हे ८ चित्रपट २०२३ मध्ये मोठ्या उत्सवामध्ये होणार रिलीज , बॉक्स ऑफिसवर साजरा होईल चित्रपट महोत्सव…

Bollywood

2022 वर्ष सुरु होऊन बराच काळ लोटला गेला आहे. त्याच बरोबर या दीर्घ काळात अनेक चित्रपटही प्रदर्शित झाले असून सुपर डुपर हिट पण ठरले आहे. तसेच आता येत्या काही महिन्यांत आणखी  काही नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

पण आता प्रेक्षक 2023 वर्षा ची  वाट पाहण्यासाठी सुरु झाले आहेत. हे अद्भुत  8 चित्रपट 2023 वर्ष मध्ये मोठ्या उत्सव आणि सणांच्या वेळी प्रदर्शित होणार आहेत, ज्याची प्रेक्षकही खूप आतुरतेने वाट बघण्यास सुरुवात केली आहेत.

१) पठाण:-  सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान सोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार असल्याची बातमी मिळाली आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण काही काळापूर्वी सुरू झालेले आहे, अशा परिस्थितीत चाहते शाहरुख खान च्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

त्यामुळे शाहरुखचा पठाण हा चित्रपट सध्या खूप चर्चेचा विषय बनत आहे. हा चित्रपट देखील पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकही या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

२) आदिपुरुष:- आदिपुरुषमध्ये प्रभास मुख्य भूमिके मध्ये  दिसणार असल्याचे समजले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. जर आपण ‘आदि पुरुष’ च्या कथेबद्दल बोललो तर हा चित्रपट रामायण या हिंदू महाकाव्यावर आधारित आहे.

हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.  साऊथचा सुपरस्टार प्रभास या चित्रपटात भगवान श्री रामची भूमिका साकारताना दिसणार आहे, तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान लंकापती राजा रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

आदिपुरुष या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेननही प्रथमच पौराणिक पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत करत आहेत. हा चित्रपट सध्या खूप चर्चे चा विषय बनला  आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

३) रॉकी और रानी की प्रेम कहानी:- हा चित्रपट करण जोहर बनवत आहे. या चित्रपटामध्ये  रणवीर सिंग आणि आलिया भट्ट दिसणार आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर ‘रॉकी अँड रानी’ या चित्रपटाच्या लव्हस्टोरीचे शूटिंग 20 ऑगस्टपासून सुरू झाले आहे.

करण जोहरने टीझरसोबत असे लिहिले आहे की, ‘7 वर्षानंतर, माझा पुढचा चित्रपट रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेमध्ये कौटुंबिक मूल्यांच्या आत्म्याने प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे, हे जाहीर करताना मला अत्यंत आनंद आणि कृतज्ञ वाटत आहे.  करण जोहर दिग्दर्शित चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

४) बुल और बवाल:- हा चित्रपट देखील आतापासून खूप जास्त चर्चेत आला आहे, या चित्रपटात शाहिद कपूर दिसणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट गुड फ्रायडेच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 7 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

५)  टायगर 3 :- प्रेक्षक सलमान खानच्या टायगर 3 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपटही ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 21 एप्रिल 2023 रोजी चित्रपटाची रिलीज डेट निश्चित करण्यात आलेली आहे.

६) फाइटर:- हा चित्रपट देखील खूप खास असणार आहे, ज्यामध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट गांधी जयंतीच्या आसपास म्हणजेच 28 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समजले आहे.

७) डंकी और बड़े मियां छोटे मियां :- हे दोन्ही चित्रपटही लोकांच्या खूप चर्चेत आलेले आहेत. डंकीमध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार असल्याचे समजले आहे.

८) एनिमल:- सध्या एनिमल या चित्रपटाचे शूटिंग मोठया जोरात सुरू झालेले आहे. या चित्रपटा मध्ये अनेक मोठं- मोठे दिग्गज दिसणार आहेत. एनिमल हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या आसपास मोठया पडद्यावर  प्रदर्शित होणार असल्याचे समजले आहे.