आपण बॉलिवूड कलाकारांच्या नात्यांबद्दल बर्याेच गोष्टी ऐकल्या आहेत, पण त्यांच्या रोजच्या जीवनात या सगळ्याचा काय परिणाम होतो, ते फक्त त्या कलाकारालाच माहीत असते. त्यातील काही अभिनेता किंवा अभिनेत्री या गोष्टी जगासमोर आणतात तर काही त्या लपवून ठेवण्याचे ठरवितात.
पण थोड्याच दिवसांपूर्वी सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने स्वत:ची आई अमृता सिंग हिच्या बद्दल एक गुपित उघड केले होते जे तिच्या पूर्वीच्या नवर्याचला म्हणजेच पती सैफ अली खान याला देखील माहित नव्हते. ते काय गुपित होते, जे साराने सांगितले ते आम्ही तुम्हाला सांगतो.
सारा अली खानने अमृता सिंगचे हे रहस्य सर्वांना सांगितले :- सारा अली खान ही एक फॅशनेबल अभिनेत्री आहे व तिच्या मस्त स्टाईलसाठी ओळखली जाते. ती नेहमीच स्वत: बद्दल सांगायला उत्सुक असते, त्यात कधी मागेपुढे पाहत नाही. साराने आतापर्यंत मोजके असे 3 चित्रपट केले आहेत पण तिने चाहत्यांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
एका मुलाखतीत साराने आपली आई अमृता सिंगबद्दल एक गोष्ट सांगितली. सारा म्हणते की “माझ्या आईने दहावीत असताना बोर्डाच्या उत्तरपत्रिकेवर फक्त “लव्ह अमृता सिंग” लिहिले होते व परीक्षा हॉलमधून ती निघून गेली होती.
सारा म्हणते, या तिच्या आईच्या उत्तराला परीक्षकांनी किती मार्क दिले असतील? याचा तुम्ही विचार करू शकता. एका मुलाखतीत सैफने सांगितले होते की तो व सारा इब्राहिमच्या काळात खूप स्वार्थी होते, म्हणून जेव्हा साराला सैफने केलेल्या टीकेवर तिचे उत्तर विचारले, तेव्हा तिने सैफचे कौतुक केले.
सारा म्हणाली माझे वडील अगदी माझ्याप्रमाणे आहेत, मी त्यांना चांगली ओळखते. ते नेहमीच आम्हाला भेटण्यास उत्सुक असतात. माझ्या मते ते एक चांगले वडील नक्कीच आहेत. त्यांच्या एका कॉलवर आम्ही सगळे एकत्र जमतो.
माझे माझ्या आईवर खूप प्रेम आहे, असे सारा पुढे म्हणाली. मला वाटते की जेव्हा आपण एकत्र असता त्यावेळी आपल्याला आपल्या भावना एकमेकांशी शेअर करता येतात. माझ्या आईने मला एकटीने वाढविले आहे, त्यामुळे मी आज जें काही मिळवले आहे, ते फक्त तिच्या मुळेच आहे. मला तिच्या बोलण्यातून तिचे प्रेम नेहमीच जाणवते. वडिलांच्या भावना देखील मी जाणते जरी मी त्यांच्याबरोबर राहात नसले तरी.
साराचा “लव्ह आज कल -२” हा चित्रपट व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी प्रदर्शित झाला. त्यामध्ये साराने उत्तम अभिनय केला आहे. त्या चित्रपटात साराबरोबर कार्तिक आर्यन दिसला आणि लोकांनी त्यांच्या जोडीला पसंती दिली. साराच्या “कुली नंबर १” या चित्रपटाच्या रीमेकचे शूटिंग खरे तर अर्ध्याहून जास्त झाले होते परंतु “कोरोना व्हायरस महामारी” दरम्यान शूटिंग लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आली आहेत. सारा सध्या आपल्या आईबरोबर मजेत वेळ घालवत आहे.
सैफ अली खान यांनी पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या घटस्फोटाविषयी खुलासा केला. त्यांने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की घटस्फोट ही जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे. या गोष्टीचे निराकरण मी करू शकेन असे मला नाही वाटत.
या प्रकरणातील काही गोष्टी माझ्या मनाला शांतता देणार नाहीत. त्यावेळी माझे वय फक्त २५ वर्षांचे होते. पण आजच्या परिस्थितीत खूपच बदल झाले आहेत.