सारा अली खानने काही वर्षांपूर्वीच बॉलिवूडमध्ये चित्रपट करण्यास सुरवात केली आहे. केदारनाथ हा तिचा पहिला चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटात सारा अली खानने आपल्या अभिनयाने हे सिद्ध केले की ती एक जन्मजातच एक अभिनेत्री आहे. सारा सध्या लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबाबरोबर घरीच वेळ घालवत आहे.
ती आपल्या भाऊ आणि आईसबोत व्हिडीओ करून शेअर करत असते. स्टार्सचे नव नवीन ग्लॅमरस व्हिडिओ लॉकडाऊनमध्ये येत नाही आहेत त्यामुळे बरेच जुने व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेले आपण बघत आहोत. सारा अली खानची जुनी मुलाखतही आता व्हायरल होत आहे ज्यात तिने आपले वडील सैफ अली खानसोबत न राहण्याचे कारण सांगितले आहे.
जिथे माझे आई वडील दु: खी आहेत अशा घरात मी राहू शकत नाही:- एका मुलाखतीत साराला विचारण्यात आले होते की तुझ्या आईनेच तुला वाढवले आहे तर मग तुला आपण वडिलांच्या आसपास नसल्याचे जाणवले का. साराने या प्रश्नाचे असे उत्तर दिले. ती म्हणाली की..
माझे आई वडील दु: खी असलेल्या घरात मी राहू शकत नाही. एकाच घरात दु: खी पालक असण्यापेक्षा वेगवेगळ्या घरात आनंदी पालक राहिलेले अधिक चांगले असते. माझ्या आईने मला कधीही काहीही चुकीचे शिकवले नाही. माझा आणि माझा भाऊ जन्मल्यानंतर आईने सगळे लक्ष आमच्या दोघांवर केंद्रित केले होते. माझ्या आईने आपली चित्रपट करीयर सोडेल आणि पूर्ण वेळ घरी राहू लागली. आम्ही आमच्या आईबरोबरही आनंदी आहोत आणि आम्ही आमच्या वडलांना देखील भेटत असतो आणि त्यांना सांगतो की आम्हीसुद्धा तिच्याबरोबर आनंदी आहोत.
तैमूर बद्दल सारा ने एक मोठी गोष्ट बोलली आहे:- जेव्हा सारा अली खानला विचारले गेले की सैफ अली खान तैमूरबरोबर जास्त वेळ घालवतो का. तेव्हा सारा म्हणाली कीतैमूर हा माझा छोटा भाऊ आहे आणि पापा त्याच्याबरोबर असताना त्याला पूर्ण वेळ देत असतात आणि जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर असतो तेव्हा ते आमच्याबरोबर पूर्ण वेळ घालतात.
मला माझ्या वडिलांबद्दल कोणतीही तक्रार नाही. ते खूप चांगले व्यक्ती आहेत ते सर्वांवर समान प्रेम करतात. साराने असेही म्हटले आहे की आम्ही सध्या वडिलांबरोबर राहत नसलो तरी ते आमची खूप काळजी घेतात. ते आमच्यापासून दूर आहेत असे अजिबात वाटत नाही. त्यांना एक फोन कॉल केला के ते लगेच आमच्याकडे येतात.
साराचे आता पर्यंत फक्त दोन चित्रपट रिलीज झाले आहेत तरीही तिचे स्टारडम एका मोठ्या स्टार्स इतकच आहे. सैफ अली खानची मुलगी असतानाही साराने बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्टार किड असूनही तिचा हा प्रवास काही सोपा नव्हता. साराचे जुने फोटो पाहून ती भविष्यात एक सुंदर अभिनेत्री होईल असं कोणालाच वाटलं नसेल. पण कठोर मेहनत आणि मेहनतीने साराने हे शक्य केले. करण जोहरच्या चॅट शोमध्ये साराने तिच्या एका आजाराविषयी खुलासा केला आहे.
कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असताना साराचं वजन ९६ किलो एवढे होते. पीसीओडी आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळे तिला वजन कमी करणं शक्य होत नव्हते. हा आजार तिला अजूनही असल्याचे साराने सांगितले आहे. अमेरिकेत पुढील शिक्षण घेत असतानाच साराने तिचे वजन कमी केले. वर्कआऊट आणि पौष्टिक आहार खाऊन तिने वाढलेलं वजन नियंत्रणात आणले आहे. चालणे सायकल चालवणे ट्रेडमिलवर धावणे याप्रकारचे अनेक व्यायाम ती नेहमी करत असते.