हे ६ बॉलिवूड सेलिब्रेटी आहे, ज्यांनी बालकलाकार म्हणून केली आपल्या करिअर ची सुरुवात आज सर्व बॉलिवूड इंडस्ट्री नाचते त्यांच्या इशाऱ्यांवर..

Bollywood

बॉलिवूड सेलिब्रेटी त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि सुंदरतेची ओळखले जात असतात  आणि चित्रपटामध्ये  लीड म्हणून  काम करतात . पण तुम्हाला हे माहीत आहे का की, काही स्टार्स आपल्या अभिनयाने आणि निरागसतेने बालपणी बालकलाकार म्हणून पडद्यावर काम केलेले  आहे. आणि यासोबतच या स्टार्सनी अगदी लहान वयात मोठ्या पडद्यावर पण पदार्पण केले आहे.

चला तर मग, आज आपण त्या स्टार्सबद्दल जाणून घेणार आहोत , ज्यांनी अतिशय कमी वयामध्ये चित्रपट सृष्टीत  पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवून लोकांना आश्चर्यचकित केले आहे. आणि चाहत्यांच्या मनात पहिल्यापासून स्वतःची जागा निरमा केली आहे. चला तर जाणून घेऊया अशाच ६ कलाकारांबद्दल , जे बालकलाकार म्हणून  पडद्यावर दिसले आहे.

एवढ्या कमी वयात या बाल कलाकाराची आपल्या फिल्मी करिअर ची सुरुवात केली आहे. पण  त्या वयात इतर मुलांना इतकी समज आलेली नसते. त्यावयात करिअर ची सुरुवात करणे ही खूप मोठी गोष्ट मानली जाते.

१. श्रीदेवी:- बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीने वयाच्या 4 थ्या वर्षी असतांनाच  आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. वास्तविक म्हणजे, या अभिनेत्रीला लहानपणापासूनच नृत्याची खूप आवड होती आणि तिने तमिळ चित्रपट थुनाइवनमध्ये बालकलाकार म्हणून तरुण लॉर्ड मुरुगाची भूमिका साकारून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.

त्यानंतर ती अनेक तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये दिसली होती. यानंतर 1975 मध्ये जूली या चित्रपटातूनश्रीदेवी ने  बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर श्रीदेवी ने  सतत सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आणि चित्रपटसृष्टीत उंच भरारी घेतली होती. पण आज त्या आपल्यात नाही याचे खूप दुःख चाहत्यांना वाटते.

२. कुणाल खेमूने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये केले होते काम:- बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूने या कलाकाराने गोलमाल मालिकेत प्रेक्षकांना खूप हसवले होते. पण तुम्हाला माहित आहे की, बालकलाकार म्हणून कुणाल दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘गुल गुलशन गुलफाम’ या टीव्हीतील मालिकेत दिसला होता.

महेश भट्ट यांच्या ‘सर’ नावाच्या चित्रपटातून नसीरुद्दीन शाह आणि पूजा भट यांच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. राजा हिंदुस्तानी, भाई, हम है राही प्यार के, इत्यादी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले आहे.

3. इम्रान खान:- बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट (आमिर खान) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इम्रान खानने आपल्या फिल्मी करिअर ची सुरुवात एक  बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. इम्रान ने पण खूप कमी वयात करिअर ची सुरुवात केली होती.

विशेष गोष्ट  म्हणजे इमरानने ‘येस कयामत से कयामत तक’ या दोन चित्रपटांमध्ये आमिरची तरुण वयाची भूमिका साकारली होती, आणि तसेच ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटात इमरानने त्याच्या मामाच्या लहानपणीची भूमिका साकारली होती.

4. हृतिक रोशन:- हँडसम हंक हृतिकने वयाच्या 6 व्या वर्षी कॅमेऱ्याचा सामना केला होता आणि ‘आशा’ या  चित्रपटातील एका डान्स सीक्वेन्सचा तो भाग बनला होता. यानंतर हृतिकने ‘आप के दिवाने’, ‘आस आस’ आणि ‘भगवान दादा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारून काम केले होते.

पुढे त्याने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून मुख्य भूमिकेत पदार्पण केले. मात्र, फार कमी लोकांना माहीत असेल की, हृतिकच्या वडिलांना त्याने अभिनेता व्हावे असे वाटत नव्हते. वास्तविक, हृतिक रोशनला स्कोलियोसिस आहे, ज्यामध्ये स्टंट किंवा डान्सला परवानगी नव्हती.

5. आमिर खान:- मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटला जाणारा अमीर  खानने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात एक  बालकलाकार म्हणून केली होती. ‘यादों की बारात’ आणि ‘मधोष’ या चित्रपटांमध्ये आमिर बालकलाकार म्हणून दिसला होता.

आज आम्ही तुम्हाला असे सांगणार आहोत की, 1973 मधील ‘यादों की बारात’ हा चित्रपट त्यांचे काका नासिर हुसैन यांनी दिग्दर्शित केला होता, तर 1974 मध्ये आलेला ‘मधोश’ हा चित्रपट त्यांचे वडील ताहिर हुसैन यांनी स्वतः तयार केला होता.

6. आलिया भट्ट देखील बालकलाकार म्हणून दिसली आहे:- ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री आलिया भट्ट ही स्टार किड असल्यामुळे भलेही चित्रपटांमध्ये दिसली असेल, पण तिच्या मेहनतीने तिने हायवे, उडता पंजाब आणि यांसारख्या अनेक  चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.

पण तुम्हाला एक सत्य गोष्ट माहीत आहे का, आलियाने 1999 मध्ये आलेल्या ‘संघर्ष’ या चित्रपटामध्ये एक  बाल कलाकार म्हणून प्रितीची बालपणीची भूमिका साकारलेली होती. त्यावेळी आलिया फक्त आणि फक्त  6 वर्षांची होती. हे सत्य फार कमी लोकांला माहित आहे.

Gayatri Dheringe

Gayatri Dheringe is a Writer and Editor in live36daily.com from past 2 year , she is very talented writer, always better informative and well research article on daily news . she also complete Post Graduation in Mass Communication ,B.Com , Pune

https://live36daily.com/