हे 9 संकेत तुम्हाला सांगतात कि तुमचा पार्टनर तुम्हाला देत आहे धोका…

Daily News

लोक असे म्हणतात की जेव्हा नात्यामध्ये विश्वास आणि सत्य असेल तेव्हाच ते नाते जास्त काळ टिकून राहते. एकमेकांवर विश्वास न ठेवल्यामुळे बरीच नाती तुटल्याचे आपण पाहत असतो. नेहमी खरे वागणारा माणूस कधीही कोणत्याही माणसांवर आंधळेपणाने विश्वास ठेवतो.

जेव्हा तो माणूस त्या खऱ्या माणसाची फसवणूक करतो तेव्हा त्या खर्‍या असणाऱ्या माणसाला याचे खूप दुख पोहचते. जेव्हा हे सगळे समोर येते तोपर्यंत खूप उशीर झालेला आसतो. तो माणूस मग परत कधीच कोणावर विश्वास ठेवत नाही. आजच्या या जगात सर्वजन स्वार्थी आहेत.

पती असो वा बायको असो किंवा तुमची गर्लफ्रेंड सर्वच आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी जगत आहेत. आणि याचा अर्थ असा की एक दिवस यामुळे तुमच्या नात्यामध्ये फसवणूक होण्याची दाट शक्यता निर्माण होते. तुम्हाला जर  फसवणूक टाळायची असेल तर आपल्या पार्टनरच्या काही सवयीकडे नीट लक्ष्य द्या.  या सवयी समजल्यानंतर आपण शोधू शकता की आपला पार्टनर आपल्याशी खोटे बोलत आहे की नाही.

1- स्वताचा मोबाईल लपवत आहे:- जर तुमच्या पार्टनरने तिचा फोन तुमच्यापासून लपवित असेल तर याचा अर्थ तिला भीती वाटते की जर आपण तिचा फोन चेक केला तर काय होईल. म्हणून ही भीती हे एक संकेत आहे की ती तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे. तिच्या मनात थोडी खिचडी शिजत आहे. पार्टनर पासून काहीही लपवण्याचा अर्थ म्हणजे ती तुमच्याशी खोटे बोलत आहे आणि तुमची फसवणूक करत आहे.

२- सतत घराबाहेर राहणे:- जर आपली पार्टनर वारंवार काम करण्याच्या बहाण्याने शहराबाहेर किंवा घराबाहेर जाण्याविषयी बोलत असेल तर काहीतरी चुकत आहे हे आपणास समजले पाहिजे. कामाच्या ट्रीप चे कारण देवून वारंवार बाहेर जाणे हे देखील फसवणूकीचे एक लक्षण असू शकते.

जर तुमच्या पार्टनरने अचानक जिममध्ये जायला सुरवात केली असेल किंवा आपल्या केसांना रंग देत असेल आणि आणखी मेकअप करण्यास सुरवात केली तर हे समजले पाहिजे की तिचे अफेअर चालू आहे.

3-  तुमची पार्टनर तुम्हाला तिच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटूंबापासून दूर ठेवत असेल तर:- जरी आपण वारंवार तिला म्हणत राहिला तरीही जर आपल्या पार्टनरने तुम्हाला तिच्या घरी भेटण्यास नेले नाही तर हे समजले पाहिजे की तिला आपल्याबरोबरचे नाते सर्वांपासून लपवायचे आहे. ती कोणालाही न सांगता या नात्याला कधी ना कधी संपवणार आहे.

4- ती करत असलेल्या फसवणूकीबद्दल तिला पश्चाताप वाटत नसेल :- जर आपण आपल्या पार्टनरला कधी खोटे बोलताना किंवा फसवणूक करताना पकडले असेल आणि तरीही ती आपली चूक मान्य करत नसेल तर याचा अर्थ असा आहे की तीला आपली चूक लक्षात येत नाही. ती नंतर तुम्हाला पुन्हा फसवू शकते. म्हणूनच अशा नात्याबद्दल आपण आधीपासूनच पुढचा सगळा विचार केला पाहिजे.

5- जर ती तुमच्याबरोबर वेळ घालवण्याला महत्त्व देत नसेल :- जर कोणत्याही नात्यात प्रेम असेल तर दोघांना सुद्धा एकत्र वेळ घालवायला आवडत असतो. जर तुमची पार्टनर तुमच्याबरोबर वेळ घालवत नसेल आणि यात तिला काहीच चुकीचे वाटत नसेल तर मग ही विचार करण्याची गोष्ट आहे कारण तिला तुमच्या भावनांची अजीबात पर्वा नाही आहे. ती नंतर विचार न करता तुम्हाला कधीही फसवू शकते.

6- ती तुमच्याबद्दल कायम निष्काळजी राहते :- जर तुमची पार्टनर तुमची काळजी घेत असेल तर ती तुम्हाला काय झाले आहे का तू कसा आहेस तू आरामात आहेस की नाही. हे प्रश्न विचारत असते पण जर तुमची पार्टनर या सर्व गोष्टींबद्दल कधी विचारत नसेल तर मग आपण हे समजले पाहिजे की तिला तुमच्याबद्दल चिंता नाही. ती नंतर तुम्हाला फसवू शकते. नात्यातील फसवणूक होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे निष्काळजीपणा होय.

7- कामाचा बहाणा करून ऑफिस मध्ये वेळ घालवणे :- जर तुमची पार्टनर ऑफिसच्या कामाच्या बहाण्याने घराबाहेर पडत असेल किंवा ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबत असेल. आणि हे  पुन्हा पुन्हा होत असेल तर हे समजून घ्यावे की तुमची पार्टनर कोणा दुसर्‍याबरोबर फ्लर्ट करत आहे.

8- तुमच्याबरोबर सोशल मीडिया अकाउंट ती शेयर करत नसेल तर:- जर तुमची पार्टनर तिच्या प्रायव्हसीबद्दल बोलून फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा इतर सोशल मीडिया अकाउंट्सचा पासवर्ड लपवत असेल तर ती तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे हे सिग्नल आपणास समजले पाहिजे. म्हणून ती नंतर तुम्हाला फसवू शकते.

9 – ती जर तिचे बँकेशी सं*बंधित कागदपत्रे आणि माहिती तुमच्यापासून लपवत असेल तर :- जर आपल्या पार्टनरने तुमच्यासोबत क्रेडिट मोबाइल बँकिंग आणि पासबुक सारखी माहिती शेयर केली नाही तर ती आपल्यावर विश्वास ठेवत नाही हे आपण समजले पाहिजे. काही जन सुरुवातीला सर्व काही शेअर करतात परंतु नंतर लपवतात. यावरून दिसून येते की तुमची पार्टनर तुम्हाला फसवत आहे.