२२ वर्षानंतर इतके बदलले आहेत दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील कलाकार, सध्या करतायेत हि काम…

Bollywood

बॉलीवूडमध्ये आतापर्यंत अनेक चित्रपट प्रदर्शित होऊन गेले. परंतु फिल्मी दुनियेमधील सर्वात फेमस आणि ब्लॉकबस्टर लव स्टोरी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे पेक्षा क्वचितच एखादा चित्रपट दर्शकांना इतका आवडला असेल. 

दर्शकांनी या चित्रपटाबरोबरच या चित्रपटातील स्टार्स कास्टला देखील खूप पसंत केले होते. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

या चित्रपटाला आदित्य चोप्राने डायरेक्ट आणि यश चोप्राने प्रोड्यूस केले होते. इतकेच नव्हे तर या चित्रपटामध्ये अनेक दिग्गज अ‍ॅक्टर आणि अ‍ॅक्ट्रेसने काम केले होते. चला तर मग जाणून घेऊयात या लेखामधून या चित्रपटामधील काही अशा कलाकारांबद्दल जे चित्रपटाच्या २२ वर्षानंतर इतके बदलले आहेत.

शाहरुख़ खान

या चित्रपटाने शाहरुख़ खानच्या करियरचा पूर्ण कायापालटच करून टाकला. मात्र ह्या चित्रपटानंतर शाहरुख़ खानने कधीहि मागे वळून पाहिले नाही. शाहरुख़ खान आज बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये या चित्रपटाच्या जोरावरच किंग खान म्हणून ओळखला जातो.

फरीदा जलाल

बॉलीवूडमधील फेमस अभिनेत्री राहिलेली फरीदा जलालने या चित्रपटामध्ये सिमरनच्या आईची म्हणजेच काजोलच्या आईची भूमिका साकारली होती. या भूमिकेला दर्शकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला.

अमरीश पूरी

चित्रपट जगतामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे दिवंगत अभिनेता अमरीश पूरीने या चित्रपटामध्ये सिमरनचे वडील बलदेव सिंहची भूमिका साकारली होती. अमरीश पूरीने २००५ मध्ये या जगाचा अखेरचा निरोप घेतला.

अनुपम खेर

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेरने या चित्रपटामध्ये शाहरुख़चे वडील म्हणजेच धर्मवीर मल्होत्राची भूमिका साकारली होती. अनुपम खेरने आतापर्यंत अनेक चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या अनुपम अभिनेता तर आहेतच पण ते राजकारणामध्ये देखील सक्रीय झाले आहेत.

परमीत सेठी

फिल्मी जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना पुरन सिंहचे पती परमीत सेठी या चित्रपटामध्ये कुलजीत सिंहच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले होते.

पूजा रूपारेल

या चित्रपटामध्ये अभिनेत्री पूजा रुपारेलने काजोल म्हणजेच सिमरनच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती. पूजा आज जवळजवळ ३६ वर्षांची झाली आहे. परंतु तरीही ती खूपच सुंदर दिसते.

मंदिरा बेदी

बॉलीवूडमध्ये आपल्या फिटनेसमुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मंदिरा बेदीने या चित्रपटामध्ये प्रितीची भूमिका साकारली होती. मंदिरा बेदीच्या सुंदरतेमध्ये आजही जरासुद्धा बदल झालेला नाही ती तितकीच सुंदर आहे.

करण जौहर

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री मधील फेमस डायरेक्टर, प्रोडूसर आणि धर्मा प्रोडक्शनचा मालक करण जौहरने या चित्रपटामध्ये शाहरुख़ खानच्या मित्राची भूमिका साकारली होती.