याबद्दल विचारले गेले तेव्हा ती म्हणाली दोघे जण मला कोलंबिया विद्यापीठात मला सोडण्यासाठी आले होते तेव्हा आई वडील असे दोघेही माझ्याबरोबर होते.

आम्ही एकत्र जेवणही केले. तो काळ खरोखर खूप छान होता. मला माझ्या महाविद्यालय सोडण्यासाठी दोघे एकत्र आले होते. सारा पुढे म्हणाली त्यांनी मला कॉलेजला सोडले. मला त्याच्या आधल्या दिवशीची थोडीशी झलक आठवते की त्या रात्री आई माझे बेड ठीक करत होती आणि पापा लाईट बल्ब लावत होते. मला या अस्पष्ट आणि सुंदर आठवणी कायम आवडतात. मी तो दिवस कायम आठवत असते.

साराने आई अमृताचे घर सोडले:- अलीकडेच साराला तिच्या आईचे म्हणजे अमृताचे घर सोडताना बघितले होते आणि काही दिवसांपूर्वी ती घरातील सामान ठेवून एका कारमध्ये घेवून जाताना दिसली होती. अशा परिस्थितीत लोक असा अंदाज बांधू लागले की आईशी परस्पर मतभेदामुळे सारा घर सोडत आहे. जेव्हा साराला याबद्दल विचारणा केली गेली तेव्हा ती म्हणाली की बाकी स्टारकिड्सप्रमाणे तिला स्वतंत्र व्हायचे आहे म्हणूनच तिने घराबाहेर रहायचे ठरवले आहे. खरं तर बी-टाउनमध्ये आई-वडिलांच्या घराबाहेर राहण्याची फॅशन चालू आहे. त्यामुळे सारानेही या ट्रेंडला अनुसरून वेगळे राहण्याचे ठरविले आहे.

नुकताच बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती वडिल सैफ अली खानसोबत असल्याचे दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

वडिल आणि मुलीमधील नाते नेहमी खास असते हे साराने शेअर केलेल्या कॅप्शनवरुन समजत आहे. या फोटोमध्ये सारा अतिशय क्यूट दिसत आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने मुलगी आणि वडिल यांची बेस्ट जोडी असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने वडिल आणि मुलीमध्ये असलेले सुंदर नाते असे म्हटले आहे.