सामान्य घरातील मुलींसारख्या दिसत होत्या ह्या टिव्हीमधील 5 सुप्रसिद्ध अभिनेत्र्या, स्टार बनताच बदलला संपूर्ण नक्षा …

Entertenment

टीव्हीवर सून-मुलीची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्री वास्तविक जीवनात जितकी सध्या असतात पण त्या सिरीयल मध्ये अधिक बोल्ड आणि मोहक असतात. टीव्हीवर चांगली सून मुलगी सासू आणि पत्नीची भूमिका साकारून या अभिनेत्री प्रसिद्ध झाल्या आहेत आणि आज त्यांनी प्रत्येक घरात एक आपला ठसा उमटविला आहे. आज जरी या अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असल्या तरी प्रसिद्ध होण्यापूर्वी त्या सामान्य मुलींप्रमाणेच दिसत असत. प्रसिद्ध झाल्यानंतर या अभिनेत्रींचा लूकही बदलला आहे.

या अभिनेत्रींचे लुक स्टार बनताच पूर्णपणे बदलले आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आजकालच्या या प्रसिद्ध अभिनेत्री एकेकाळी खूप साध्या दिसत असत पण आता त्या खूप स्टायलिश झाल्या आहेत. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला टेलीव्हिजन इंडस्ट्रीतील काही नामांकित अभिनेत्रींचे जुने फोटोज दाखवणार आहोत ज्यावेळी त्यांना कोणी ओळखत नव्हते. प्रसिद्ध झाल्यावर त्यांचा लुक कसा बदलला ते स्वतः पहा.

१. श्रुती झा:- लाईफ ओकेच्या प्रसिद्ध मालिका सौभाग्यवती भावना मधून श्रुती झा ला बरीच लोकप्रियता मिळाली. यानंतर ती जीटीव्हीच्या शो कुंडली भाग्य मध्ये दिसली. या भूमिकेबद्दल तिला प्रेक्षकांकडून खूप कौतुकही मिळाले. श्रुती झा टीव्ही इंडस्ट्रीतली एक नामांकित अभिनेत्री आहे. पण या फोटोत आपण पाहू शकता की प्रसिद्ध होण्यापूर्वी ती बरीच वेगळी दिसत होती. जरी ती आधीपासूनच सुंदर होती पण प्रसिद्ध झाल्यानंतरही तिचा लूक खूप बदलला आहे.

२. सारा खान:- छोट्या पडद्यावरील सारा खान एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. विदाई या मालिकेतल्या तिच्या भूमिकेमुळे ती प्रत्येक घरा घरात प्रसिद्ध झाली. या मालिकेत लहरी दिसणारी सारा वास्तविक जीवनात खूपच बोल्ड आहे. परंतु यापूर्वी ती अशी दिसत नव्हती. ती प्रसिद्ध होण्यापूर्वी एखाद्या सामान्य मुलीसारखीच दिसत होती. मासूमपणा तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण ती प्रसिद्ध होताच तिच्या लूकमध्ये जबरदस्त बदल होताना दिसत आहे.

३. जेनिफर विजेट:- जेनिफर विजेट छोट्या पडद्यावरील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती दिसण्यात इतकी सुंदर आहे की बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्रीसुद्धा तिच्यासमोर अपयशी ठरल्या आहेत. नुकताच तिचा बंद झालेला बेहरी शो खूपच चांगला गाजला. ती सध्या बेपनाह मध्ये दिसली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की जेनिफर आज टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. जरी ती आज खूप स्टाइलिश आणि ग्लॅमरस दिसत असली तरी ती प्रसिद्ध होण्यापूर्वी कोणत्याही एका सामान्य मुलीसारखी दिसत होती.

४. मौनी रॉय:- टीव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये मौनी रॉय यांचेही नाव आहे. नागीन या मालिकेत मौनीची सर्प शैली लोकांना फार आवडली होती. मौनीने गोल्ड चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. जरी ती आज खूपच हॉट दिसत असली तरी फोटो मध्ये आपण पाहू शकता की यापूर्वी ती किती साधी मुलगी दिसत असे.

५. दिव्यंका त्रिपाठी:- दिव्यांका त्रिपाठी स्टार प्लस शो ये है मोहब्बतें मध्ये इशिताच्या भूमिकेत आहे. आज तिची फॅन फॉलोव्हिंग एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा काही कमी नाही. दिव्यांका ही आज टीव्हीचा एक परिचित चेहरा आहे परंतु या फोटोत आपण पाहू शकता की यापूर्वी तिने जास्त मोहकपणा दर्शविला नव्हता. जरी ती आधीही सुंदर होती परंतु प्रसिद्ध झाल्यानंतर तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे.

मित्रांनो आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल. तुम्हाला आमचे लेख आवडत असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.