ह्या मराठी अभिनेत्रीचा भूतकाळ: चित्रपटाच्या बदल्यात निर्माता म्हणाला होता- ‘फक्त माझ्यासोबत एक रात्र..

Daily News Entertenment

मराठी सिनेजगतातील सुप्रसिद्ध असलेली एक गुणी अभिनेत्री श्रुती मराठे हिने तिला आलेल्या का-स्टिंग काऊचचा (निवड पद्धतीचा) तिच्यासोबत घडलेला एक किस्सा शेअर केला आहे. यामध्ये श्रुतीने चित्रपट ऑडिशनच्या वेळी अभिनेत्रींना का-स्टिंग काउचला कसे सामोरे जावे लागते व त्या कशा बळी पडतात याविषयी एक विचार करायला लावणारी सविस्तर पोस्ट लिहिली आहे.

एका निर्मात्याचा तिला आलेल्या अनुभवाविषयी ती म्हणते, की त्याने मला वन नाइट स्टँडसाठी विचारले व  अभिनेत्री व्हायचे असेल तर या सर्व तडजोडी कराव्याच लागतात असे त्याने श्रुतीला सांगितले. पण तिने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला व त्याला सडेतोड उत्तर देत ती चित्रपटातून बाहेर पडली.

का-स्टिंग काउचच्या घटनेची माहिती:- श्रुती म्हणते “एकदा एका निर्मात्याने मला चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर दिली. पहिल्या वेळी तो प्रोफेशनल होता, परंतु नंतर त्याने त्याचा पवित्रा बदलला व एकमेकांना समजून काम केले पाहिजे, तसेच वन नाईटसारखे शब्द वापरण्यास सुरवात केली.

श्रुती लिहिते की एका चित्रपट निर्मात्याने चित्रपटातील मुख्य भूमिका देण्याच्या बोलीवर शरीरसुखाची मागणी माझ्याकडे केली होती. तुम्हाला चित्रपटात काम करायचे  असेल तर अशा तडजोडी कराव्या लागतात असे त्याने सांगितले.

त्यावर श्रुतिने त्याला निर्भयपणे विचारले, की जर अभिनेत्री होण्यासाठी मला एखाद्याची शय्यासोबत करावी लागणार असेल, तर अभिनेता किंवा हिरो होण्यासाठी तुम्ही त्याला काय करायला सांगता?  श्रुतीच्या अशा सडेतोड व बोचऱ्या सवालाने तोही स्तब्ध झाला होता.

श्रुती पुढे म्हणते, की मी इतरांना माझ्याबरोबर घडलेली ही घटना सांगितली. यानंतर तिला तो प्रोजेक्ट सोडायला सांगण्यात आले. मला निर्भिड व सावध व्हायला फक्त १ मिनिट लागले. मी हे फक्त माझ्यासाठी केले नाहीये, तर मी त्या महिलांसाठीदेखील  उभी राहिले ज्यांना गृहीत धरले जाते व असेच सहज ज्जज केले जाते.

श्रुतीचे म्हणणे आहे, की मला किंवा कोणालाही त्यांच्या कपड्यांवरून मी किंवा ती काय आहे हे कोणी ठरवू शकत नाही. प्रत्येकाची बुद्धिमत्ता, त्याची मेहनत व त्याला मिळालेले यश यावर व्यक्ति ठरत असते. मला स्वत:ला ठामपणे असे वाटते, की हीच योग्य वेळ आहे जेव्हा लोक या गोष्टी समजून घेतील.

श्रुतीने तिच्या पोस्टमध्ये हे प्रामाणिकपणे नमूद केले आहे, की तिने प्रथमच स्क्रीनवर बिकिनी परिधान करण्याच्या अनुभवाचे वर्णन देखील केले. तिने सांगितले की माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मला साउथ मूव्हीमध्ये बिकिनी घालायला सांगितले गेले होते. मी तसे दोनदा विचार न करता यास सहमती दर्शविली. माझ्या मनात तेव्हा कोणताच प्रश्न पडला नाही.

मराठी चित्रपट विश्वात काम करण्याबरोबच श्रुतीनं दाक्षिणात्य चित्रपटातही काम केले आहे. श्रुतीची रुपेरी पडद्यावरील एक मालिका गाजल्यानंतर तिचा एका दाक्षिणात्य चित्रपटातील बिकिनीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

श्रुतीचा हा फोटो बघून लोकांनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रो ल केले होते. हा आलेला अनुभवही श्रुतिने तिच्या एका मुलाखतीत सांगितला. मला तेव्हा चित्रपटात काम करण्याची संधी मिळत होती म्हणून मी क्षणाचाही विलंब न करता बिकिनी घालायला तयार झाले होते. त्यावेळी मी कोणतेही प्रश्न त्यांना विचारले नाहीत.

पण ते तेवढ्यावर थांबले नाही तर याच फोटोवरून तिच्यावर टीका झाली. अशा प्रसंगामुळे मात्र तुम्ही मेहनतीने कमावलेली प्रतिष्ठा मातीमोल ठरते असेही ती म्हणाली. तिचे असे सांगणे आहे, की आता तिचे जे काही नाव आहे ते केवळ तिच्या मेहनत आणि अभिनयामुळे कमावले  आहे ही गोष्ट आता चाहत्यांनी समजून घेतली पाहिजे.

श्रुती मराठेची ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. श्रुतीचा चाहता वर्ग या पोस्टसाठी तिचे भरभरून कौतुक करत आहेत. श्रुतीने चित्रपटाबरोबर काही टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे.

ही मराठी चित्रपटसृष्टीची एक गुणी व सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे मराठी इंडस्ट्रीमध्ये असंख्य चाहते आहेत तसेच चांगले फॅन फॉलोइंग आहे, कारण ती नेहमी सोशल मीडियावर खूप सक्रिय देखील राहते.