Breaking News

७१वे वर्ष असलेल्या बॉलीवूड खतरनाक खलनायकाची भूमिका साकारणार्या अभिनेत्याची पत्नी आहे खूपच सुंदर, बघून विश्वास नाही बसणार ..

७१वे वर्ष असलेल्या बॉलीवूड खतरनाक खलनायकाची भूमिका साकारणार्या अभिनेत्याची पत्नी आहे खूपच सुंदर, बघून विश्वास नाही बसणार ..

आपल्या सर्वांनाच हे ठाऊक आहे, की बॉलिवूडचा कोणताच चित्रपट हा खलनायकाशिवाय अपूर्ण आहे. कोणत्याही चित्रपट जेव्हा यशस्वी होतो, तेव्हा त्या बॉलिवूड चित्रपटांच्या यशामध्ये जसा नायकाचा मोठा वाटा असतो, त्याचप्रमाणे खलनायकचा देखील असतो.

बॉलिवूड चित्रपटांमध्ये साधारण ९०च्या दशकादरम्यान खलनायकाची भूमिका अग्रेसर होती. व्हिलन असल्याशिवाय प्रेक्षकांना चित्रपट पहाण्यात मजा येत नसे. त्यांना बिनधास्त खलनायक खूप आवडायचे. त्याची छाप कधीतरी चित्रपटाच्या नायकापेक्षा जास्त प्रमाणात प्रेक्षकांवर पडायची. तुम्हाला आठवत असेल, तर त्यावेळी मोगम्बो, शान, कात्या यासारख्या व्हिलनने चाहत्यांना खूप घाबरवले.

पण आज आम्ही तुमच्यासाठी सनी देओलच्या “घातक” या चित्रपटाच्या खलनायकाबद्दल थोडेसे सांगणार आहोत. हा चित्रपट सनी देओल आणि डॅनी डेन्झोपाच्या उत्तम अभिनयामुळे त्या वेळचा सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक होता. यात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते, प्रसिद्ध अभिनेत्री “मीनाक्षी शेषाद्री” ह्यांनी.

यातील खलनायकाची भूमिका साकारली होती डॅनी डेन्झोपा यांनी. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे आणि त्यांना खूप यश व प्रसिद्धी देखील मिळाली आहे. आता डॅनी डेन्झोपा हे ७१ वर्षांचे आहेत. डॅनी डेन्झोपा यांनी केवळ हिंदी चित्रपटांत काम केले असे नाही, तर त्यांनी तामिळ, तेलगू, नेपाळी अशा विविध भाषांच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

डॅनी डेन्झोपा यांनी आपल्या फिल्मची सुरूवात “जरूरत” या चित्रपटाद्वारे केली होती. पण नायकापेक्षा खलनायकाच्या भूमिकेत ते जास्त रमले व त्यांना त्यामध्ये अधिक यश मिळाले. डॅनी डेन्झोपा यांचे लग्न १९९० मध्ये सिक्कीमच्या पूर्व राजकन्या गावा यांच्याशी झाले. त्यांना दोन मुले आहेत. आम्ही तुम्हाला सांगू इछितो, की डॅनीची पत्नी खूपच सुंदर आहे. डॅनी डेन्झोपा यांच्या पत्नीचे फोटो बघून तुम्हाला याची कल्पना येईल.

त्यांच्या पत्नीप्रमाणे त्यांची मुलगीही खूप सुंदर आहे. डॅनी डेन्झोपा यांचे देशभरात लाखो चाहते आहेत, पण त्यांच्या पत्नीच्या सौंदर्याची कल्पना खूप कमी लोकांना आहे. तर आज आम्ही तुम्हाला त्याच्या सुंदर पत्नीबद्दल सांगत आहोत. खूपदा लोकांचा डॅनीची पत्नी आणि मुलगी यांच्यात गोंधळ होतो, लोक त्यांच्यातील फरक ओळखू शकत नाहीत. डॅनीची पत्नी इतकी सुंदर आहे, की तिचे सौन्दर्य पाहून आपण तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही.

डॅनी डेन्झोपा यांचे “शेषनाग” “घातक” “खुदा गवाह” “सनम बेवफ़ा” “फकीरा” यासारखे अनेक चित्रपट खूप यशस्वी झाले. त्यांच्या काळातील ते एक प्रसिद्ध व आघाडीचे खलनायक होते. डॅनी डेन्झोपा यांची एकूण ४० वर्षाची कारकीर्द आहे व या अभिनय कारकीर्दीत त्यांनी २०० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

डॅनीला त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच भारताचा चौथा महान नागरी पुरस्कार पद्मश्री हा देखील देण्यात आला आहे. बॉलिवूडच्या या पडद्यावरील महान खलनायकाला वैयक्तिक आयुष्यात एक अतिशय सुंदर आणि समजूतदार पत्नी मिळाली आहे.

डॅनी व गावा यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन मुले आहेत. त्यांच्या मुलाचे नाव रिंगिंग डेन्झोपा आणि मुलीचे नाव पेमा डेन्झोपा असे आहे. त्यांचा मुलगा रिंगिंग डेन्झोपा हा अभिनय क्षेत्रातच अभिनेता म्हणून काम करणार आहे. पण रिंगिंगला खलनायक न होता त्याला हिरोची भूमिका साकारण्याची इच्छा आहे.

डॅनीची पत्नी इतकी सुंदर आहे, की या वयातही त्यांच्या पत्नीने स्वत:ला एकदम फिट ठेवले आहे. बर्याीच लोकांचा त्याची पत्नी आणि त्याची मुलगी यामध्ये गोंधळ उडतो.

डॅनीचे आपल्या अभिनयावर जेवढे प्रेम आहे तितकेच प्रेम तो आपल्या स्वत:च्या कुटुंबावर देखील करतो. खरे तर डॅनी यांना लहानपणापासूनच भारतीय सैन्यदलात भरती होण्याची इच्छा होती. पुणे येथील सशस्त्र सैन्य वैद्यकीय महाविद्यालयासाठी त्यांची निवड सुद्धा झाली होती. तसेच, फिल्म आणि टीव्ही संस्थेचा अभिनय अभ्यासक्रमात प्रवेश मिळाल्यामुळे त्यांनी पुढे सिनेविश्वात आपले काम सुरू केले.

About Team LiveMarathi

Check Also

सोनमने रणबीर आणि त्याची आई यांच्यातील अ’वै’ध सं’बं’धांचा केला पर्दाफाश, सोनम म्हणाली”आई आणि मुलगा दोघेही पण “

सोनम कपूर आहुजा जिचा जन्म ९ जून १९८५ रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात झाला, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *