या ७ सवयींमुळे माता लक्ष्मी होते नाराज जाणून घ्या कोणत्या आहेत या सवयी..

Astrology

पुराणांमध्ये माता लक्ष्मीच्या उत्पत्तीविषयी वेगवेगळे मत आढळतात. एका आख्यायिकेनुसार माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्र मंथनाच्या वेळी बाहेर आलेल्या  रत्नांपासून झाली होती परंतु दुसर्‍या कथेनुसार ती भृगु ऋषीची कन्या असल्याचे सांगण्यात येते.

हिंदू ध-र्मा मध्ये देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी असे म्हंटले जाते. जर कोणी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची निस्वार्थ मनाने पूजा करत असेल तर त्यास लक्ष्मी आणि देव कुबेर यांचा आशिर्वाद सतत त्या व्यक्तीवर बनून राहतो. त्या व्यक्तीच्या जीवनातील कष्ट कमी होतात आणि तो सुखी जीवन जगतो. हिंदू पुराणांमध्ये अश्या बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत कि कशाप्रकारे उपासना केल्याने आपण  देवी लक्ष्मीचा एक चांगला भक्त बनू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्या गोष्टी तुम्ही नियमित पणे केल्याने तुम्हाला भविष्यात खूप संपत्ती प्राप्त होऊ शकते.

१. आपण नियमित पणे बघत आला असेल कि देवाची पूजा करताना आपण जी पूजेची सामग्री असते तेव्हा देवाची मूर्ती जमिनीवर ठेवतो. तस बघायला गेल तर धरती मातेला पवित्र मानल जात परंतु आपण ज्या ठिकाणी देवपूजा करत असतो त्या ठिकाणी आपला तेथे आपल्या पायाचा स्पर्श होत असतो.आणि आपल्याला माहितच आहे आपण कुठे-कुठे बाहेरून फिरून आलेलो असतो. त्यामुळे हि सामग्री किंवा मूर्ती जमिनीवर ठेवताना आधी स्वछ कापड खाली अंथरा आणि त्यावर हि सामग्री ठेवा.

२. तुमच्या माहिती साठी ही गोष्ट महत्वाची आहे कि मावळता सूर्य आणि चंद्र बघणे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो परंतु घरामध्ये पैशाची कमी पण भासू लागते.

३. जेव्हा पण आपण बाहेरून घरात येतात तेव्हा आपल्या पायांना शुद्ध आणि स्वछ पाण्याने नियमित धुवा. कारण असे केल्याने बाहेरच्या सगळ्या वाईट गोष्टी नष्ट होऊन जातात.

4. शारी रिक स-बंध बनवणे हि सर्वांची एक महत्वाची गरज आहे परंतु सूर्यास्ताच्यावेळी आणि दिवसा शारीरिक स बंध ठेवणे शुभ मानले जात नाही यामुळे संकटांचा सामना करावा लागू शकतो.

५. खूप लोकांना मुलींकडे बघण्याची सवय असते परंतु आम्ही आपल्याला सांगू इच्छितो कि पर स्री कडे वाईट नजरेने बघणे हे खूप मोठे पाप आहे.शास्राच्या माहितीनुसार अशा लोकांना राक्षस म्हणून संबोधित केले जाते.

६. मुलींना घरातील लक्ष्मी मानले जाते त्यामुळे ज्या घरांमध्ये मुली किव्हा पत्नी भांडणाचे कारण बनते किंवा घरात अशांती चे वातावरण निर्माण करते अशा घरात कधीच सुख आणि शांती टिकत नाही.

७. वडीलधाऱ्या माणसांचा आदर सम्मान केलाच पाहिजे. ज्या घरांमध्ये मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचा आणि महिलांचा आदर-सम्मान केला जात नाही तिथे लक्ष्मी देवी कधीच धन-धान्य ची कृपा करत नाही.