हार्दिक पांड्याच्या अगोदर हे 4 क्रिकेटर बनले होते लग्न न करताच वडील …

Sports

हार्दिक पांड्याने काही महिन्यांपूर्वी नताशा स्टॅनकोविच मॉडेलबरोबर लग्न केले. दरम्यान आता हार्दिक पांड्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितले की तो बाप झाला आहे. या बातमीमुळे आम्ही तुम्हाला आज अशा 4 क्रिकेटर्सची नावे सांगणार आहोत जे लग्नाविना वडील झाले होते.

१. विवियन रिचर्ड्स:- वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज सर विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांच्यातही बरीच चर्चा झाली आहे. भारतीय अभिनेत्री नीता गुप्ता आणि दिग्गज क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांनी लग्न केलेले नव्हते परंतु दोघे बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्याही लग्नाशिवाय एक मुलगी आहे. जिचे नाव मसाबा गुप्ता आहे. मसाबा गुप्ता देखील एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. विवियन रिचर्ड्स हा क्रिकेट इतिहासातील सर्वात नामांकित फलंदाज आहे.

२. जो रूट:- जो रूटदेखील अशा क्रिकेटपटूंपैकी आहे जो लग्नाविना वडील बनला. जो रूट आणि केरी कॉटरल बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते त्यानंतर केरी कॉटरल गर्भवती झाली होती. २०१६ च्या टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या अगदी अगोदर जो रुटने आपली मैत्रीण केरीला लग्नाचा प्रस्ताव दिला. सध्या रूट-कॅरीची जोडी क्रिकेट जगातील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहे.

३. विनोद कांबळी:- माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी देखील लग्नाविना वडील बनला होता. विनोद कांबळीने पहिल्या पत्नीला घटस्फो*ट दिला आहे. दरम्यान त्याचे फॅशन मॉडेल एंड्रिया हेविटशी अफेयर होते. विनोद अँड्रियाबरोबरच्या नात्यात वडील बनला. विनोद कांबळी हा एक अत्यंत प्रतिभावान क्रिकेटपटू मानला जात होता परंतु वादातही तो खूप गुंतला होता ज्यामुळे हा खेळाडू आपले क्रिकेट कारकीर्द लांबवू शकला नाही.

४. डेव्हिड वॉर्नर:- डेव्हिड वॉर्नर आणि त्याची पत्नी केंडिस यांना मोठी मुलगी इवी आहे. इवीचा जन्म 11 सप्टेंबर 2014 रोजी झाला होता. त्यावेळी दोघे पती-पत्नी नव्हते. विश्वचषक 2015 नंतर वॉर्नरने 4 एप्रिल रोजी केंडिसशी लग्न केले. डेव्हिड वॉर्नर आणि कँडिस यांच्या सध्या 3 मुली आहेत आणि आपल्या कुटूंबासमवेत तो खूप आनंदी आहे.

डेव्हिड वॉर्नर अनेकदा आपल्या कुटूंबियांसमवेत विनोदी व्हिडिओ बनवतो आणि सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. हार्दिक-नताशा आई बाबा झाल्याचे हार्दिकने स्वत: ट्विट करून सांगितले होते. लॉकडाउन काळात हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट करत त्याने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.

हार्दिक नताशा आई-बाबा झाल्यावर क्रिकेट विश्वासह चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याला ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. आई-बाबा झालेल्या हार्दिक-नताशाचं मन:पूर्वक अभिनंदन असं म्हणत त्याने नताशा-हार्दिकचे अभिनंदन केले होते.

हार्दिकने लॉकडाउनमध्ये आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची बातमी दिली होती. तेव्हा त्याने तिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. मी आणि नताशा आमच्या सहजीवनाचा प्रवास आनंदाने करत आहोत आणि आता तो प्रवास अजूनच आनंददायी होणार आहे.

नताशा गरोदर असून आता आम्हा दोघांत लवकरच तिसरा जीव येणार आहे. आम्ही या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहोत. याचसोबत तुम्हा साऱ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत अशा भावना हार्दिकने व्यक्त केल्या होत्या.