हिंदी मध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे की सुबह का भुला शाम को घर आ जाये तो उसे भुला नही कहते. परंतु आज आम्ही आपल्याला एक गोष्ट सांगणार आहोत ज्यामध्ये एक स्त्री 30 वर्षांच्या वयात आपल्या पती आणि तिच्या सहा मुलांना सोडून प्रियकरासह पळून गेली होती. आणि आता 25 वर्षांनंतर ती 55 वर्षांच्या वयाची असताना ती तिच्या पती आणि मुलांकडे परत आली आहे. विशेष म्हणजे तिच्या पती आणि मुलांनीही तिला स्वीकारले आहे.
हे प्र करण गढवा जिल्ह्यातील के टर पो लिस स्टे शन परिसरातील जोगाबीर गावातील आहे. 25 वर्षानंतर एक महिला गावी परतली. ही महिला तिच्या प्रियकरासह पळून गेली होती. तिचा प्रियकर म रण पावला तेव्हा ती तिच्या घरी परतली आहे. जेव्हा ती घरी परत आली तेव्हा प्रथम नवरा आणि मुलांनी तिला परत घेण्यास नकार दिला परंतु गावातील लोकांच्या ह स्त क्षेपानंतर तिला कुटुंबाने स्वीकारले आहे. त्यानंतर जेव्हा ती घरी गेली तेव्हा मुलगा सून नातवंडे आणि पतीला पाहून भावूक ती झाली. तिने सर्वाना मिठी मा रली आणि खूप र डली.
ती वयाच्या ३० व्या वर्षी असताना ती एका प्रियकरासह सहा मुले व नवरा सोडून पळून गेली होती:- यशोदा देवी ही महिला 25 वर्षांपूर्वी सुमारे 30 वर्षांची होती. त्यावेळी तिला सहा मुले होते. त्याचवेळी तिचा पो लिस स्टेशन परिसरातील छ त्र कुंड येथील रहिवासी विश्वनाथ साह याच्या प्रेमात पडली.
जेव्हा दोघांमधील प्रेम वाढत गेले तेव्हा तिने पती आणि मुलांना सोडून प्रियकरासह पळून गेली. त्यानंतर ती आपल्या प्रियकराबरोबर राहण्यासाठी छत्तीसगडच्या सीतापूरला गेली. 15 दिवसांपूर्वी तिचा प्रियकर विश्वनाथ यांचे नि धन झाले. त्यानंतर विश्वनाथच्या घरातील लोकांनीही तिला ठेवून घेण्यास नकार दिला आणि ती एकटी पडली.
तेथून तिने आपल्या घरी परत जाण्याचा निर्णय घेतला. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ती येथे पोहोचली. जेव्हा ती गावात पोहोचली तेव्हा तिला पाहून कुटुंबातील लोक आ श्च-र्यचकित झाले. त्याच्याबरोबर उद्धटपणे तिच्याशी बोलून तिला घराबाहेर काढले. पण ती तिथेच थांबण्यावर ठाम होती. रात्रभर घराबाहेर दारात ती थांबली.
सकाळी पुन्हा एकदा गावातील लोकांनी या प्रकरणाचा शोध सुरू केला. त्याच वेळी यशोदाने गावातील लोकांना सांगितले की ती प्रियकराबरोबर राहत असली तरी तिचा सतत मुलांशी संपर्क असतो.
गरज भासताना मुलांनी आर्थिक मदतही केली आहे. त्यानंतर मुलांनीही गावातील लोकांसमोर आईची मदत स्वीकारली. गावातील लोकांना खात्री पटवून दिल्यानंतर कुटुंबीयांनी तीला आपल्याकडे ठेवण्याचे मान्य केले. तिचा मुलगा आणि सुना यांनी सांगितले की आता त्यांची आई त्यांच्याबरोबरच राहेल.
यानंतर पती नरेश साह यांनीही हे मान्य केले. कुटुंबीयांनी मान्य केल्यानंतर ती घरात शिरली तेव्हा देखावा वेगळा होता. मुले सोडून आलेल्या महिलेचे घर परत भरले होते. सात नातवंडे तीन सुना पाहून ती खूप भा वनिक झाली. त्यांना तिने मिठी मा रली आणि रडू लागली. हे दृ श्य पाहून गावातील सर्व लोकही भा वूक झाले होते.